जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ता, खरयं. दोघी शेजारणी फार नाक खुपसतात ज्यात त्यात!
गोगा, तुमचे अपडेटस आवडतात मला. मेघना कुडाळकर -देसाइ असल्यामुळे घरी आल्यावर सुद्धा सिरीयल कंटिन्यू झालेली दिसतेय Wink हलकेच घ्या हं!

हो. आणि आदित्य ने त्याच्या भावाला दिलेला सल्ला पण मनापासून पटला. न आवडणार्‍या बॉस चा पत्ता कट करण्याचा हा सर्वमान्य उपाय आहे. .............. Lol

गोगा तुमच्या शॉर्ट अपडेट्स मुळे खरंच वेळ वाचतोय... फार काही विशेष घडत नाहीये त्यामुळे मुद्दाम मिसलेला भाग बघावा असं काही नाही.

मेघनाचं डोकं अधूनमधून फिरतंय तिला आदे तुला बायकोच्या जबाबदारीतून सुटका मिळाली असली तरी घरातल्या इतर जबाबदार्‍या टाळता येणार नाही. तेव्हा घरच्यांचा विचार कर असं दोन तीन वेळा खडसावतो ते आणि मेघनाच्या आईने बाबाजींना तेही फार आवडलं. शेजारणी खरंच भोचक. एकतर मालवणी दाखवलेय सो स्वभावाला औषध नाही Wink पण शेजारणींपेक्षा नणंद आणि जावेचा भोचकपणा वैताग आणतोय. करायच्यात काय तुम्हाला नस्त्या उठाठेवी? विहीणींमधील रिलेशन मस्त! सुमो साबा म्हणून कस्ली गोड आहे!! देसाई साबा, साबु, आदे फार्फार आवडताहेत. तिघांच्याही अगदी प्रेमात!

नवरा वैतागलाय... प्रत्येक वाक्याला माझ्या "बघा" लूकला आणि आदे वर ओवाळलेल्या कौतुकाच्या निरांजनांना Proud

ती विजयाचे "अय्या आर्चू", तिचे हातवारे, डोळे मोठे करुन बोलणे आणि चेहर्‍यावर काहिच भाव नसणे, फार डोक्यात जाते ती माझ्या.

मधुगंधा नी होसूमीयाघ मधे विजया बँक घातलीय आणि इथे स्वतःचं नावच विजया ठेवलय
काहीतरी कनेक्शन दिसतय.........

खरच बेफिजी.
चांगल्या गोष्टींची यादी खरच खुप कमी होईल.

सगळ्या मालिकांमधील बच्चे कंपनी एकजात आगाऊ का दाखवतात कोण जाणे. कदाचित त्या दिग्दर्शक, निर्माता, लेखकांची मुले अशीच असतील. त्या विजयाची दोन्ही मुलेही आजिबात लहान वाटत नाहित स्पेशली ती साक्षी.

बाकी माई-नाना तर बेस्टच. Happy

ती मधुगंधा काही लोकांना आवडते इथे हो...अगदी अ‍ॅक्टींग सकट.... ...(असतो एकेकाचा चॉइस म्हणा). काहींना ऋषीकेश जोशी, त्यागराज खाडीलकर सुद्धाअ आवडतो एकून आहे. Proud

पण विजयाची भयानक अँक्टींग पाहून नकोसे होते. ड्रेस पण इतके भिकार घालते... पातळसे चुडीदार... भयानक मेकअप जो फक्त चेहर्‍याला व मानेला काहीच नाही. कधी कधी पॅचेस दिसतात. बावळटपणे कापलेले केस. डीझायनर ना हि?
(रेखीव पणा नाही तं नाही राहणीमान पन इतकं गचाळ का दाखवलेय ह्या पात्राचे समजत नाही).

(हह्ह... झालं बोलून. आता बर वाटलं. Proud )
पण खरेच अश्या अभिनय क्षेत्रातील इतक्या गचाळ मुली पाहिल्या की आश्चर्य वाटतं), एक कथेतील कॅऱटर म्हणून पण शोभत नाही.

आमच्या बिल्डिंगमधली झी मध्ये कुठल्याश्या प्रोडक्शन हॉउसमध्ये काम करणारी एक बाई अशीच भयानक राहते. साडी दोन इंच वर, मेकअप लालेलाल थोबाडीत मारल्यासारखा. जाडी असूनसुद्धा कधी कधी ते पातळ लेग्गींग्ज...त्यावर शॉर्ट टॉप.. अरारा.....
जावु दे... Proud

पण विजयाची भयानक अँक्टींग पाहून नकोसे होते. ड्रेस पण इतके भिकार घालते... पातळसे चुडीदार... भयानक मेकअप जो फक्त चेहर्‍याला व मानेला काहीच नाही. कधी कधी पॅचेस दिसतात. बावळटपणे कापलेले केस. डीझायनर ना हि?
(रेखीव पणा नाही तं नाही राहणीमान पन इतकं गचाळ का दाखवलेय ह्या पात्राचे समजत नाही).>>>> हजारोने मोदक तुला झंपी.

काल नवरा ऑफिसमधुन आला तर ते बाबाजी बाबाजी चालु होते. असा वैतागला ना. बंद करा तो टि.व्ही. काय रोज रोज ते फालतु बाबाजी ऐकत असता? त्यापेक्षा तुमच्या बाबांची आठवण काढा म्हणे. Happy

गोगा, तुमह्च्या मेघनाला सांगा आता गुड न्युज द्यायला<<<

मालिकेच्या शीर्षकगीतात त्या दोघांचे एकमेकांना क्षणभर चिकटणे सोडले तर दोघे एकमेकांपासून दहा हात अंतरावर असतात. कसली डोंबलाची गूड न्यूज! झंपी फारच दुर्दम्य आशावादी आहेत बहुधा!

Light 1

अहो बेफी, असा बाबाजींचा आदेश आहे. आता बाबाचं एकत नाही मेघना , म्हटलं काकांच(गोगा..) एकेल... Proud

(ह. घ्या दोघांनी.. गोगा, बेफी)

८ मार्च...
बाबाजीनी घरी पार्टी ठरवली (त्यात सतिशची पार्टी मागे राहिली).
अर्चू आणि विजया चिडले आहेत पार्टी पुढे गेल्यामुळे...
बाबाजींनी जावयाला रितसर आमन्त्रण दिलेले नाही .. मेघनाने आठवण करून दिली.
माई काळजीत (अर्चू, मेघना, आणि विजयामुळे) अमित+सतिश समजावतो...

ही मेघना अभिनय कधी करणार? नेहमी तोंड वाकडं करून असते..

आजचा एपिसोड पाहिला (सोमवारचा). मेघनाच्या नणंदेच्या म्हणण्यात तथ्य आहे असं वाटलं, अर्थातच हा मुद्दा मांडण्यासाठी पार्टी कॅन्सल झाल्याचं कारण ( खरंतर निमित्त ) फारच क्षुल्लक होतं. पण असे काट्याचे नायटे होत असतात नेहेमी. असो. मेघना नवीन असल्यामुळे तिला जपण्याचा प्रयत्न सुमो जरा जास्तच करताहेत, तो त्यांच्या कॅरॅक्टरचा स्वभाव आहे. मेघनासारख्या पर्सनॅलिटीज असतात, स्वतः चं दु:ख कवटाळून बसणार्या, इतरांना न समजून घेणार्या किंबहुना तसं करणंच आवाक्याबाहेर असणार्या....(आता मेघनाला तसं व्हॅलिड कारण आहे कारण् तिला या घरात संसार करायचाच नाहीये सद्ध्या). घरात अशी 'हँडल विथ केअर' मंडळी असतात असा सर्वांचा अनुभव असेल. Happy
गोगा....मेघनाची अ‍ॅक्टिन्ग आणि तिचा( कबुतरासारखा कंठव्य) आवाज फार बोअर होतो.... सुमो आणि गिओ झिंदाबाद.... Happy

अचानक आ. ना. दिसल्याने बाबाजींची पार्टी रद्द...
मेघना भयंकर भडकली.. आ.दे. समजावतो.
अर्चू अजून भडकलेलीच...
बाबाजी पुन्हा काळजीत... मुलीचा निरोप आठवून..
बाकी शिरेल.. नेहमीप्रमाणे Happy

गोगा, कुठे मिळतात हे अपडेटस? अमेरीकेत जावून सुद्धा?

(बरं, धन्यवाद अपडेट्स बद्दल, ज्यास्त काही मिसत नाही न बघता).

चिपोका : अपडेट्स मस्तच ...... Happy

मेघना चा आवाज तिच्या कॅरेक्टरला शोभेसाच आहे.

पार्टी कॅन्सल झाली म्हणून अर्चू ने इतकं चिडायचं कारण नव्हतं. पार्टी अमितच्या प्रमोशन ची होती, तिच्या नवर्‍याच्या प्रमोशनची नाही. सुमो नी अर्चु ला ठणकावायला हवं होतं की बाई जरा स्वतःच्या संसारात लक्ष घाल, सारखं सारखं माहेरच्या गोष्टींमध्ये इतकं रमणं बरं नाही, अगदी कितीही जवळ राहात असलीस तरी. मेघनाच्या जागी दुसरी कोणी असती, तर कदाचित तिने अर्चुला सॉरी म्हणण्याच्या ऐवजी असंच काही सुनावलं असतं.

माई काळजीत (अर्चू, मेघना, आणि विजयामुळे) अमित+सतिश समजावतो...
>>>>> मस्त निभावलाय तो सगळा सीन सुमोंनी Happy

सारखं सारखं माहेरच्या गोष्टींमध्ये इतकं रमणं बरं नाही >>> ब्रेफा पासुन डिनरपर्यंत माहेरीच असते ती Wink

जाम डोक्यात जायला लागलीय ती Angry विजयाबद्दल न बोललेच बर Lol

काल सतिशपन विचित्र वागला.

गोगा, चिपोका (साभारःअरुण) म्हटल्याबद्दल इतकं कशाला वाईट वाटून घ्यायचं. नाहितरे तिला अभिनय येत नाही.. Happy

चिपोका क्या है? Uhoh

ज्यास्त काही मिसत नाही न बघता >>> अगदी अगदी!

ती मेघना डोक्यात जायला लागलीये. अर्चू पर्फेक्ट ! आम्ही काल अगदीच अर्चूच्या बाजुने होतो सगळेच Wink
या मेघना टाईप्संना किती सहन करायचं?
इतकं गोड सासर मिळालंय! बाबाजींना तिने डोक्यावर बसवून ठेवलंय. लगेच घरची पार्टी सोडुन जायची गरज नव्हती

Pages