दैवाने मांडीला़ , आज पोरखेळ
दुर आभाळासी उभे़ , एक मृगजळ
तिथे उडती कारंजे़ , इथे घाणीचे ओघळ
तिथे वाहणारे पाणी़ , इथे कोरडाच नळ
तिथे चांदीचे ताट़ , इथे जुनी पत्रावळ
तिथे पक्वान्नांच्या राशी़ , इथे थंडाफराळ
तिथे रेशमाचा शेला़ , इथे फाटकी वाकळ
तिथ मांडले गालीचे़ , इथे तुटकी कांबळ
तिथे प्रशस्त वाटा़ , इथे निमूळते बोळ
तिथे चकाकती लाद्या़ , इथे अंगावर धुळ
तिथे लाखाचे व्यवहाऱ , इथे कवडयांचा खेळ
तिथे चोख व्यवहाऱ , इथे चाललासे घोळ
तिथे नाजुकसे श्वाऩ , इथे माजलेले पोळ
तिथे सर्वत्र सुरक्षा़ , इथे भोवताली खळ
तिथे चाले गुजगोष्टी़ , इथे चालला कुटाळ
तिथे निरव शांतता़ , इथे सावळा गोंधळ
तिथे बहरे वसंत़ , इथे सदाचा दुष्काळ
तिथे भोगीती ऎश्वर्य़ , इथे काळजास पिळ
तिथे नशीबाचे धनी़ , इथे फुटके कपाळ
तिथे नांदतो कुबेऱ , इथे शनीलाच बळ
पाहुनी हे मृगजळ , वेगे धावतो चितळ
तोंड होतसे फेसाळ , पाय होई बंबाळ
हरीश दांगट

नेहमीप्रम
नेहमीप्रमाणेच छान.
------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम
अय्या ,
अय्या
, कुठे गेली कविता?
------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम
(No subject)
अश्विनी, मृ
अश्विनी,
मृगजळच गं ते.....
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
क्षमस्व,
क्षमस्व, मी ज्या फोटोपासुन कवीता सुचली, त्या चित्रासकट
परत अपलोड केली.
-हरीश
हा फोटोही
हा फोटोही तुच काढलायस का? दोन्ही छान.
फोटो मी
फोटो मी नाही काढला, बातम्यांम्ध्ये पाहीला.
पाहील्याबरोबर विरोधाभास जाणवला व कवीता लिहिली.
-हरीश
सुरेख लय
सुरेख लय आहे कवितेला. आणि वास्तव उगाचच रडकं न होता, फारच परीणामकारक मांडलय.
पण,
"तिथे चाले गुजगोष्टी़ , इथे चालला कुटाळ
तिथे निरव शांतता़ , इथे सावळा गोंधळ"
हे काही पटल नाही, कुटाळ आणी गोंधळ, रडारड, असंतुष्ट्पणा तेथेही असतोच.
chaoo, तुमचा
chaoo, तुमचा मुद्दा लक्षात आला.
मी मृगजळ नाव येवढ्यासाठी दिले की, तिकडे चांगल्या गोष्टी आहेत असा भास होतो.
वास्तवात तसे नसते.
-हरीश
पटलं! धन्यव
पटलं!
धन्यवाद!