फोकनाड !

Submitted by झुलेलाल on 10 December, 2013 - 10:33

फोकनाड !!

एका सायंदैनिकात मंत्रालयातील पब्लिसिटी खात्याचा एक अधिकारी पार्टटाईम बातमीदारी करायचा. एकदा तो एक फालतू बातमी घेऊन आला. साहेबाच्या हातात त्याने तो कागद दिला.
साहेबांची नजर हातातल्या कागदावरच्या बातमीवरून फिरत होती आणि हा समोर बसून साहेबाच्या चेहर्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत होता...
साहेबानी बातमी वाचून संपवली. कागद बाजूला ठेवला...
याला साहेबाच्या प्रतिक्रियेचा काहीच अंदाज येत नव्हता..
शेवटी न राहवून त्याने विचारले, 'साहेब कशीय बातमी?'...
'एकदम फोकनाड'... हसतहसत साहेब म्हणाले.
याला अर्थ कळला नाही, पण साहेब हसत होते, म्हणजे चांगली असणार असे समजून तो आनंदला.
'येतो साहेब.. थँक्यू!'... असं म्हणून तो बाहेर पडला.
दोनतीन दिवस गेले. पुन्हा तो आला तेव्हा स्वतं:वरच जाम खुश दिसत होता...
दरवाजातूनच हातातला बातमी लिहिलेला कागद उंचावत तो आनंदानं ओरडला, 'साहेब, आज आणखी एक 'फोकनाड' बातमी आणलीय!'...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला प्रतिसाद कुणी नागपुरी देणार अपेक्षितच होतं Wink

फोकनाड म्हणजे काय? परवा ब्लॉगवर पण वाचली पोस्ट पण नक्की समजलं नाही.

Lol

सिंडी मी एका धाग्यावर "वाक्यात उपयोग" करुनही तुला कळला नाही अर्थ? Wink
फोकनाड म्हणजे बाता. फोकनाडबाजी म्हणजे पुड्या सोडणे/फेकणे.

श्या! मला वाटल फोक म्हणजे चाबूक आणी नाड म्हणजे नाडी. ज्याला/ जिला आपली नाडी ( हाताची वा कपड्याची पण) चाबकासारखी वापरायची आहे ते त्या नाडीला फोकनाड म्हणतात. नाडी ऐनवेळी उपलब्ध नसेल तर चाबूक कमरेला गुन्डाळायचा. त्याचा वेळ प्रसन्गी वापर कसाही करता येईल.:खोखो:

तो वेतासारखा असतो ना त्याला ग्रामिण भाषेत फोक म्हणतात असे ऐकलय, खरे खोटे देव जाणे.:अओ:

सिंडरेला, चुकीबद्दल क्षमस्व. मला दुसर्‍या वाक्यातील चौथा शब्द म्हणायचं होतं! पण तुम्ही ओळखायचं ते बरोबर ओळखलंत! Lol
आ.न.,
-गा.पै.

सिंडरेला, चुकीबद्दल क्षमस्व. मला दुसर्‍या वाक्यातील चौथा शब्द म्हणायचं होतं!
>>>>>>>>>

बरे झाले गा पै चूक दुरुस्त केली, अन्यथा मी फोकनाड म्हणजे अधिकारी असा अर्थ काढून मोकळा झालो होतो.
उगाच पुढे मागे ऑफिसच्या साहेबांची ओळख करून देताना म्हणालो असतो, हे इकडचे मोठे फोकनाड आहेत Lol

पण फोक (Folk) म्हणजे 'ग्रमिण' नं? आणी मराठी 'नाड' म्हण्जी...?एखाद्याला नाडतो ते?

गूगल ट्रांन्सलेट वर तर Folk 'म्हणजे घरातील लोक' ?!! काय खरं काय खोटं...?देव जाणे!

फोक हा एकवचनी शब्द नसावा. "फोक्या मारु नको बे" हे नेहमीच वाक्य होतं आमचं Happy
तसच होळीनिमित्त्य "फोक्या मारा" स्पर्धा पण असायची.

फेकणे... म्हणजे खोटे बोलणे...
फोक्या मारणे... म्हणजे खोटे बोलणे...
फोकनाड ... हा याच गटातला ग्रामिण शब्द.

रश्मी..,

>> नाडी ऐनवेळी उपलब्ध नसेल तर चाबूक कमरेला गुन्डाळायचा.

मला उलट वाटतं. नाडी चाबकासारखी वापरू पहाणे याला फोकनाड म्हणत असावेत. नाडीचा कधीतरी चाबूक होईल काय? थोडक्यात म्हणजे निरर्थक काम करणे. इंग्रजीत hogwash (=डुक्कर धुणे) म्हणतात तसे.

आ.न.,
-गा.पै.