काय कारण असेल?

Submitted by सुजा on 22 December, 2013 - 00:00

गेले दोन तीन वर्ष दर ४-५ महिन्यांनी अधून मधून ही गोष्ट घडत होती . स्टीलच्या कुठल्याही गोष्टीला ( भांडी /नळ) हात लावावा तर चक्क इलेकट्रीकचा शॉक बसावा अस शॉक बसतोय.दोन/ तीन वर्ष दर चार -पाच महिन्यांनी अस घडत होत.पण आत्ता फ्रिक्वेन्सी वाढली आहे. काय कारण असेल ? कोणी सांगू शकेल का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेन स्विच बंद केला आहे का? इलेक्ट्रिशिअन ना बोलवून चेक करून घ्या. घरात अर्थिंग बरोबर नसेल.

आधी ईलेक्ट्रिशियन बोलवून सगळं वायरिंग चेक करून घ्या. माझ्या आईकडे असा प्रकार घडला होता. कल्प्रिट सदैव प्लग इन करून ठेवलेला मिक्सर होता म्हणे. मला खरंच त्या सर्किट्स मधलं फार काही कळत नाही पण एक दिवस नळाच्या पाईप्सना स्पर्श झाला तर शॉक बसायला लागला. मग ईलेक्ट्रिशियन बोलवून सगळं चेकिंग केल्यावर शोध लागला.

फक्त माझ्याच घरात नाही. नातेवाईकांच्या ( दुसर्यांच्या घरात ) पण अस होत. गेल्या आठवड्यात मामी कडे गेले होते तिच्या कडेही अस झाल आणि आत्ता माझ्या घरात सकाळी पण असच घडल.सकाळी चहा करायला स्टील च पातेल उचलल तर झटका बसला . स्टील चा नळ सोडला तरी तेच Happy हे एका आठवडयाच घडल. माझ्या आईच्या घरी गेले तरी तिथे सुद्धा अस बरेच वेळा झालेलं आहे .पूर्वी दोन महिन्यातून एकदा कधी तरी घडत असे. मी ते विसरूनही जात असे. परत झटका बसला तरच आठवण यायची. Happy

मला कधी कधी टॅक्सीचा दरवाजा (बाहेरून) बंद करताना असा अनुभव येतो. क्वचित कधीतरी ऑफिसातल्या कँटीनमधल्या खुर्चीला स्पर्श केल्यावरही असे जाणवते.

इसे बोलते है स्टॅटीक इलेक्ट्र्रीसीटी. ड्राय हवा असेल तर त्याचा जास्त इफेक्ट असतो. आपले कपडे आणि चेअर, कार सिट वगैरे यांचे घर्षण होउन स्टॅटीक इलेक्ट्रीसिटी तयार होते (जर पायात शुज असतील तर लगेच अर्थ होत नाही), थोडक्यात विद्युत भार तयार होतो. आणि मग जेंव्हा तो अर्थ होतो, तेंव्हा डिस्चार्ज होतो. त्यावेळी कोणाला तरी टेस्टर ने चेक करायला सांगा. टेस्टर ऑन दिसेल Wink

पण चेक नक्की करा सध्या मुंबईत शॉर्ट सर्किट होउन आग लागण्याच्या घटना घडत आहेत. श्रीदेवीच्या घरातही असे झाले असे आज वाचले. सर्किट बदलून घ्यायची तर चांगल्या प्रतीचे इलेक्ट्रिकल ट्यूबिन्ग वापरा व फ्यूज च्या जागी नवे स्विचेस आले आहेत ते लावून घ्या.

उदयन लोकरीचे अथवा टर्किश पध्दतीचे कपडे वापरत नाही हो मी . थंडीत कधी तरी स्वेटर आणि टॉवेल सुद्धा टर्किश नसतो माझा Happy निवांत तुम्ही आणि प्रमोद देव यांनी दिलेली माहिती इन्फर्मेटिव्ह आहे. तसच असाव Happy पण घरात कायम सपाता वापरते मी.
अमा काहीना काही कारणांनी ईलेक्ट्रिशियन बोलवून सगळं वायरिंग चेक करून झालाय. बदलूनही झालाय

यापुढे धातूंना हात लावण्यापूर्वी पाय जमिनिला लावुन स्वतःला प्रभारमुक्त करुन बघा. त्यानंतरही होत असेल तर मात्र इलेक्ट्रिशिअन बरा.

सोफ्यावर बसून किंवा कारच्या सीटवर बसून उतरल्यावर स्टीलला स्पर्श केल्यास असे होते. (घाबरण्याचे कारण वाटत नाही).

कपडे.
प्लॅस्टीकच्या खुर्च्या.
कार ची सीट्/सीट कव्हर्स.
प्लॅस्टिक खुर्ची हे सगळ्यात जास्त मोठे कल्प्रिट आहे. अनेक प्रकारचे सिंथेटिक फायबर्स स्टॅटिक उत्पन्न करतात.
स्वतःला ग्राऊंड करणे (वर विजय देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे) हा इलाज आहे.

सुजा,

मलाही असा अनुभव आला आहे. शरीरावर विद्युत्भार साठल्याने असं होतं. एकदा मी प्लास्टिकच्या घसरगुंडीवर (पोरासंगे) खेळतांना धातूच्या स्क्रूला स्पर्श होऊन ठिणगीदेखील पडली होती. तीनदा असं झालं त्या दिवशी. पण ही गोष्ट माझ्या बाबतीत अत्यंत अनियमितपणे घडते. त्यामुळे फारसं लक्ष दिलेलं नाहीये.

हे जर वारंवार होऊ लागलं तर मी मनगटावर कडं बांधेन. कुठलंही धातूचं कडं चालेल असं वाटतं. माझ्या अंदाजाप्रमाणे हा उपाय निर्धोक आहे. अर्थात हा उपाय तुम्हाला लागू पडेल की नाही ते माहीत नाही. तसेच यातून काही अपाय होईल का तेही मला माहीत नाही. हा उपाय पूर्णपणे माझ्या डोक्यातून निघालेला आहे.

आ.न.,
-गा.पै.

>>गजानन | 22 December, 2013 - 02:08 नवीन
मला कधी कधी टॅक्सीचा दरवाजा (बाहेरून) बंद करताना असा अनुभव >> हे स्टॅटिक इलेक्ट्रीसिटीमुळे. इथे थंडीत कारचा दरवाजा बंद करताना हमखास शॉक बसतो. तसंच वुलन कपडे घालतानाही.

सुजा,
स्टॅटीक इलेक्ट्रिसिटीमुळे असे घडते. कारण माहित नाही पण काही व्यक्तींच्या बाबतीत जास्त वेळा घडते.
तुमच्या घरी एसी, एअर ड्रायर / क्लोथ ड्रायर / हेअर ड्रायर हे वापरले जाते का? या उपकरणांमुळेही स्टॅ. इ. निर्माण होते.
त्याशिवाय सिंथेटिक कपडे घातल्यामुळे , बर्‍याच वेळा दोन लेयर असतील ( म्हणजे टीशर्ट आणि वर श्रग किंवा ड्रेस + ओढणी असे असले तरी स्टॅ. इ. तयार होते.
धातुच्या वस्तुला हात लावल्यास ती डिस्चार्ज होऊन शॉक लागतो.

आताशा थंडीचे हलके पण उबदार असणारे सिंथेटीक स्वेटर / ब्लँकेट ( बहुधा फ्लिस ) मिळतात. हे वजनाला अतिशय हलके असतात पण त्यानेही खुप स्टॅ. इ. तयार होते. असे एक ब्लँकेट माझ्याकडे घेतले होते. ते ओढुन झोपल्यास रात्रीच्या अंधारात चक्क ठिणग्या दिसायच्या, त्यामुळे ते टाकुन दिले.

घर सोडून इतरत्रही होतं आणि स्टीलचं पातेलं उचलूनही शॉक बसला तर स्टॅटिक असण्याची शक्यता जास्त.

मी आहे इलेक्ट्रिफायिंग पर्सनॅलिटी Proud
थंड आणि कोरड्या हवेत शॉक्स जास्त बसतात असा अनुभव आहे ! डोअरनॉब्स, कारचा दरवाजा, वाहतं पाणी इतकंच काय दुसर्‍याला स्पर्श करतानाही बरेचदा करंट लागलेला आहे ( कृपया अर्थाचा अनर्थ नको Wink ) मुलाला उचलताना तर कित्येकदा असे शॉक्स लागलेले आहेत Uhoh पुण्यातही सध्या ब्लँकेट , स्वेटर काढता-घालताना ठिणग्या उडणं होतंच आहे.
उपाय आहेत. एकतर जिथे तिथे ग्लोव्हज घालून फिरणं ( पण ह्याचा मुंबईत / भारतात काही उपयोग नाही ), तळहातांना मॉईश्चरायझर लावून हात कोरडे पडू दिले नाहीत तर शॉक्स कमी बसतात/ बसतच नाहीत, वर एका पोस्टमध्ये आलंय तसं पाय जमिनीला लावून स्टॅटिक कसं घालवतात ते माहीत नाही पण कुठल्याही धातूला स्पर्श करण्याआधी उलट्या हाताने त्या वस्तूवर नॉक केल्यासारखं करायचं ह्याने शॉक लागायचं प्रमाण खूप कमी होतं.

सावली,

ह्याला १००% अनुमोदन,

दुबईसारख्या कोरड्या हवेच्या ठिकाणी काळोख्या रात्री जर वूलन ब्लँकेट डोक्यावरून ओढली व आत हाताची

नख त्या ब्लँकेट वर ओढलीतर ठीणग्या दिसतात आणि त्याचा प्रकाशही दिसतो.

अर्थात ह्याच कारण स्टॅ. ई.

अगो आणी सुजा.. मला आपलं म्हणा. मीपण ह्या शॉकवाल्या कॅटेगरीत.
मला लहानपणापासुन असं होतं. पण इतके वर्ष घरचे विश्वासच ठेवत नव्हते. (अजुनही ठेवत नाहीत). Sad
इथे आल्यावर मला बसणारे शॉक भास नाहीत हे आज कळलं.
(एकदम भरून येतंय मला Girl Cry.gif)
सगळ्यांचे आभार !!

हे जर वारंवार होऊ लागलं तर मी मनगटावर कडं बांधेन. कुठलंही धातूचं कडं चालेल असं वाटतं. माझ्या अंदाजाप्रमाणे हा उपाय निर्धोक आहे. अर्थात हा उपाय तुम्हाला लागू पडेल की नाही ते माहीत नाही. तसेच यातून काही अपाय होईल का तेही मला माहीत नाही. हा उपाय पूर्णपणे माझ्या डोक्यातून निघालेला आहे.
<<
काकूंच्या हातात सोन्याच्या बांगड्या/पाटल्या इ असतीलच ना? नाही काही तर पायात तोरड्या किमान जोडवी तरी असतातच. तरीही त्यांना शॉक लागतोय.
मग कडं नक्की कशी व काय वेगळी मदत करेल?
अ‍ॅक्चुअली चपलेतून पाय काढून (विना मोज्याचा) फरशीवर टेकविणे हा इलाज चांगला आहे असा अनुभव आहे.

अगो आणि पियू परी आपण एकाच नावेतल्या Happy आणि इब्लिस कोणाला काकू म्हणताय कळेल का? इथे या अंतर्जालावर कोणी कोणाची काकू/मामी/आत्या /मावशी किव्वा काका/मामा नसतात. तुम्हाला माहित नाही का ?

सुजा,
काय मामा बनवताय का मला? Proud
तुमच्या पुतण्याच्या तुम्ही काकू होणारच, आज नै तर उद्या.
शिवाय समय आया बाका तो गधे को बोलना काका, असा नियम आमच्यात असतोय. म्हणून आमच्यात सर्व काका किंवा काकू असतात. Wink


(नुसते दिवे नव्हे, अक्खी दीपमाळ घ्या. चायना मेड आहे, गोड मानून घ्याल ही आशा)

इतकंच काय दुसर्‍याला स्पर्श करतानाही बरेचदा करंट लागलेला आहे >>> Lol
मला कारमधुन उतरताना दररोज शॉक लागतो म्हणुन मी दरवाजा उघडल्यावर आधी हाताचा कोपरा किंवा मनगट कारला लावुन स्वतःला डिस्चार्ज करुन घेतो . ( नको तिथं चार्जिंग काही उपयोगाचं नाही ) Proud
हे जर वारंवार होऊ लागलं तर मी मनगटावर कडं बांधेन. >>> कडं बांधल्याने तुम्ही कसे डिस्चार्ज होणार ?
ब्लँकेट मध्ये नखं फिरवुन ठिणग्या काढायला जाम मजा यायची.