मध्यप्रदेश सहल

Submitted by प्रितीभुषण on 19 December, 2013 - 06:08

माझे आई बाबा मध्यप्रदेश सहल करायचे ठरवताय
तर
१> मुंबई वरुन कोण ती ट्रेन त्याना सोपी होईल[[ नेट वर खुप सारे ओप्श् न आहेत म्हणुन इथे विचारत आहे
२> कोणत्या भागात जास्तीत जास्त बघायला मिळेल
३> राहाण्याचे सोय

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रेनचे माहीत नाही, पण पहाण्यासाठी इन्दौर, उज्जैन मध्यवर्ती पडतील. इन्दौरमध्ये बरेच काही पहाण्यासारखे आहे. खाण्याची रेलचेल आणी सोय पण. उज्जैनला महान्काळेश्वर आहेच. हे जवळ जवळ असल्याने मध्यवर्ती रहाण्याचे फायदे होतील.

बाकी सुलेखा आणी इतर मध्यप्र. रहिवासी माबोकर माहिती देतीलच.

वेस्टर्न रेल्वेवर असाल तर अवंतिका एक्स्प्रेस : इंदूरला . इंदूर, मांडू, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर.
तीन-साडेतीन तासांत कारने भोपाळ. (शेवटची तीन तीर्थक्षेत्र म्हणून, मांडू एक संपूर्ण दिवस लागेल.)

सेंट्रल रेल्वेवर भरपूर ऑप्शनस असतील.
जबलपूर किंवा भोपाळ फोकल पॉइंट करता येईल. जास्त पर्यटनस्थळेही याच भागात आहेत.बेडाघाट, खजुराहो, पंचमढी, सांची, बांधवगड अनेक जागा आहेत.

मध्यप्रदेशा त बघन्या सारखि ठिकाण बरीच आहे म.प. टुरिझम च्या वेबसाइट वरुन माहीती मिळेल.
पचमढि, पेंच, कान्हा, हे सुध्दा एका ट्रिप मधे होइल. नागपुर वरुन जवळ पडेल

जबलपूरच्या आसपास बघण्यासारखे काय काय कव्ह्त होऊ शकते?<<<<<<<<
जबलपूरहून भेडाघाट, कान्हा, बांधवगड जवळ आहे. कान्हा, बांधवगडला जंगल सफारीसाठी किमान २ दिवस राखुन ठेवावेत. कान्हा आणि बांधवगडला वाघ बघणे हाच एकमेव उद्देश असेल तर मे-जून उत्तम. जंगलाचा अनुभव घ्यायचा असेल तर हिवाळा ठीक. पावसाळ्यानंतर हिरव्यागार जंगलात वाघ स्पॉट करणं जरा कठीणच असतं. त्यामुळे हिवाळ्यात वाघ दिसणं नशीबावर जास्त अवलंबून.

प्रिती, आईवडिलांचं वय ६० च्या आसपास असेल असं गृहित धरुन सांगते, त्या दोघांनीच जाऊन सगळी व्यवस्था करण्यात (रहाणे/जेवण्/स्थलदर्शन) वेळ आणि एनर्जी घालवण्यापेक्षा एखाद्या ट्रॅव्हल कंपनीमधून गेले तर सगळी स्थळं निश्चिंतपणे बघता येतील. शेड्युल विस्कळीत व्हायचे चान्सेस कमी.

ते तर करावंच लागेल.... तरीही.... प्लॅन एक्झिक्यूट करणं हे देखिल आलंच की! मला आपली कुणाचेही आईवडिल/सासूसासरे (एकंदरच वयस्कर होऊ घातलेली माणसं) असले की उगाचच काळजी वाटते (स्वभावाला औषध नाही)....असो... मस्त होऊ दे त्यांची ट्रिप Happy