सहअंदोल (सहंदोल,संदोल)

Submitted by अज्ञात on 3 December, 2008 - 07:46

अंदोल एक संदोले द्विज जणु तानपुर्‍याची तार
तरफेस षड्ज झंकार; घुमे हृदयात शुद्ध ओम् कार

अस्पर्श कंपने हवेत; हा प्रतिसादाचा हुंकार
निराकार आकार होतसे अनंतात साकार

स्वरसमाधीत संमोहित मन; प्रतिबंध निराधार
अस्तित्व विरघळे सढळ; नितळ हा स्वर्गातिल दरबार

......................अज्ञात

गुलमोहर: 

सहंदोल म्हन्जे संदोल हे आवडल

मला आनखी काय सुचतए ते बघा

सह + अर्थ = सार्थ
(पैसाबद्दल बोला काहितरि तर्च कहि अर्थ आहे)
सह + ई = सही
(इंटर्नेट वापरून काहिहि केर्ले तरि ते बरोबर आस्ते)
सह + ईसलामत
(कहि तरि भयानक ईमेल करून्हि सुरक्स्जित राहने)
सह + अमन = सामान
(शांतिने काहिहि केले तर त्याला सामान म्हनावे)
सह + उदर = सहोदर
(सहा पोटे अस्नाराला आपला भाउ म्हानावे)
सह + उंडगा = सांडगा
(उंडग्या व्यक्तिसोबत काहि पदार्थ तयार केला तर तो सांडगा)
सह + अनू = सानू
(अनू मलिक सोबत गायलेले गाने नेहेमी कुमार सानूनेच गावे)
सह + अली = साली
(अली सोबत राहनारी)
सह + आइना = साईना
(आरशासोबतच सतत अस्नारी)

अजुन बरेच सुचते आहे, पन मि काय म्हंतो कि तुह्मिच रसग्रहन केले तर उरलेलि कविता पन कलेल.

बाकि 'निराकार आकार होतसे अनंतात साकार' हे पन खुब आवडले, पन त्य्ताचा अर्थ काय होतो?

raw म्हणजे कच्चा, बरोबर ना ? प्रतिसादावरून वाटल म्हणा.
तुमचं व्याकरणाचं ज्ञान चांगल आहे. एवढी शब्दफोड जमली मग रसग्रहण जमायला हरकत नव्हती.
पंडीत भिमसेन जोशींच गाण ऐकलतं का कधी ? किंवा लताजींच तरी. नसेल तर एखाद गाण ऐका अशा एखाद्या थोर विभुतीचं आणि नुसतं कानाने नको मनानेही ऐका. कविला काय म्हणायचयं ते सहज उमगेल तुम्हाला.

raw म्हणजे कच्चा, बरोबर ना ? Happy Happy पण लिहायला पक्का वाटतो अगदी !

सह + अनू = सानू
(अनू मलिक सोबत गायलेले गाने नेहेमी कुमार सानूनेच गावे) Happy

गृहपाठ : फोड करा..

साव, साभार ,सावळा,सागरगोटा, साकळलेले ५ गुण

रिसर्च एंड एनालिसिस विंग असावे बहूतेक. तरी शेवटी अर्थ-'कच्चा'च.. Proud
कौतूकला अनूमोदन. 'रॉ' यांनी 'थोर' विभूतींचे ऐकले, वाचले पाहिजे.

--
.. नाही चिरा, नाही पणती.

फ अंदोलन असा एक शब्द आहे ना..? त्याचा नातेवाईक असेल हा असं वाटतंय.

~~~~~~~~~

मीनू, धन्यय! अगं, संस्कृतातल्या ’आन्दोल्‌ - आन्दोलयति’ या दशम गण परस्मैपदी धातुवरून ’आंदोलन’ असं सामान्यनाम बनलं आहे - ’अंदोलन’ नव्हे.
असो. मला तो शब्द बुचकळ्यात पाडून गेला, म्हणून मी विचारलं.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

कविता वगैरे प्रकारातले मला फारसे काही कळत नाही. परंतु मी नेटाने कविता वाचतो. ही कविता वाचता वाचता मला एकदम त्याच्या अर्थाचा खालीलप्रमाणे साक्षात्कार झाला (९९% वेळा मला कविता कळतच नाहीत). आता मला अभिप्रेत असलेला अर्थ कवीलादेखील अभिप्रेत असेल असे नाही. अर्थात पद्य ह्या साहित्यप्रकाराची खूबीच आहे की निर्मात्याच्या मनात असलेली भावना आणि त्याचे पद्याच्या मार्फत झालेले प्रगटीकरण हे जेव्हा वाचकाच्या पर्यंत पोहोचते तेव्हा वाचकाला त्या प्रगटीकरणाची स्वतःच्या अनुभवांच्या परीघानूसार अनुभूती घेण्याची संपूर्ण मुभा असते. किंबहुना पद्याचे हे व्यवच्छेदक लक्षण मानायला हरकत नसावी. आणि हेच लक्षण पद्याला सामान्य गद्य कलाकृतींपासून अधिक वरच्या पातळीवर नेउन ठेवते.

तर नमनाला घडाभर तेल घेउन मी मला उमजलेले वरील काव्याचे रसग्रहण करतो:

------------------------------
कुणीतरी एका कानाखाली वाजवली आणि लगेच दुसर्‍या पण कानाखाली वाजली.. अश्या एकामागोमाग एक दोन आवाज कानाखाली निघाल्याने, जणु तानपुरा जसा वादकाच्या किंवा गायकाच्या षड्जाच्या जरासा मागे सूरात रेझोनेट होतो तसा कानात घूंघूं असा आवाज रेझोनेट होउ लागला.. ह्या अनुभवाची अनुभूती होते न होते तोच छातीत एक गुद्दा हाणला गेला (ह्याला knocking the wind out असे म्हणतात) आणि जणु काही ओम््काराच्या अ, उ आणि म् ह्या तीन भागांचा सुस्पष्ट आणि खणखणीत (कवीने ह्याला शुद्ध असा शब्द वापरला आहे) आवाज छातीत घुमला..

पण तरीही मी उरलेली शक्ती एकवटून प्रतिकार करण्यासाठी हाताने बुक्क्या मारायचा प्रयत्न केला.. पण गलितगात्र झालेल्या शरीरातून निष्प्राण हात हवेत नुसतेच फिरले.. डोळ्यासमोर अंधारी येत गेल्याने, ज्यानी कानाखाली वाजवल्या व छातीत गुद्दा घातला तो मनुष्य अस्पष्ट होत नाहीसा झाला.

मी शरीरातील शक्ति जावून ग्लानीत जमिनीवर कोसळलो. शरीराच्या वेदनांमुळे आलेल्या गुंगीत जणु काही शरीराचे वजन नाहीसे झाले आहे आणि पिसासारखा उडतोय असा भास होवू लागला. ग्लानीमुळे विचारशक्तीवरील ताबा हळुहळु सुटत गेला, जणुकाही शरीरातून आत्माच निसटत गेला. आता जगत नाही असे मनाला वाटू लागले आणि एव्हडा मरेपर्यंत मार खाल्ला तरी मेलो तर स्वर्गातच जावू अशी दुर्दम्य आस आयुष्यभर बाळगल्याने सभोवतीच्या वातावरणात जणु स्वर्गाचाच भास होवू लागतो.
----------------------------------------------

रसग्रहण वाचून माझा आता रसग्रहणातला नायक झालेला आहे. टण्या माझा स्वर्ग असावा बहूतेक. (सह + वर्ग). एकाच वर्गात, एकाच मास्तरांनी शिकविल्यामूळे टण्याही माझ्यासारखाच हुशार झाला आहे.
असो. या स्वर्गानुभूतीतून बाहेर आल्यानंतर बाकीचे बोलतो.

--
.. नाही चिरा, नाही पणती.

अरे खरंच की तसंही अजून एक शंका होती.
स + अंदोल म्हणजे 'सांदोल' व्हायला हवं ना (स + अवधान = सावधान, स + अश्रु = साश्रु )

फ! त्या केसमधे आंदोले सांदोले बरोबर जमतंय की.. Happy
~~~~~~~~~

सुरेख सुरेल कविता आणी मग प्रतिसादाचा गोंगाट! अरसिकग्रहण नावाचा शब्द मराठीत आहे का? असायला हवा!

<<भ्याडांचा माज, शिखंडी बाज,
आलेच कसे या धरी ?
बोलविते ते धनी, आहे जे कुणी,
खात्रीने मुर्ख शंभरी
चाळलाच असता, इतिहास नुसता,
नसतेच चढले पायरी
पवित्र भुमी, ठेचतेच कृमी, आहे नोंद काळपर्वाची >>

<<या अशा षंढ पाकात
हिरवी पिलावळ, फक्त वळवळ,
ही एवढीच औकात
नेस्तनाबुत, करण्या हे भुत
पुरे एक आघात
जाहले बहूत इशारे, फुरफुरणारे, छाटावी जात गारद्यांची>>

तुझ्या कुठल्याही काव्याचा माझ्याएवढा छान उपयोग कोणी केला नसेल कौतुका.

सस्नेह...

विशाल.

कसे हे उखाणे असे दीनवाणे
सुखाच्या घडीला उदासीन गाणे
पडे का करंटे पाहुनी उताणे
नवी पालखी अक्षतांचे वटाणे

भिती सावजाची नि व्याध बावळे
मती मंद अंधापरी वेध घेती
फुकाचेच बाण अन फुकाच्या कमानी
वायफळ दंगा उठे आसमानी

धुक्याचेच डोळे संवेदना अशक्त
कान गर्दभाचे स्वरे डोमकाक
रिपू दानवी कोळसा अंतरंग
कळावे कसे मानवाचे अभंग ??

अंदोल या शब्दाचा अर्थ काय? स + अंदोल सांदोल व्हायला हवं ना?
असे दोन तांत्रिक प्रश्न आहेत त्याची उत्तरं काय आहेत?
~~~~~~~~~

ही कवीता वाचुन फिजीक्स मधील waves and oscilations आठ्वण येते.

-हरीश

अज्ञात, सुंदर कविता आहे. मी शेवटच्या ओळीस अडखळले, मात्र. अस्तित्वं आणि दरबार... विशेषतः 'दरबार'...

दाद,

तुमच्या उपस्थितीमुळे खूप आनंद वाटला. Happy

स्वरसमाधीत संमोहित मन; प्रतिबंध निराधार
अस्तित्व विरघळे सढळ; नितळ हा स्वर्गातिल दरबार

आधी सांगितलं त्याप्रमाणे, ज्या वेळी "उत्तम ट्युनिंग"(ट्युनिंग कुणाचंही,- स्वरांचं, व्यक्तींचं किंवा वृत्तींचं, ज्याला अंतराचं, स्त्रीपुरुष भेदाचं, जातीजमातीचं, वयाचं अथवा स्पर्शाचं बंधन नसतं) होतं त्या वेळी स्वर आणि संवेदना "अस्पर्श-एकजीव-एकरूप" झालेल्या असतात. अशा संमोहित अवस्थेला कुठलाही प्रतिबंध आड येऊ शकत नाही आणि त्यांचं "वस्तुनिष्ठ(फिजिकल) द्वैत अस्तित्व" नकळत सढळपणे विरघळतं (हीच समाधी). स्वर्गाचा दरबार ह्यापेक्षा काय वेगळा असु शकतो ?

..................अज्ञात

अज्ञातजी,

मी ही सुरुवातीला इथेच अडखळलो होतो, पण नंतर कौतुकने समजावुन सांगितलं...पुढे त्याने हे ही सांगितलं की तोंड फक्त त्याचं आहे, शब्द आणि विचार पुन्हा तुमचेच आहेत.
आता तर तुमच्याकडुन व्यवस्थित अर्थ समजला, हे सगळं खुप वरच्या पातळीवरचं आहे, त्यामुळे समजायला उशीर लागला, पण थोडा मेंदु शिणवल्यावर समजलं, आणि जेव्हा समजलं तेव्हा मेंदुला त्रास दिल्याचा मनापासुन आनंद झाला.

सस्नेह...

विशाल.

बहोत अच्छे, अज्ञात! धन्स. अर्थ काहिसा असाच सापडत होता. फक्तं 'दरबार' ह्या शब्दाचा संबंध काहिसा 'अधिकार, सत्ता, संपन्नता, विलास' ह्याचं 'दाखवणं' असल्यासारखं असल्याने... इतक्या नितळ अवस्थेला "दरबारी" का बरं उभं केलं असेल असं वाटलं.... अजून वाटतय Happy
स्वर्गाचा झाला तरी 'दरबार' म्हटलं की डिस्प्ले आला.... म्हणून अडखळले Happy

दाद,

त्या नितळ अवस्थेला दरबारी उभं नाही केलं, तर "ती अवस्थाच स्वतः स्वर्गातिल दरबार झालीय (अधिकार, सत्ता, संपन्नता, विलास यांचा परमोच्च बिंदु) !!" असं अभिप्रेत आहे. Happy

.....................अज्ञात