स्वस्तातल्या वृद्ध सेवा केंद्राबद्दल माहीती हवी आहे.

Submitted by मेधावि on 20 December, 2013 - 11:10

पार्कीन्सन्सचे निदान व नुकत्याच बेडरिडन झालेल्या माझ्या मैत्रीणीच्या आईला तिच्या सद्ध्याच्या वृद्धाश्रमाने घरी पाठवले आहे. मैत्रिण कमवत नाही. तिच्या २० वर्षाचा मुलाचे शिक्षण चालू आहे अजून. त्याचा खर्च चालू आहे. घरात एकटा नवरा कमवणारा. त्याचे उत्पन्न नाही म्हटले तरी ह्या सर्व खर्चाला पुरून उरणारे नाही. मैत्रीणीला ३ बहिणी आहेत पण त्या पण काहीही कमवत नाहीत. बेताचीच परिस्थिती आहे तिघींचीही. मैत्रीणीला महीना ६ हजार खर्च येतो आहे सध्याच्या वृद्धाश्रमाचा. त्याहून जास्त पैसे देणे तिला परवडणारे नाहीये. तर आता ह्या परिस्थितीत म्हातार्‍या बेडरिडन आईची सोय करण्यासाठी पुण्यापासून जवळचे स्वस्तातले शुश्रुशा केंद्र कोणाला माहीत आहे का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1) Aai Aadhar Kendra

(020) 41546010

C/O Gupte Nursing Home, Near Hotel Swagat, Sinhagad Road, Khadakwasla Research Station, Pune – 411024

2 )
Mauli Vrudhashram And Seva Susrusha Kendra
(020) 66823189
Niwara Bungalow Plot No 2 Sr No 31 Kundan Nagar, Near Gaurav Medical Store, Dhankawadi, Pune - 411043

3)Mothers Care Foundation And Rehabilitation Centres
(020) 66824352
103/104 Gagan Garima, Next To Mont Vert Prestine Complex, Khadki, Pune – 411003

4)
Shree Sai Sankalp Vrudhashram
(020) 41536987
Mauli,pune banglor highway, Near amit bloomfield project, Narhe Gaon, Pune - 411041

5)
Sparsh Old Age Homes
(020) 66822757
Sr No.16 Pawar Nursing Homes, Near SAI Siddhi Chowk Behind Bharti Vidyapeeth, Ambegaon Road, Katraj, Pune - 411046

6)
Jagruti Rehabilitation Centre
(020) 40016227
1st Floor, Omkar Park, Opp Krishi Tantra Vidhyalaya, Sitai Nagar, Hake Wasti, Pune Solapur Road, Hadapsar, Pune - 411028

सुमेधाव्ही माफ करा जरा वेगळा सल्ला देतोय, राग मानु नका पण जर उत्पन्न बेताचच असेल , पैसे उरत नसतील आणि मैत्रिणीला काही नोकरी नसेल तर नवरा , बायको व मुलगा मिळुन आज्जीचं नक्कीच घरी करु शकतील आणि महिना ६ हजार रुपये पण वाचतील जे त्या मुलाच्या शिक्षणाला उपयोगी येऊ शकतील.
अर्थात तुमच्या मैत्रीणीने ह्यावर विचार केलाच असेल पण तरीही सुचवावसं वाटलं ,कारण अशा ठिकाणी पैसा खुप खर्च होणार आणि स्वस्त ठिकाणी ट्रिटमेंट पण तशीच मिळण्याचे चान्सेस जास्त असतील.

सुजा, माहीतीकरता धन्यवाद.
श्री, तुम्ही सुचवलेला उपाय मीही सुचवला होता. परंतु गेली ५ वर्षे तिचा नवरा हा खर्च उचलत असल्यामुळे तो आता चिडचिडला आहे आणि राग राग करू लागला आहे. तिला ती भावनाही डाचते आहे. तिचे घरही खुप लहान आहे. आणि तिच्या सासूबाई आणि तिच्या आईचे बरीच वर्षे सांभाळलेले एक मोठे भांडणही आहे. बाकी बहीणी गरीब असल्यामुले त्यांना नाही म्हणणे सोपे आहे. पण आता हिने नाही सांभाळले तर अगदीच आईला रस्त्यावर सोडायची वेळ आलीये अशी भावना आहे मैत्रीणीला. मी पैशाची थोडीफार मदत तिला करु शकेन पण ह्या सगळ्या प्रकरणात लाँग टर्म मदत लागेल जी कोणीही बाहेरचा माणूस करू शकणार नाही कदाचित.

अस काही वाचल की मनाला वेदना होतात. गंभीर सामाजिक समस्येची जाणीव होते.उद्या ही वेळ आपल्यावर आली तर काय? असा विचार मनाला चाटून जातो.

नव्या पेथेतला निवारा व्रुद्धाश्रम चांगला आहे. निराधार व्रुद्धाना फ्री मधे पण घेतात.

मैत्रिण कमवत नाही >> माफ करा , पण अशी परीस्थिती आल्यावर मैत्रिण काही काम / पैसे मिळवण्याचा विचार करत नाहीये का ?

अस काही वाचल की मनाला वेदना होतात. गंभीर सामाजिक समस्येची जाणीव होते.उद्या ही वेळ आपल्यावर आली तर काय? असा विचार मनाला चाटून जातो. >+१

२० वर्षाचा मुलगा म्हणजे आईचे वय आणि काही अनुभव नाही हे बघता नोकरी मिळ्णे अवघड वाटते. जी मिळेल ती फार चांगली नसेल.

निवारा व्रुद्धाश्रम चांगला आहे. निराधार व्रुद्धाना फ्री मधे पण घेतात. > +१

निवारामधे निराधारांना घेतात फक्त. इथे तीन तीन मुली आहेत ना. मैत्रीणीला बरीच वर्षे मी काहीतरी उद्योग धंदा करण्यासाठी उद्युक्त करत होते पण ती तिच्या संसारात समाधानी होती व तिने ते कधी मनावर घेतलेच नाही. आता ५० व्या वर्षी काही करण्यासाठी तिच्यात उमेदच नाहीये.

Sumedha, I am in Pune dealing with my mums similar problem, she has some more complications. I have recently seen and visited many ashrams and I have a list of their names . I have send you an email. Please check it and call me and I will tell you what information I have.

घरून डबे देणे किंवा क्रेश चालवणे असे नक्की करू शकतील. मुलगा कुत्रे चाल्वणे व गैरे काम करू शकेल. नवर्‍यावर ओझे न टाकता थोडे त्यांनी मनावर घ्यायला हवे. बाकी बहिणी पण घरी ठेवू शकतील का ? माझी पण आजी बेड रिडन होती. आम्ही घरच्यांनीच केले त्यांचे. मेहनत व कष्टाची उमेद किती दिवस असते ?
जबाबदारी अंगावर आहे तर काही पावले उचलली पाहिजेत. मोटिव्हेट करून बघा त्यांना.

अमांशी सहमत! डबे करुन देणे नक्कीच करता येइल. प्रत्येकानेच थोडा हातभार लावायचाच असे ठरवले तर आर्थिक गणितही जमू शकेल. सुरुवातीला सवय नसल्याने थोडे कठीण वाटेल पण ठीक आहे ना. चार मुली असताना अशी आपली जबाबदारी समाजावर टाकणे पटत नाही.

घरबसल्या उत्पन्नाच्या मार्गांमध्ये डबे करून देणे, पोळ्या करून देणे, कँटिन्स/मेस ना तयार मसाले-लोणची पुरविणे, भाज्या निवडून चिरून देणे, शिकवण्या घेणे, छंदवर्ग घेणे, कागदी पिशव्या बनविणे, फराळाचे पदार्थ-मेतकूट-भाजण्या इत्यादी बनवून देणे, बेबीसिटिंग करणे, प्रूफरीडिंगची कामे घेणे इत्यादी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
परंतु तुम्ही त्या बाईंना जर उमेदच नाही असे म्हणताय तर मग अवघड आहे.
बचतगटांत सामील होऊनही त्या उत्पन्नाचा मार्ग शोधू शकतात.

तातडीच्या गरजेसाठी त्यांनी स्वस्तातला वृद्धाश्रम / केअर होम शोधले तरी तिथे पेशन्टची आबाळ झाल्यास पुन्हा सर्वांनाच त्याचा त्रास होऊ शकतो. चांगल्या केअर होमला पर्याय नाही. किंवा एका बहिणीकडे पेशन्टला ठेवून बाकीच्या तिघी बहिणींनी आळीपाळीने तिथे जाऊन - राहून त्यांची शुश्रुषा करणे हेही शक्य आहे.

सदर बाईंच्या घराजवळ एखादी खोली भाडोत्री तत्त्वावर मिळाल्यास तिथेही त्यांना पेशन्टला ठेवता येईल व येऊन जाऊन पेशन्टचे करता येईल. मात्र अशा पेशन्टजवळ कायमस्वरुपी कोणीतरी हवेच!

सदर बाईंच्या घराजवळ एखादी खोली भाडोत्री तत्त्वावर मिळाल्यास तिथेही त्यांना पेशन्टला ठेवता येईल>>>>> भाडे त्यांना परवडेल असे मला नाही वाटत.कारण १५००/- भाडे लहान खोलीला आहे.

sadhya tari aailaa ekaa garib bahinikade thevun tila 6 k denyachi soy karayache tharale ahe. dusare mhanje satarya chya javal kahi kami kimatitale vruddhashram aahet. ata tithe soy hoil ase vatate ahe bahutek. ekundar paristhiti avghad ahe. tila umed nahiye ani ata laj pan vatatiye...tila kitihi motivate karayacha prayatna kela tari tyatun nishpanna hot nahiye kahi..tyamule far kahi karata yenyajoge disat nahiye.

आम्ही राहतो त्या भागात पण एक वृद्ध वेडसर महिला फिरत असते .
तिची वरील पैकी कोणत्या वृद्ध सेवा केंद्रात कुठे सोय होवू शकेल काय ?
धाग्यापेक्षा वेगळे आहे पण इथेच विचारते .

स्वराली, फोन करुन चौकशी कर. त्यांच्याकडे सोय झाली नाही तरी ते इतर कुठे होऊ शकेल याबद्दल कदाचित माहिती देऊ शकतील.

>>लाज वाट्ते?>> पटले नाही. माफ करा.>> +१

मैत्रिण कमवत नाही >> माफ करा , पण अशी परीस्थिती आल्यावर मैत्रिण काही काम / पैसे मिळवण्याचा विचार करत नाहीये का ?>> +१
आईसाठी म्हणुन तरी करावचं.

<<लाज वाट्ते?>> मलाही नाही पटले, कसली लाज वाटते? इतका काळ न करण्याची की ह्या वयात काही सुरू करण्याची?

<<घरबसल्या उत्पन्नाच्या मार्गांमध्ये डबे करून देणे, पोळ्या करून देणे, कँटिन्स/मेस ना तयार मसाले-लोणची पुरविणे, भाज्या निवडून चिरून देणे, शिकवण्या घेणे, छंदवर्ग घेणे, कागदी पिशव्या बनविणे, फराळाचे पदार्थ-मेतकूट-भाजण्या इत्यादी बनवून देणे, बेबीसिटिंग करणे, प्रूफरीडिंगची कामे घेणे >> हे सगळे करताना त्यात जर मदत हवी असेल मार्केटींगला तर मुलाला सोबतीला घेता येते.

नवर्‍यची चिडचिड होणे साहजिक नाही का? तो म्हणेल तुला तीन बहिणी असताना मी एकटाच का खर्च पेलू? त्यांना पैशाची मदत करू आपण पण सांभाळायला तरी सांग बहिणींना.

<<आईसाठी म्हणुन तरी करावचं.>> हे तर अगदी नक्की. शिवाय पुढे स्वत:ची अशी अवस्था झाली तर मुलावर भार नको किंवा मुलाला हात्भार म्हणून करायलाही हरकत नाही.

खरतर मला नवल वाततं अशांचं. स्वतःवर जबाबदारी येऊ शकते कसलीही, ह्याचा विचारच कसा येत नाही मनात. आम्ही संसार सांभाळतो म्हणत पैशासाठी पूर्ण्पणे नवर्‍यावर अवलंबून राहायचं. आणी उद्या नवर्‍याची कमाई कमी झाली म्हणजे?

tiche vichar mala dekhil patale nahit. mi fakt te lihile ahet. tila hyahun jast samjavane shakyach nahiye...sapurnapane hat pay galun basalelya mansala motivate kase kartat?

सध्याची सोय झाली हे ठीक झाले, पण ह्यावरून त्या बाईंनी धडा घ्यावा हे उत्तम! त्यांच्या म्हातारपणात त्यांना काही वैद्यकीय सोयी, उपचार, शुश्रुषा करावी लागली व त्याचा खर्च करण्यास कोणी तयार नसले तर त्यासाठी का होईना, पण स्वतःपुरती आर्थिक तजवीज करायला सुरुवात तरी करावी. अजून किमान दहा-बारा वर्षे तरी त्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे अर्थार्जन करू शकतात. अर्थात त्यांना हातपाय गाळून इतरांची सहानुभूती मिळवत कित्ती मी बिचारी करत स्वतःला आंजारण्या-गोंजारण्यात सुख मिळत असेल तर त्यांना कोणी काहीच मदत करू शकत नाही.

मैत्रीणीच्या घरी तिची सासू आहे. सासू व आई ह्यांचा ३६ आकडा होता व आहे.. मैत्रीण ज्या घरात रहाते ते घर पण सासूचे आहे. आणि सासूला सांभाळले नाही तर घरही मिळणार नाही अशी तिला भिती आहे. मैत्रीणीला काही वर्षांपूर्वी पाळणाघर काढ व तिथे पहिली अ‍ॅडमिशन माझ्या मुलीची करून घे असे सुचवले होते तेव्हा ती तयार झाली होती परंतू तिच्या सासर्‍यांनी त्यास विरोध केला होता की आमच्या घरात हे असले काही करायचे नाही असे सांगितले होते. लग्नापुर्वीच्या काळात तिची चालू असलेली नोकरी नवर्‍याने त्याला त्याच्या बायकोने घर सांभाळायला हवे आहे म्हणून सोडायला लावली होती. इतकी वर्षे (तरुणपणीची व उमेदीची)अवलंबून रहायची सवय झाली ....पंख कातरले गेले..त्यामुळे आता तिला कॉन्फिडन्स उरला नाहीये.

ही परिस्थिती पाहून अगदी कळकळीने सांगावेसे वाटते सगळ्या मैत्रीणींना. कोणालाही आयुष्यात कधीही मिळवण्याची गरज लागू शकते त्यामुळे फक्त नवर्‍यावर अवलंबून राहू नये आता कोणीच. स्वतःच्या पायावर उभे रहाणे अगदी प्रत्येक माणसासाठी फार फार आवश्यक आहे.