अर्थ क्षेत्र एक उपेक्षित क्षेत्र

Submitted by अज्ञ on 11 December, 2013 - 22:58

अर्थक्षेत्र....एक उपेक्षित क्षेत्र

दिवाळी ते मे महिना कसली नि कसली शिबिरे चालू असतात. व्यक्तिमत्व विकास शिबीर, क्रिकेट शिबीर, टेनिस शिबीर, तबला पेटी नृत्य गायन ह्याचा रतीब चालूच असतो म्हणजे पर्यायाने खेळ गायन पाककृती कलादालन वगैरे बरेच काही विषय पैसे देऊन हाताळले जातात. बरे पालक पण किती चोखंदळ असतात देव जाणे कारण शेजारचा जातो म्हणून माझा जातो इथपासून ते "आहो तेवढाच आम्हाला मोकळा वेळ मिळतो!!" पर्यंतची मुक्ताफळे मी पालकांकडून ऐकत आलो आहे. म्हणजे कुठलीही कला येणे खेळ येणे वाईट नाही पण आयुष्यात अनेक महत्वाचे जे संस्कार आहेत त्यातही आर्थिक साक्षरता हा महत्वाचा संस्कार आपण मुलांना देतो का?
६३ वर्षाचे माझे एक क्लायंट मला सांगतात "अरे मुलाला वेळच नाही त्याची सगळी गुंतवणूक / करविषयक बाबींकडे मला आणि त्याची मुले माझ्या हिला सांभाळावी लागतात. " (आजी आजोबांचे प्रेम वगैरे ठीक आहे रे पण आम्ही मोकळे होणार कधी ?) आणि कहर असा कि सुनेची गुंतवणूक विषयक आणि करविषयक व्यवस्था तिचे वडील पाहतात जे माझेच क्लायंट आहेत. हे पाहून खूप त्रास होतो बरे दोन्ही कुटुंबे सु-शिक्षित आहेत आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत पण तरीही खूपशा गोष्टी जेव्हा माझ्याबरोबर शेअर होतात तेव्हा वेदना होतात कारण दोष कुणाचा हे कळते पण सांगणे कठीण जाते.
माझे आईवडील फारसे शिकलेले नव्हते त्यांनी उरापोटावर मेहनत करून आणि आपल्या आवडीनिवडी बाजूला सारून (हे कर्म कठीण असते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे) आम्हाला शिकवले कारण त्यांना शिक्षणाचे महत्व कळले होते. आजच्या पिढीकडे शिक्षण आणि पैसा दोन्ही आहे मग त्यांनी मुलांना काय आणि कोणत्या वयात दिले पाहिजे (वयावरून आठवले लैंगिक शिक्षणाचादेखील उहापोह चालूच असतो सर्व माध्यमातून!!)असा प्रश्न तुम्हालाही पडतो का?
आर्थिक साक्षरता हा एक महत्वाचा भाग आहे आणि तो संस्कारक्षम वयातच शिकवला पाहिजे. चेक बुक, पे in स्लीप, घराचे बजेट, शाळेसाठी, वाढदिवसासाठी केलेला खर्चाचे टिपण मुलांनी ठेवायला सुरुवात केलीतर त्यात हळूहळू त्यांना गोडी निर्माण होते असे मी पहिले आहे. बँकिंग चालते कसे? पैसे येतात कसे? नोकरीच केलीतर पैसे येतात कि आणखीहि काही मार्ग आहेत त्यातले वैध आणि अवैध कोणते ते कसे ओळखायचे त्याबाबतीत काय कायदे आहेत. तुम्ही कंपनीत जॉब करता त्याचा ओनर कुठे नोकरी करतो ? एक ना हजार भरपूर प्रश्न लहान मुले विचारतात आणि आपल्याला आपली पातळी दाखवून देतात. बाबा तुम्ही बिल गेट का नाही? तुम्हीहि सोफ्टवेरच बनवता ना?
मुलांनी कुठले प्रश्न विचारावेत हे आपण च्येनालैझ करू शकतो जर टी.वी आणि अवांतर मधून आपण बाहेर पडलो आणि मुलांकडे, त्यांचे फोकस तयार करण्याकडे लक्क्ष देऊ लागलो तर.
सर्व इतर क्षेत्रांप्रमाणे अर्थक्षेत्र हे हि एक उपयुक्त क्षेत्र आहे. त्यातहि क्रिएटिव्ह, happpening असे भरपूर काही आहे पण दुर्दैवाने दुर्लक्षित आहे. वयाच्या तिशीला माझा मुलगा आणि परक्याकडे जाणारी माझी मुलगी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि साक्षर व्हावेत हे एकच ध्येय असावे कि .........दुसरा काही ऑप्शन आहे ????

हे सर्व लिहिण्यामागचे कारण एवढेच कि जे माझ्या आजूबाजूला आहे तेच तुमच्या आजूबाजूला आहे का?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच चांगला मुद्दा . ह्या विषयाकडे दुर्लक्षच होते. मोठ्यांचे आणि त्यामुळे छोट्यांचे. माझ्या आजूबाजूला कित्येक सुशिक्षित बघण्यात आहेत ज्यांना गुंतवणूक, साधे बँकेचे व्यवहार, नामांकन, म्र्युत्युपत्र, कर्जाचे नियम, विमा वगैरे बाबत माहिती नसते. आणि अजून वाईट गोष्ट हि, कि माहिती करून घेण्याची इच्छाहि नाही.

ह्याचे मुख्य कारण क्लिष्टता असावी व त्यामुळे रस नाही. दुसरी गोष्ट, आर्थिक व्यवहार सांभाळल्या मुळे मिळणारे फायदे किंवा न सांभाळल्याचे तोटे लगेच दिसून येत नाहीत. काही काळा नंतर जेव्हा उमजते, तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.

सत मार्गाने भरपूर पैसा कमावणे व तो चांगल्या कामासाठी वापरणे हे वाईट नाही, हे लहानपणा पासून शिकवायलाच हवे.

@ ketumi
धन्यवाद....जे मी इतके भराभर लिहून ठेवले आहे ते तुम्ही अगदी समर्पक सोप्या आणि कमी शब्दात उत्तम मांडलेत.
हे मला हि जमावे हि इच्छा

छान धागा.

मला असं वाटतं, आजची पिढी ही आर्थिक दृष्ट्या well informed आहेत. ऑफिस मध्ये कलिग्स बरोबर नेहमीच चर्चा होत असणार. ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न टॅक्स स्लॅब मध्ये येतं आणि त्यांचे tds deduct होत असेल, ती लोकं तर नक्किच quarterly / yearly आपल्या उत्पन्नाचे नियोजन करत असणार.

मी स्वतः ह्या बाबतीत फारच अज्ञानी होतो, बँकेने एकदा वर्षारंभी, मी १५g डिक्लेर केले नाही म्हणुन टॅक्स लादले, तेव्हा पासुन कर बचती साठी काय उपाय योजना (mutual fund / postal savings / infrastructure bond purchase / 5yrs term deposit receipts (fixed deposit) ) आहेत ते सहकार्‍यां कडुन जाणुन घेतले.

Happy

अज्ञ.
छान धागा.
मी स्वतः बॅकेत काम करते, मुलांना त्यांची स्वतंत्र खाती उघडुन दिली आहेत. वय वर्षे १८ आणि १४, आणि व्यवहार ही त्यांचे ते च बघतील अशी ही काळजी घेतेय, पण अजुन काय करायला हवे, हे कळत नाही. at least, tax savings and others गोष्टी त्यांना अगदीच अपरिचित राहु नयेत, एवढेच!

@ srd : उत्तम सुविचार

@ नेत्रा : मला वाटते त्यांना व्याज, लाभांश, नफा ह्या टर्म्सचा सखोल अर्थ समजावून सांगणे योग्य.
बँकिंग ऑपरेशंस आणि गुंतवणुकीचे पर्याय ह्यातला फरक समजावून त्या पर्यायांची सांगड घालून त्याद्वारे मिळणारे
व्याज, लाभांश, नफा पुन्हा गुंतवून कसा वाढवावा आणि हे चक्रवाढ पद्धतीचे गणित कसे साधावे ते समजवावे.धन्यवाद

नक्की लिहा लेखाच्या प्रतिक्षेत आहे.
बाकी सुज्ञ होण्याचा प्रवास हि चालू आहे.

गुंतवणूकी तीन प्रकारच्या आहेत .

अ)गरजेच्या ,केल्याच पाहिजेत अशा .निवृत्तीनंतर या उपयोगी पडतील म्हणून पैसे बाजूला काढून सुरक्षित ठिकाणीच ठेवणे .

ब)थोडा जास्ती परतावा येईल अशा ठिकाणी पैसे गुंतवणे .सतत बदल करावा लागतो .

क)विमा .अनपेक्षित अडचणीँना सामोरे जाण्यासाठी पैसे काढून ठेवणे .घरासाठी कर्ज घेतल्यास विमा हवाच .विम्याकडे गुंतवणूक म्हणून पाहाणे आणि इतरांशी तुलना करणे चुकीचे आहे असे मला वाटते .

ड)गुंतवणूक करत राहाण्याचा सपाटा /अतिरेक करणे सुध्दा वाईट आहे .याचे कारण महागाई वाढते आहे .

अगदी बरोबर पण माझा क्रम वेगळा आहे.

गुंतवणूक म्हणजे लहान वयातच लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेली सुरवात आणि ३० लाच ह्या जगाचा मुक्त अनुभव घेण्यासाठी तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य.

मुलाने मार्क्स कमवावेत हे सांगून स्ट्रेस देणारे पालकांच्या स्वतःच्या असुरक्षित भावने पोटी मुलांचे होणारे हाल कमी करून मुलांनी पैसे कमावण्यासाठी गुंतवणूक योग्य सजग कसे व्हावे ह्याबाबत सतत मार्गदर्शन करणे आई वडलांना शक्य नसते कारण त्यांनाच काही माहित नसते...नोकरीला पर्याय नाही हा समज फार घातकी आहे.
पैशाने पैसे वाढतात हे सर्व मराठी जाणतात मग तसा वाढवण्याचे पर्याय म्हणून आजूबाजूचे धंदेच त्यांना दिसतात आणि त्यात्तर वेगवेगळ्या समाजाने आपले बस्तान आधीच बसवले आहे ते तुम्हाला शिरकाव करू देत नाहीत तर मग नोकरी बरी ........असो.

नोकरी का व्यवसाय हा मुद्दा धरल्यास प्रत्येकाचा विचार (काही काळतरी) वेगळा असेल .

शिल्लक पैशांचे काय करायचे ही गुंतवणूक झाली .

नोकरी नको हे बिंबवायला पाहिजे हे पटले . मार्केट ओळखणे ,त्यात आपल्या आर्थिक कुवतीने त्यात जागा बनवायला शिकणे जास्ती महत्वाचे आहे .

@अज्ञ- अतिशय योग्य सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद. (अर्थात मुलांना चक्रवाढ गुंतवणुकीचे गणित समजवण्यासाठी त्यांच्या नावे ही थोडी गुंतवणुक करावी लागेल, ते अजुन जरासे कठीण आहे. पण नंतर सांपत्तिक स्थिती तितकीशी छान झाल्यावर ह्याचा नक्कीच विचार करेन.) धन्यवाद.

हे सर्व लिहिण्यामागचे कारण एवढेच कि जे माझ्या आजूबाजूला आहे तेच तुमच्या आजूबाजूला आहे का? >>>
अगदी असच आहे.
काय करता येईल यावर प्रतिसाद अपेक्षित आहेत.