चार्मिंग अ‍ॅनापोलिस

Submitted by मानुषी on 17 December, 2013 - 17:41

रविवारी बर्फ पडेल असा अमेरिकन वेध शाळेचा हवामान अंदाज होता.
पण चक्क तो चुकला आणि रविवारी सकाळपासूनच हवा बदलली आणी मस्तपैकी ऊन पडलं.
मग म्हटलं , आता कुठे तरी जाऊच!
मग आठवलं………… दोन वर्षांपूर्वी जेव्हा उसगावी येणं झालं होतं तेव्हा अ‍ॅनापोलिसला गेलो होतो.
फरक इतकाच तेव्हा समरमधे गेलो होतो. आता ऐन थंडीत चाललो होतो.
मग तिकडेच जायचं ठरवलं दुपारी एक वॉशिन्ग्ट्न डीसीहून निघालो.
इथून बरोब्बर एक तासाचा ड्राइव्ह आहे.
हे शहर अमेरिकेतल्या मेरिलॅन्ड. प्रांताची राजधानी आहे.
गाव तसं छोटंसंच पण सुंदर !
इथे सुंदर समुद्रकिनाराही आहे. समरमध्ये पर्यटकांनी गजबजलेला असतो.
एक नेव्ही एकेडेमीही आहे. रविवारी तिथली तरुण मुलं आणि मुलीही. आपापल्या युनिफॉर्मात गावात फिरत असतात.
तरुणाईचं ते दर्शन अगदी मोहक आणि आश्वासकही!
एखाद्या परिकथेतलं वाटावं असं हे गाव........ माझ्या मनावर याची मोहिनी कायमच राहील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकन वेधशाळेचाही अंदाज चुकतो हे वाचून मजा वाटली, अर्थात तो चुकला म्हणून तर भर डिसेंबरमधे असे उन्हाळी वातावरण आणि त्यातले फोटो बघायला मिळाले.

खूपच छान, मला आवडले सगळे फोटो...:)

मस्तच.

एक नेव्ही एकेडेमीही आहे. रविवारी तिथली तरुण मुलं आणि मुलीही. आपापल्या युनिफॉर्मात गावात फिरत असतात.>>> फोटोत कुठे दिसले नाहीत. मला कॉलेज जीवनात असे रवीवारी युनिफॉर्मातले NDA Cadets दिसायचे ते पहायला फार आवडायचे Wink

सुंदर फोटो.

अनापोलिस नावाचा एक चित्रपट आहे त्यात जेम्स फ्रँको आहे.
त्यात ती नेव्हल अकॅडमी आणि त्यातली मुले मुलीही आहेत.

गोपिका श्री धन्यवाद.
हर्पेन.......भर डिसेंबरातलं उन्हाळी वातावरण फक्त फोटोतच बर!
नाहीतर प्रत्यक्षात तिथे ऊन दिसत असलं तरी. थंडी अगदी हाडात पोचणारी.
आणि समुद्रावरून येणारं चिल्ल्ड बोचरं. वारं!
मी नताशा......तिथे असे व्यक्तींचे फोटो घेणं जमत नाही. कुणी ऑब्जेक्शन घेऊ शकतात.
आणि अग्दी त्यांच्या नकळत घ्यायचं तर ते नाही जमलं.
आणि एन्डीए तले कॅडेट्स तर खरंच प्रेक्षणीयच असतात.
हो दिनेश मी पाहिला नाही पण आहे हाचित्रपट.
जागुले , मार्को धन्यवाद.

सुंदर फोटो, मानुषीताई तुमच्याबरोबर आम्हीपण फोटोतून अनुभवतो. अमेरिकन वेधशाळेचा अंदाज चुकला हे ऐकून मलापण गंमत वाटली, अर्थात तिकडे असे क्वचितच होत असेल.

Wow, Ithe Seattle la snowfall nahiye, pan paaus padtoy :(, photos mast aahet, dhanyawad

फोटो मस्त
पण एक नेव्ही एकेडेमीही आहे. >> हे म्हणजे तिरुपतीमधे बालाजीचे मोठे देऊळही आहे म्हटल्यासाखे वाटले

वॉव.. शांत्,स्वच्छ,रम्य ठिकाण..

फोटो खूप छान क्लिअर आलेत..

मानु, तिथल्या क्रिसमस डेकोर चे पण फोटो टाक ना...