मेरा कुछ सामान.....

Submitted by प्रसन्न हरणखेडकर on 9 December, 2013 - 03:01

1) आठवतयं का रे तुला ....?
एकदा आपल्या सायकली ने जेव्हा आपल्याला दिला होता धोका...आपण कसे गरीब-बिचारे असण्याची ऍक्टिंग केली होती……
हवालदार ने उलट आपल्या अंगावर भिरकावले होते तेव्हा त्याच्याकडचेच आठाणे...
चाराणे त्यातले तुझे होते…आणि चाराणे माझे....
अजून हि बरेचसे सामान तुझ्याकडे उरले आहे माझे, बघ जमत असेल तर ते पाठवून दे.......||१||.

माझे काही से सामान, तुझ्याकडे उरले आहे...….
श्रावणात चिंब झालेले ते दिवस, तुझ्याकडे उरले आहेत.…
आणि उरल्या आहेत तुझ्या आठवणींत घालवलेल्या त्या बैचेन रात्री.
बघ विसरण्याचा कर प्रयत्न ; अथवा दे धाडून त्यांना माझ्याकडे..........
अजून हि बरेचसे सामान तुझ्याकडे उरले आहे माझे, बघ जमत असेल तर ते पाठवून दे........||२||

बघ रे जरा बाहेर….सुरु झाला आहे पुन्हा पानगळीचा तो मौसम !
पानगळीतील ती शुष्क पाने…आणि त्यांचा तो व्याकुळ करणारा आवाज….
सांगतोय कारे काही तुझ्या कानात ??
उडून जाउ दे भिरभिरत आठवणींची ती पाने…अथवा दे धाडून त्यांना माझ्याकडे..........
अजून हि बरेचसे सामान तुझ्याकडे उरले आहे माझे, बघ जमत असेल तर ते पाठवून दे........||३|||

घन-निळा बरसताना...एकाच छत्री चा आडोसा घेउन, भिजत होतो आपण दोघे ही….अर्धे त्रुप्त, अर्धे अत्रुप्त
ओले सुके मन.....अन ओली सुकी आपली शरीरे ही…….
आठवणींत नाहलेले मन मात्र अजून ही तुझ्या घरी राहते आहे.
अजून हि बरेचसे सामान तुझ्याकडे उरले आहे माझे, बघ जमत असेल तर ते पाठवून दे........||४||

एक शे सोळा त्या चांदरात्री...एक तुझा तो खांद्यावरील तीळ....
एक शे सोळा त्या चांदरात्री...एक तुझा तो खांद्यावरील तीळ....
ओल्या मेंदी चा तो गंध..अन लटक्या रुसव्या-फुगव्यांनी पडणारा ह्नदयाला पीळ.
खोट्या होत्या का रे त्या शपथा...अन खोट्याच का रे त्या आणाभाका….?
हं !! दे…दे सगळेच धाडून माझ्याकडे.......…
अजून हि बरेचसे सामान तुझ्याकडे उरले आहे माझे, बघ जमत असेल तर ते पाठवून दे........||५||

एकच विनंती करते रे आता........
जेव्हा हे सगळे करेन दूर तुझ्यापासून …..

मी पण होउन जाईन लुप्त तुझ्या जीवनातुन.........................
मी पण होउन जाईन लुप्त तुझ्या जीवनातुन.........................

गुलज़ार साहेबांच्या गीता चा स्वैर अनुवाद

अश्या प्रकारच्या स्वैर अनुवादाचा पहिलाच प्रयत्न आहे.
तुमच्या प्रतिसादांची अपेक्षा करतो. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ऋन्मेऽऽष !!

बी...>>आम्ही सांभाळून घेऊ तुम्हाला<< ते माहीती च आहे, आणि तो माबोकरांवर विश्वास आहे म्हणुन तर माझ्यासारखी माणसे ही वाचकवर्गाला त्रास देतात... Lol

प्रसन्न, प्रयत्न खुप छान मनापासून केलायत. थोडीशी मजा वाटली स्वैर अनुवाद वाचताना.
मूळ गाणं गंभीर आहे पण अनुवाद वाचताना ते गांभीर्य कुठेतरी हरवलंय असं वाटलं. जरासा शब्दशः झालाय प्रयत्न. खरंतर मला कुठेकुठे किंचीत हसू आलं वाचताना.

उदा. एक शे सोळा त्या चांदरात्री...एक तुझा तो खांद्यावरील तीळ....>> हे जसं गायलं गेलंय तसंच तोडून तुम्ही रुपांतरीत केलंय. गुलजारसाहेबांनी लिहिताना त्या ओळी सलगच लिहिल्यात.

तुम्ही गाण्यापेक्षा मूळ कवितेचा अनुवाद केलात तर जरा वेगळं आणि यापेक्षा जास्त चांगलं होईल काहितरी.. स्वैरच अनुवाद करताहात तर तुम्हाला आवश्यक तिथे संदर्भाशी मिळताजुळता बदल करण्याचं स्वातंत्र्यही आहे, ते थोडंसं घ्यायला हवं तुम्ही.

@ सिमंतीनी <<शीSSश!! ११६ फेजेस ऑफ मून म्हणजे ४ महिने झाले कि. भलती इंटेन्स बया असणार. ४ महिन्याच्या प्रेमावर एवढ इमोशनल ब्लाक्मेल!!!>> हे लईच भारीये Rofl

सई,
>>तुम्ही गाण्यापेक्षा मूळ कवितेचा अनुवाद केलात तर जरा वेगळं आणि यापेक्षा जास्त चांगलं होईल काहितरी.. स्वैरच अनुवाद करताहात तर तुम्हाला आवश्यक तिथे संदर्भाशी मिळताजुळता बदल करण्याचं स्वातंत्र्यही आहे, ते थोडंसं घ्यायला हवं तुम्ही.<<

Point noted....फार चांगला मुद्दा मांडला तुम्ही...धन्यवाद

Pages