एक भाल्याखालचे अन...

Submitted by ह.बा. on 21 December, 2013 - 02:09

एक भाल्याखालचे अन...

अपयशाचा अर्थ कळतो यश मिळाल्यावर
एक भाल्याखालचे अन एक भाल्यावर

व्यंग, रंगाला, रुपाला अर्थ नाही रे...
हेच कळते संत अथवा प्रेम झाल्यावर

केवढी आंदोलने केलीस सामाजिक
घे जरासा ज्यूस घे सत्तेत आल्यावर

ते तिचे ते जेवढे कळले पुरे आहे
वेदना कळतात सार्‍या मन कळाल्यावर

द्यायची तर रंगमंचावर वहावा दे
मी खरा नसतो कधी मेकप निघाल्यावर

सावलीचे झाड नेले वादळाने अन
का हबा ठेऊन बसला हात पाल्यावर?

- ह. बा. शिंदे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त गज़ल! आवडली.

द्यायची तर रंगमंचावर वहावा दे
मी खरा नसतो कधी मेकप निघाल्यावर

सावलीचे झाड नेले वादळाने अन
का हबा ठेऊन बसला हात पाल्यावर?

या दोन द्वीपदी खूप आवडल्या! Happy

चांगली गझल हबा....
मक्ता तर जबरदस्त आहे...एकदम आशयघन...... काही किरकोळ तांत्रिक बाबी जाणवल्या...वहावा सारख्या....

मक्ता खल्लास !

भाल्यावर, झाल्यावर, कळाल्यावर, निघाल्यावर.....सगळेच लाजवाब !

धन्यवाद !

सावलीचे झाड नेले वादळाने अन
का हबा ठेऊन बसला हात पाल्यावर?

मस्त शेर!

रंगमंचाचा शेरही मस्त. वहावा बद्दल कैलासरावांशी सहमत!

अपयशाचा अर्थ कळतो यश मिळाल्यावर
एक भाल्याखालचे अन एक भाल्यावर

व्वा.. मस्त.

व्यंग, रंगाला, रुपाला अर्थ नाही रे...
हेच कळते संत अथवा प्रेम झाल्यावर

द्यायची तर रंगमंचावर वहावा दे
मी खरा नसतो कधी मेकप निघाल्यावर

सावलीचे झाड नेले वादळाने अन
का हबा ठेऊन बसला हात पाल्यावर?>>>>>जबरदस्त

एक नंबर हणमंतराव....
बरेच दिवसांनी "ह.बा." टच नवीन गझल वाचायला मिळाल्याने आनंद झाला.. (तोवर तुझ्या जुन्याच गझला परत परत वाचत होतो Happy )

सुंदर

द्यायची तर वाहवा दे रंगमंचावर <<<<असे वाचले
बाकी मला गझलेतले कळत नाही फक्त ही रचना फार फार आवडत आहे इतकेच समजते आहे
धन्यवाद