मायबोली गजबज - लेटेस्ट अपडेट्स - १५.११.२०१५

Submitted by बेफ़िकीर on 18 December, 2013 - 14:03

नमस्कार!

२५ जुलै २०१२ रोजी प्रकाशित झालेल्या मायबोली बुजकुज या आढाव्यानंतर तब्बल दिडएक वर्षाने आपल्यासमोर 'मायबोली गजबज' हा धागा सादर करताना आमचा गळा दाटलेला आहे, आम्ही गहिवरलेलो आहोत. अनेक चांगल्या वाईट घटनांनी गजबलेले हे अठरा महिने म्हणजे जणू सलग दोन बाळंतपणांचा बोजाच होता. रोज उठावे आणि बघावे तर एक नवीन धागा पेटलेला असे. कालवर जे गळ्यात गळे घालून एकमेकांच्या अभिप्रायांवर स्मितहास्याच्या टिकल्यांचा वर्षाव करत ते आज खुनशीपणे फुत्कार सोडत आहेत असे दृष्य दिसे. येथील अस्तित्व टिकून राहावे ह्या आंतरिक इच्छेने वर्षानुवर्षाची वैरे वरवर मिटल्यासारखे भासवून काही आय डी मैत्रीचा करुण टाहो फोडताना दिसले. पार्ले या शब्दाने हैदोस घातला. पार्ल्यातल्या गप्पा, पार्लेकरांच्या गप्पा, पार्ल्यावरच्या गप्पा, पार्ल्याविरुद्ध गप्पा व टी पार्टी पार्ले असे अनेक धागे ऑफिशियली व अनऑफिशियली निर्माण झाले. मायबोलीकर महिलांमध्ये पडलेली ही फूट अवाक करणारी ठरली. 'एक महिला एक पान' अशी भयावह परिस्थिती लवकरच येईल असे काही वडीलधार्‍यांचे म्हणणे पडले. गावाच्या नावाने असणार्‍या पानांचे 'भलत्याच गावातल्या लोकांनी ते पान चालवणे' हे वैशिष्ट्य मात्र कायम राहिले. यात पुण्यातील पुणेकर व आम्ही कोल्हापूरी ह्यांनी पहिले पारितोषिक विभागून पटकावले. मायबोलीवरील सुसंवादांमुळे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मिळालेल्या वैद्यकीय सेवेवरचा तपशीलवार लेख पुन्हा मायबोलीवरच लिहून माबोप्रेम सिद्ध करण्यापर्यंत काही आय डीं ची मजल गेली. ह्यात आम्हीही मागे पडलो नाही. लाईफ थ्रेटनिंग पल्मनरी एंबॉलिझम झाल्यानंतर आय सी यू मधून आम्हीही माबोवर साश्रू नयनांनी काही पोष्टी डकवल्या. जुन्या मायबोलीचा अभिमान पदोपदी नोंदवण्याचे प्रमाण चौदा टक्क्यांनी घटले. कट्टा निष्कारण बेचिराख होऊन तेथील सदस्य विश्वाच्या महास्फोटाप्रमाणे इतरत्र फेकले गेले व तेथे गोल फिरत स्थिर होत राहिले. अ‍ॅडमीन ह्यांची विपू व विनोद ह्यापैकी एकच कोणतातरी धागा ठेवून सर्व्हरवरील ताण कमी करावा असे एक सजेशन पुढे आले. एक ऑगस्टपासून गुलमोहरात झालेल्या बदलांचा निषेध म्हणून आम्ही माबोवरील आमची शेवटची गझल डकवली व त्यानंतर एक नवी सुरुवात केली. धागे सार्वजनिक करता येणार असतीलच तर मुळात खासगी करण्याचे ऑप्शन हवेच कशाला ह्या आमच्या तात्विक प्रश्नावर माननीय प्रशासकांकडे चपखल उत्तर नसल्याने वेबमास्टरांना उत्तर देण्यास पाचारण करण्यात आले. गझल विभागात अभूतपूर्व उलाढाली घडल्या. रोज एक गझल टाकणार्‍यांचे सलग चार आय डी शेरातील भरतीच्या शब्दांप्रमाणे रद्द करण्यात आले. चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अश्या तर्‍हेच्या गझलचर्चा ह्यामुळे बंद झाल्या व एक साईड इफेक्ट म्हणून ज्यांचा गझलेशी दुरान्वयेही संबंध नाही त्यांचे गझलेवरील उत्कट अभिप्राय बंद झाले. ज्ञानेश पाटलांनी ते गझलकार नसल्याची जाहीर कबूली देऊन गझलविश्वावर अतोनात उपकार केले व सुजातावहिनींनी पतीद्वेषापोटी एकही गझल प्रकाशित केली नाही. काहींच्या अजिबात गेय नसलेल्या गझलांना चाली लावून गायले गेले व काहींना गझलसंग्रह प्रकाशित करण्याचे मनात यायच्या आधीच त्या संग्रहाला पुरस्कारही मिळाले. पुलस्ती व समीर चव्हाण हे दोन नवोदीत गझलकार या दरम्यान उदयास आले. महत्प्रयासाने निघालेला दिवाळी अंक अजिबात निघाला नसता तरी चालले असते ह्यावर मनातल्या मनात अनेकांनी सहमती दर्शवली. ह्याच कालावधीत एक सर्जन सर्जरीचा व्यवसाय धड चालेना हे पाहून इतिहासाच्या शिकवण्या घेऊन कशीबशी गुजराण करू लागले. कोणत्याही गझलेत कितीही शेर असले तरी त्यातले दोनच शेर आवडून घ्यायचे असा निर्णय उल्हास भिडेंनी घेतला तर त्यांना आवडलेले शेर हे शेरच नाहीत हे सिद्ध करण्याचा निर्णय वैवकुंनी घेतला. फ्लॉप गेलेले धागे प्रचंड गाजले. उत्तर भारतातील काही नेत्यांनी सचिन पगारे ह्यांना आंतरजालीय प्रसिद्धीच्या व्यवस्थापकपदी नियुक्त केले व त्यावर बेभान टीका करण्यात इतरांना आसूरी आनंद मिळाला. सिक्स पॅकच्या आकर्षणाने काहींनी चुकीचा व्यायाम केल्याने एका वाहत्या पानावर त्यांचे दमलेले सुस्कारे डकवण्यात आले. झक्कींनी ह्या वर्षी भारतावर केलेली टीका गेल्या सव्वीस वर्षांच्या टीकेच्या तुलनेत थोडी सौम्य ठरली. रोहन प्रकाशन तर्फे झालेल्या लेखन स्पर्धेत ज्यांनी भाग घेतला नाही त्यांना पारितोषिके मिळाली. चिन्मय दामले व दीपक ठाकरे ह्यांच्या कार्यसीमा त्या दोघांसकट कोणालाही ज्ञात न झाल्याने एक विकृत सुसुत्रता पाहण्यास मिळाली. मायबोली ह्या वर्षी काही चित्रपटांची माध्यम प्रायोजक झाली ह्याबद्दल मायबोलीचे अभिनंदन! हे एकच वाक्य वाकडेपणाने बोलल्याबद्दल आम्हास माफ केले जावे अशी याचना! ह्यावर्षीचा गणेशोत्सव गणेशोत्सवात साजरा करण्यात आला. ह्या अठरा महिन्यात प्रथमच माबोला 'डिपार्टमेंट'कडून काही नोटिस आली की अतिरेक्यांना फाशी अश्या क्षुल्लक विषयावर येथे कोणीही अजिबात वेळ घालवू नये. ही बाब लिंबूटिंबूंना पटली नाही व लिंबूटिंबूंना न पटणार्‍या लाखो बाबीत एकाची भरही पडली.

श्रद्धांजली - ह्या कालावधीत दिवंगत झालेल्या खालील सदस्यांना श्रद्धांजली देण्यास्तव दोन सेकंद कीबोर्डवरील बोटे वर उचलली जावीत अशी विनंती:

कर्दनकाळ, गझलप्रेमी, तिलकधारी

सुस्वागतम - ह्या कालावधीत पाश ह्या आय डी चे शुभागमन झाले. सुस्वागतम पाश! तुमचा ओरिजिनल आय डी कधीही प्रकाशात न येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

ऐतिहासिक दाखल्यांनी निरुत्तर करण्याची स्पर्धा -

ह्या स्पर्धेत दिनेश शिंदे ह्यांनी निर्विवाद प्रथम पारितोषिक पटकावले. त्यांचा 'हा सूर्य आणि हे जयद्रथ' हा लेख कल्पनेपलीकडे गाजला. ह्यात अभिमन्यू कोण होता हे गुपीत अजुन गुपीतच राहिलेले आहे.

माबोवरील बदललेली राजकीय समीकरणे -

नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांमुळे गप्पिष्ठ हा आय डी अनेकांचा मित्र ठरला. इब्लिस ह्यांनी उदयन ह्यांना बाहेरून तर उदयन ह्यांनी इब्लिस ह्यांना त्याही बाहेरून पाठिंबा दिल्याचे कळते.

चेंज इज ओनली काँस्टंट -

बेफिकीर ह्या गझलकाराने सदस्यत्वाला साडे तीन वर्षे झाल्यानंतर एक पाककृती सादर केली. हे पाहून काही अतृप्त आत्म्यांनी कायमचे डोळे मिटण्याचा निर्णय घेतला.

गुलमोहर -

काहीच्या काही कविता हा विभाग रद्द केलेला नसून तो कविता या विभागात मर्ज केलेला आहे. दोन सदरांमधील फरक कोणालाही निश्चीत करणे शक्य न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

या लेखाचा उत्तरार्ध हाच लेख संपादीत करून प्रकाशित करण्यात येईल.

तोवर संबंधितांनी धीर धरावा.

-'आपले आम्ही'!

अपडेट्स - दिनांक २२ जानेवारी २०१४:

काही लेटेस्ट अपडेट्सः

१. मायबोलीवरील निम्मे भिन्नलिंगीय आय डी उरलेल्या निम्म्या भिन्नलिंगीय आय डीं शी प्राणपणाने झुंजले. हे युद्ध समलिंगींना शांतपणे जगता यावे म्हणून झाले. ही झुंज पाहून प्रत्यक्ष जगात समलिंगीयांना शांतपणे जगण्यासाठी जो झगडा द्यावा लागेल तो अगदीच किरकोळ असेल असे वाटू लागले. या महाभयंकर युद्धात एका आय डी ला जाहीररीत्या भिकारचोट हा किताब मिळाला व त्याने तो नम्रपणे नाकारला. भेदरलेले रोमवासी व नवखे भिन्नलिंगी थिजून ही झुंज पाहात होते. ह्या लढ्यात सुदैवाने आयडीहानी झाली नाही. मात्र अनेक राजकीय समीकरणे बदलली. जे कालवर एकमेकांना पाण्यात पाहात होते ते आज गळ्यात गळे घालून फिरत आहेत. या लढ्यामार्फत एक ड्यु आय डी नव्याने निर्माण झाला व दोन ड्यु आय डीं ना शक्तीप्रदर्शनाची संधी मिळाली. या लढ्याच्या निमित्ताने अनेकांना अनेक महिन्यांनी नवीन विपूही आल्याचे समजते. युद्ध आम्हीच जिंकलो असा ढोल दोन्ही बाजूंनी पिटला जात आहे. नव्यानेच शत्रूचे मित्र झालेले आय डी आता इतके प्रेमात आहेत की समलिंगीयांना कधी झगडावे लागत असेल हे आता कोणालाही मुळीच पटायचे नाही अशी त्या दोघांची अवस्था आहे.

२. एका विवाहित पुरुषाने एका तिसर्‍याच विवाहित मुलीवर नुसते लांबून पाहून प्रेम करून एक ललित खरडले व येथे झळकवले. ही वृत्ती समाजात फोफावत आहे.

३. आदाब अर्ज है नावाच्या धाग्यावर गझल जमणारे, अर्धवट गझल जमणारे, एखादी ओळ जमणारे व गझलेतील काहीही न जमणारे ह्या सर्वांची प्रथमच मैत्रीपूर्ण सभा झाली. तेथे सर्वांना समान वागणूक मिळत असल्याचे पाहून काही आय डीं नी नाके मुरडल्याचे समजत आहे.

४. कोल्हापूरचे श्री अशोक उर्फ सर्वांचे मामा ह्यांना 'कचर्‍यातून कलानिर्मीती' हा पुरस्कार देण्यात आला. ह्या समारंभाला अनेक भाचरे उभी राहून टाळ्यांचा कडकडाट करत होती.

दिनांक २४ जानेवारी २०१४ -

१. जिवंत खेकडे पकडून ते आतून रिकामे करून पुन्हा भरून त्यांचे फोटो डकवण्याचा एक नवाच प्रघात माबोवर आता पडलेला आहे.

अधूनमधून हा धागा असाच अपडेट करण्यात येईल.
=================================

लेटेस्ट अपडेट्स - ११.०४.२०१५

आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील काही पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेतः

धागाविभूषण पुरस्कार - सर्वाधिक धागे काढण्याचे अफाट कसब दाखवल्याबद्दल हा पुरस्कार ऋन्मेष ह्यांना देण्यात येत आहे. हा पुरस्कार त्यांना प्रोफेसर देवपूरकर, दिनेश शिंदे व बेफिकीर ह्या तिघांच्या हस्ते देण्यात येत आहे.

मरणोत्तर वीरचक्र - हा पुरस्कार रमाकांत कोंढा व कबीर ह्यांना देण्यात येत आहे. एकमेकांशी सातत्याने सुसंवाद साधून सलग तिसर्‍या चौथ्यांदा मृत्यूमुखी पडण्याच्या क्षमतेसाठी हा पुरस्कार त्यांना अनुक्रमे शांताराम कागाळे व दिवाकर देशमुख ह्यांच्या हस्ते देण्यात येत आहे.

बी पुरस्कार - बी ह्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

चिपो पुरस्कार - होसुमीयाघ वरील अनेक चिपोंपैकी हा पुरस्कार कोणाला द्यायचा हे ठरवण्याचे अधिकार गोगा ह्यांना प्रदान करण्यात येत आहेत.

माबो दिलजले पुरस्कार - आपला कट्टा ह्या वाहत्या पानास हा पुरस्कार देण्यात येत आहे.

माबो आय सी यू पुरस्कार - हा पुरस्कार आमचा अड्डा ह्या पानाला देण्यात येत आहे.

हेरगिरी पुरस्कार - हा पुरस्कार कवठीचाफा ह्यांना देण्यात येत आहे.

मिपा एजंट पुरस्कार - हा पुरस्कार साती ह्यांना देण्यात येत आहे.

फेव्हरिट आय डी पुरस्कार - हा पुरस्कार अतृप्त ह्यांना देण्यात येत आहे.

'आमचं थोडं वेगळं पडतं' पुरस्कार - हा पुरस्कार जिज्ञासा ह्यांना देण्यात येत आहे.

सर्वांचे अभिनंदन!

==================================

लेटेस्ट अपडेट्सः ०४.०६.२०१५

१. प्रशासकांनी सदस्यत्व स्थगित केल्यानंतर आधीच काढून ठेवलेल्या एका ठेवणीतल्या आय डी ने तत्क्षणी उगवणे व प्रशासकांनाच विपू करणे की 'मी पुन्हा आलो आहे, पुन्हा उडवायचे असल्यास उडवा' ही गोष्ट वारंवार घडत आहे. 'आय डी काढा - आय डी उडवा' अशी सदस्य व प्रशासनामध्ये स्पर्धा असल्यासारखे गृहीत धरून अश्या विपू पाठवण्यात येत आहेत.

२. दु:खद घटना ह्या धाग्यावर पत्रकारितेबाबतची अमूल्य माहितीही मिळू शकते. नारळ, परकर व रद्दी एकाच दुकानात मिळण्यासारखे वाटत आहे.

३. गुगळे ह्यांचे धागे व प्रतिसाद अत्यंत आटोपशीर असल्यामुळे त्यांना 'सर्व्हरस्पेस बचत सम्राट' असा किताब मिळावा अशी एक मागणी पुढे आली आहे.

४. ऋन्मेष ह्यांनी धागा काढावा इतकी कमी महत्त्वाची घटना अलीकडे घडलेली नाही.

५. एका धाग्यावर अ‍ॅडमीन महोदयांनी 'सर्वांनीच शब्दांचा वापर जपून करा' अशी सूचना दिल्यानंतर एका 'सुरेख' सदस्याने 'काहीही हं अ‍ॅडमीन' असा लाडीक प्रतिसाद दिल्याचे आढळते.

६. नथूरामचा तब्बल ६७ वर्षांनी मरणोत्तर लिंगबदल करण्यात काही संशोधकांना अभूतपूर्व यश मिळाले.

७. रसप ह्यांना रिव्ह्यू लिहिता यावा ह्यासाठी हिंदी चित्रपट निर्मीती बेसुमार वाढू लागली आहे.

८. विनोदाच्या धाग्याचा वापर देशोदेशीच्या रुढींची माहिती देण्यासाठीसुद्धा करता येईल अशी नवीन तरतूद झाल्याचे समजते.

================

१५.११.२०१५

स्वतःची विपू पाहण्याआधी अ‍ॅडमीनची विपू पाहण्याची सवय होण्याचे प्रमाण वाढले.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
मजेशीर आहे. पहिला पॅरेग्राफ अजून १-२ मध्ये स्प्लिट केला तर डोळ्यांना आणि वाचायला बरं पडेल असं मनात आलं

गजबज आवडली हे लिहायचच राहिलं!

Happy

हलक्या फुलक्या शब्दात घेतलेला, थोडक्यात पण छान परामर्श.
माबोवरील वर्षभरातील घडामोडी कौशल्याने विषद केल्यात.

काव्य विभागातील वैशिष्ट्ये आणि 'बदलेली समीकरणे'
या दोन गोष्टी अधिक छान वाटल्या.
(इथेही दोन .... Wink Proud )

Lol

काहीच्या काही कविता हा विभाग रद्द केलेला नसून तो कविता या विभागात मर्ज केलेला आहे. दोन सदरांमधील फरक कोणालाही निश्चीत करणे शक्य न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
>> Rofl

बेफी "भुक्कड" पर्यंत माझा तुम्हाला देखील पाठिंबा होता ............ नंतर मात्र तुमच्या कृतीमुळे नाईलाजास्तव काढुन घ्यावा लागला Biggrin

झक्कींनी ह्या वर्षी भारतावर केलेली टीका गेल्या सव्वीस वर्षांच्या टीकेच्या तुलनेत थोडी सौम्य ठरली.

दमायला झाले हो. कितीदा तेच तेच सांगणार!

बाकी आता नुसते माझे नाव पाहिले तरी मी भारतावर टीका करतो, उपरोधानेच लिहितो, असे मत सर्वांचे झाल्याने आता मी फक्त एक टिंब (,) एव्हढाच फक्त प्रतिसाद दिला तरी त्यात उपरोध, भारतावरील टीका, असे सर्व काही आले असे समजून चालणारच लोक. मग कष्ट कशाला घ्या!!

असो. नाहीतरी मायबोली आहे म्हणून मी लिहिणारच. कुणिहि काहीहि अर्थ घ्या! खरे तर मागे कुणि लिहील्याप्रमाणे ते आवडले नाही, समजले नाही तर आ.बु. दो. स.!

Biggrin

'एक महिला एक पान' अशी भयावह परिस्थिती लवकरच येईल असे काही वडीलधार्‍यांचे म्हणणे पडले. गावाच्या नावाने असणार्‍या पानांचे 'भलत्याच गावातल्या लोकांनी ते पान चालवणे' हे वैशिष्ट्य मात्र कायम राहिले. यात पुण्यातील पुणेकर व आम्ही कोल्हापूरी ह्यांनी पहिले पारितोषिक विभागून पटकावले.>>>>:हाहा:

उत्तर भारतातील काही नेत्यांनी सचिन पगारे ह्यांना आंतरजालीय प्रसिद्धीच्या व्यवस्थापकपदी नियुक्त केले व त्यावर बेभान टीका करण्यात इतरांना आसूरी आनंद मिळाला.>>>>>:हाहा:

काही लेटेस्ट अपडेट्सः

१. मायबोलीवरील निम्मे भिन्नलिंगीय आय डी उरलेल्या निम्म्या भिन्नलिंगीय आय डीं शी प्राणपणाने झुंजले. हे युद्ध समलिंगींना शांतपणे जगता यावे म्हणून झाले. ही झुंज पाहून प्रत्यक्ष जगात समलिंगीयांना शांतपणे जगण्यासाठी जो झगडा द्यावा लागेल तो अगदीच किरकोळ असेल असे वाटू लागले. या महाभयंकर युद्धात एका आय डी ला जाहीररीत्या भिकारचोट हा किताब मिळाला व त्याने तो नम्रपणे नाकारला. भेदरलेले रोमवासी व नवखे भिन्नलिंगी थिजून ही झुंज पाहात होते. ह्या लढ्यात सुदैवाने आयडीहानी झाली नाही. मात्र अनेक राजकीय समीकरणे बदलली. जे कालवर एकमेकांना पाण्यात पाहात होते ते आज गळ्यात गळे घालून फिरत आहेत. या लढ्यामार्फत एक ड्यु आय डी नव्याने निर्माण झाला व दोन ड्यु आय डीं ना शक्तीप्रदर्शनाची संधी मिळाली. या लढ्याच्या निमित्ताने अनेकांना अनेक महिन्यांनी नवीन विपूही आल्याचे समजते. युद्ध आम्हीच जिंकलो असा ढोल दोन्ही बाजूंनी पिटला जात आहे. नव्यानेच शत्रूचे मित्र झालेले आय डी आता इतके प्रेमात आहेत की समलिंगीयांना कधी झगडावे लागत असेल हे आता कोणालाही मुळीच पटायचे नाही अशी त्या दोघांची अवस्था आहे.

२. एका विवाहित पुरुषाने एका तिसर्‍याच विवाहित मुलीवर नुसते लांबून पाहून प्रेम करून एक ललित खरडले व येथे झळकवले. ही वृत्ती समाजात फोफावत आहे.

३. आदाब अर्ज है नावाच्या धाग्यावर गझल जमणारे, अर्धवट गझल जमणारे, एखादी ओळ जमणारे व गझलेतील काहीही न जमणारे ह्या सर्वांची प्रथमच मैत्रीपूर्ण सभा झाली. तेथे सर्वांना समान वागणूक मिळत असल्याचे पाहून काही आय डीं नी नाके मुरडल्याचे समजत आहे.

४. कोल्हापूरचे श्री अशोक उर्फ सर्वांचे मामा ह्यांना 'कचर्‍यातून कलानिर्मीती' हा पुरस्कार देण्यात आला. ह्या समारंभाला अनेक भाचरे उभी राहून टाळ्यांचा कडकडाट करत होती.

अधूनमधून हा धागा असाच अपडेट करण्यात येईल.

-'बेफिकीर'!

वरती करा ............अपडेट...............

सगळ्यांना वाचता येईल ना

Pages