९६९, ओल्ड चर्च स्ट्रीट

Submitted by स्वप्नाली on 19 December, 2013 - 18:17

मंगेश ला नवीन प्रॉजेक्ट मिळाला म्हणून तो खूश होता. घरी येताच त्याने मानसीला मिठीत घेऊन सांगितले,
"मला टीम लीड चा रोल मिळाला आहे. खूप चॅलेंजिंग काम असणार आहे. आपल्याला पुढच्या आठवड्यातच शिफ्ट ह्यायचे आहे, तेव्हा तू पकिंग करायला लाग." आणि तो फ्रेश ह्यायला आत निघून गेला.

मानसीला तर काय बोलावे कळलेच नाही. सध्याच्या ठिकाणी येऊन तिला 2 वर्षे पूर्ण होत आली होती. 2 वर्षापूर्वी डिसेंबरच्या थंडी मध्येच ती US ला आली होती. लग्न झल्यावर 15 दिवसांची सुट्टी संपवून मंगेश US ला परत आला होता आणि मानसी वीसा करण्यासाठी थांबली होती. वीसा चे काम पूर्णा झल्यावर, सगळ्या मैत्रिणिना आवर्जून भेटून मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. US ला आल्यावर फारशी कोणाची ओळख नसल्यामुळे दिवसभर घरमधे कंटाळून जायची ती. हळुहळू ओळखी झाल्या, बोलघेवड्या स्वभावामुळे समवयस्क मैत्रीणिंमधे लौकरच रमुन गेली. मंगेश ही तिला वेगवेगळ्या प्रेक्षणीय ठिकाणी नेऊन खूष ठेवत होता. आता हे सगळे सोडून पुन्हा नवीन ठिकाणी जायचे म्हणून जरा नाराजीनेच समान पॅक करायला चालू केले तिने.

नवीन गाव तसे छोटेच होते. सुरुवातीला घर मिळेपर्यंत हॉटेल मधे राहायची सोय मंगेश च्या कंपनी ने केली होती. "ग्रीन्स कॉटेज" तसे छोटेच पण टूमदार असे हॉटेल होते. तिथे फारशी वर्दळ ही नव्हती. हॉटेल असल्यामुळे रोजचा स्वयंपाक, साफ-सफाई अशी कामेही नव्हती मानसीला. मंगेश सकाळीच तयार होऊन ओफ्फिस ला जात असे, आणि दिवसभर मानसी एकटीच टीवी पाहत बसे.

अचानक एके दिवशी पहाटे खूप थंड वारे रूम मधे येऊ लागले. मानसीला तर हूड हूडीच भरली. तिने कसेबसे मंगेश ला उठवले. त्याने सगळ्या खिडक्या नीट चेक करून पहील्या, तर एक खिडकी उघडी होती. त्याला जरा आशचर्यच वाटले. रात्री झोपताना तर सगळ्या खिडक्या नीट बंद होत्या. हा डिसेंबर महिना असल्याने स्नो चालू झाला होता, तरी ही खिडकी कशी काय उघडली? त्याने ती बंद केली, तशी थंडगार झालेली रूम हीटर मुळे पुन्हा उबदार होऊ लागली. पहाटेची वेळ असल्याने दोघेही पुन्हा झोपी गेले, आणि सकाळी मंगेश उठून, तयार होऊन ओफ्फिस ला गेला. पुन्हा सलग पुढच्या दोन पहाटे तोच प्रकार. हॉटेल मॅनेजर ला तक्रार करावी तर, तेव्हाच कळले की नवीन घरचा ताबा मिळाला आणि त्या दोघानी झाल्या प्रकाराबद्दल फारशी चर्चा न करता, नवीन घरा मध्ये शिफ्ट केले.

"हे गाव तसे खूप जुने वाटते ना..आणि फारशी वर्दळ ही दिसत नाही.." - मानसी

" हो ग, ओफ्फिसमधले एक सहकारी सांगत होते की या गावातले फॉल कलर्स खूप सुंदर दिसतात. आपण सुट्टीच्या दिवशी थोडे बाहेर जात जाउ म्हणजे तुला ही बरे वाटेल आणि US मधले villages कसे असतात ते ही आपल्याला पाहायला मिळेल. पण..." -मंगेश

"पण काय..?"

"न..नाही, काही नाही.." म्हणत मंगेश ने चहा संपवला आणि 'अंधार पडायच्या आत घरी परत येत जा' ही त्या सहकार्याने सांगितलेली सूचना त्याने मानसी ला सांगायचे टाळले.

"मला इथे कोणी मैत्रिणी मिळतील असे वाटत नाही, त्यामुळे दिवसभर कंटाळा येतो, म्हणून मी पेण्टिंग शिकावे असे वाटते आहे. परवा समान लावताना, मला एका शेल्फ मधे एक जुना न्यूज़ पेपर सापडला, त्यात एका आर्ट्स क्लास ची जाहीरात दिसली, चौकशी करून पाहू का?" - मानसी.

"तुला पेंटिग करायला आवडते हे कधी संगितालेच नाहीस..असु दे...तू कर चौकशी, मग आपण येत्या शनीवारी जाउ. त्यांचा पत्ता घ्यायला विसरो नकोस", मंगेश ने मानसी च्या दिवसभरच्या एकटेपणा बद्दल् काळजी वाटून म्हटले.

" हो रे, मलाही कधी वाटले नाही, की मी पेण्टिंग करू शकेल म्हणून..शाळेत असताना तर नेहमी चे "पावसाळ्यातील एक दिवस" हे चित्र सुद्धा मला काढायला जमायचे नाही. खूप पाउस आलाय आणि सगळे वाहून गेलेय, असेच काही तरी काढायचे मी चित्र आणि मला आमचे चित्रकलेचे सर नेहमी रागावयाचे" - मानसी.

"हा हा हा...मग आता तुला शिकावे वाटत असेल चित्र काढायला तर जॉइन कर तो आर्ट्स क्लास, तेवढाच तुझा वेळ ही चांगला जाईल.." – मंगेश

मानसी ने लगेच दुसर्या दिवशी दिलेल्या नंबर वर फोन केला, (---)-969-6996, 'कितती 9 आणि 6 आहेत या नंबर मध्ये..' मनाशी म्हणत नंबर डायल केला.

"hello, how may i help you?"

"May I speak with Mr. Mathew please?" - मानसी.

2 वर्षयांच्या US मधल्या वास्ताव्यामुळे आणि टी वी वर भरपुर इंग्लीश मूवीज पहील्यामुळे मानासीला इथली भाषा आणि शिष्टाचार यांची चांगलीच ओळख झाली होती.

" Yes, this is Mathew speaking.."

" I want to check about the Arts class. May I come and meet you this Saturday, 2pm?" -मानसी.

"Ummm...You sound to be new here, are you sure, you want to come?"

"Yes. May I have your address please?"

" Its 969, Old church street..."

'पुन्हा 9 आणि 6..' मनाशी म्हणत मानसीने फोन ठेवला आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली. हे गाव US च्या नॉर्थ साइड ला असल्याने इथे खूप थंडी आणि स्नो होता. त्यामुळे कितीही ठरवले तरी प्रत्येक सुट्टीच्या दिवशी बाहेर जाणे शक्य होत नव्हते. पण ह्या शनीवारी Mr. Mathew ला नक्की भेटायचे तिने ठरवले होते. का कुणास ठाऊक, पण तिला Mathew हे नाव एका वाळलेल्य maple झाडाच्या पानावर लिहीलेले कुठेतरी पाहिल्या सारखे वाटत होते..

ठरल्याप्रमाणे मंगेश आणि मानसी बाहेर जाण्यास निघाले, गाव तसे छोटे असल्याने GPS ची फारशी गरज नव्हती, तरी मंगेश ने मानसी ने संगितलेला आर्ट्स क्लास चा पत्ता GPS मध्ये टाकला, पण काही केल्या त्याला तो पत्ता मिळेना.

"अरेच्चया, असे कधी होत नाही खर तर, चला मॅडम तुमचा आर्ट्स क्लास शोधुया" म्हणत मंगेश GPS बंद केले आणि गाडी चालू केली.

"हा रस्ता तर आपण राहिलो होतो त्या "ग्रीन्स कॉटेज" कडे जाणारा वाटतोय ना.." मानसी.

"डावीकडे टर्न घेतल्यावर आपण old Church Street वर येऊ. आता आपल्याला घर नंबर 969 शोधायचा आहे." - मंगेश.

"हे बघ, 965, 966, 967, 968, 970,.....980...1000, ग्रीन्स कॉटेज, मग 969 घर नंबर गेला कुठे?" मानसी

"अग, चुकुन मिस झाला असेल, यू-टर्न घेऊन येऊ आणि पुन्हा नीट शोधू" म्हणत मंगेश ने गाडी वळवली.

पुन्हा 965, 966, 967, 968...970...980...1000 ग्रीन्स कॉटेज, असे 3 वेळा झालयावर मात्र मंगेश वैतागला. पुन्हा ते ग्रीँन्स कॉटेज च्या समोर आले होते.

"आपण इथे आलोच आहोत तर, या हॉटेल च्या स्टाफ ला विचारू या का? इथला स्टाफ या गावाचे राहीवासी वाटतात, ते आपली काही मदत करू शकतील पत्ता शोधायला..." - मानसी.

"Hello Ms Mary, how are you doing? We stayed in this hotel in room number 69 for a week a month ago, remember ? " - मंगेश

"Yes, of course, how are you doing?" -Ms Mary

"Very well, thank you. We are planning to meet Mr. Mathew, the arts class owner. We are looking for this address, hope you will be able to help us to find it..." म्हणत मंगेश ने मानसी च्या वळणदार अक्षरामध्ये लिहीलेला कागद मेरी कडे दिला. मेरिने आपला चष्मा डोळ्यांवर लावून पत्ता नीट वाचला आणि एकदा मानसी-मंगेश कडे कटाक्ष टाकत म्हणाली,

"You have been a very nice couple. Listen to me child, another storm is going to start soon today, so go home safe, May GOD bless you.."

"But what about the address...?" मंगेश.

"Hmmm...there is no such address present in this town. Mr. Mathew was a great artist. He used to visit Greens Cottage regularly. He had a strong desire to start an Arts Class in this town, but he passed away 9 years back...This town still remembers his paintings. The room number 69, that you stayed in, is decorated with his famous painting, "The lonely Maple Tree" ...."
मेरी ने चष्मा काढून टेबलावर ठेवला आणि छातीवर क्रॉस करत, काहीतरी पुट पुटत आत निघून गेली.

मंगेश आणि मानसी सुन्न होऊन ग्रीन्स कॉटेज च्या बाहेर पडले आणि तेवढ्यात रूम नंबर 69 ची खिडकी धाडकन उघडली, तिची काच बाजूच्या भिंतीवर आदळुन खळकन फुटली......

- समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठीक ठीक!
इंग्रजी मुळे रसभंग होतो. ते संवादही देवनागरीमध्ये दिले तर बरे.
अजून जरा रहस्य गडद करायला हवे होते.
नुस्त्या दोन गाडीच्या चकरात काय रहस्य सोडवताय?

काही कुणी फार घाबरले नाही, टोल पडले नाहीत, सावल्या दिसल्या नाही, कुणीतरी आल्याचे भास झाले नाही, नायिका रात्रीची एकटी राहिली नाही.

जरा करा की झणझणीत मसालेदार कथा!
पोटेंशियल आहे त्यात.

स्वप्नाली >>>

फारच छान !!
पहिला प्रयत्न आहे असे अजिबात वाटत नाही....सुरेख मांडणी !! पु. ले. शु.

थोडी अजून फुलवायला हवी होती. गूढ कथेत धक्का अपेक्षीत असतो. तसा धक्का नाही जाणवला. पण लेखन आवडले. लिहीत रहा.

बाबो... खतरनाक... दिवसा ढवळ्या ऑफिसमध्ये घाबरायला झाले.
मि. मॅथ्यू हयातच नाहीत... सॉलिड धक्का बसला.
झकास..झणझणीत भितीचा तडका.

पत्त्ता सापडत नाही म्हंटल्यावर मला संशय आला होता. पण चांगली लिहीली आहे. अजून खुलविता आली असती. Happy