Submitted by बेफ़िकीर on 7 December, 2013 - 21:50
नमस्कार मित्रहो. हा धागा त्या सर्वांसाठी आहे ज्यांना आज होणारी मतमोजणी, त्यातून निघणारे निकाल, त्यांचे अर्थ, मतदारांचा कल, नजीकच्या भविष्यावर होणारे त्यांचे परिणाम या सर्वांवर हिरीरीने किंवा विश्लेषणात्मक चर्चा करायची आहे अथवा वाचायची आहे.
मतमोजणी सुरू झालेलीच आहे.
वैतक्तीक शेरेबाजी टाळली तर धागा सुरळीत चालेल व मा. प्रशासकांना लक्ष घालण्याची वेळ येणार नाही असे वाटते.
बाकी राजकीय पक्ष, नेते, आपण सगळे ह्या सर्वांची खुसखुषीत खेचाखेची सगळ्यांनाच आवडू शकेल, एका मर्यादेत.
धन्यवाद
-'बेफिकीर'!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या अन्य दोनपैकी एक
त्या अन्य दोनपैकी एक भाजपाच्या मित्रपक्षांची आहे बहूतेक. म्हणजे अगदी २ किंवा ३ सीट्समूळे सत्ता जातेय भाजपाकडून.
दिल्लीत तुलनेने जास्त जागा वाढल्या नाहीत भाजपाच्या. पूर्वीपेक्षा फक्त १०च जागा जास्त आहेत.
साहब सिंग वर्मांनंतर १५ वर्षांनंतर दिल्लीत सत्तेच्या अगदी जवळ येवून २-३ सीट्सचाच फरक पडतोय.
बहूतेक घोडेबाजार भरणार असं दिसतंय दिल्लीत.
छत्तिसगडमध्ये पण कोण येईल सत्तेवर सांगता येत नाहीये. अगदी एखादं-दुसर्या सीटचा फरक आहे काँग्रेस आणि भाजपामध्ये.
स्पष्ट बहुमत २/३ मानले जाते
स्पष्ट बहुमत २/३ मानले जाते ना? की अर्धे? मला २/३ वाटत आहे म्हणून ४६ लिहीले आहे मयेकर.>>> विदिपा,तुमचं बरोबर आहे.स्पष्ट बहुमतासाठी ७० सीटसच्या २/३ म्हणजे ४६ जागा हव्यात.
ह्म्म्म आआपने फार मोठा खोडा
ह्म्म्म आआपने फार मोठा खोडा घातला आहे भाजपला निर्विवाद बहुमत मिळण्यात.
आता जर दिल्लीमधे त्रिशंकू परिस्थिती झाली तर यांनी भाजपला मदत करावी.
मला अजुनही आआप हा दिल्लीमधला लोकल पक्ष वाटत आहे.
जसे आंध्रात तेलगू देसम, महाराष्ट्रात शिवसेना, मनसे तसे दिल्लीत आआप.
देशव्यापी पक्ष होण्यासाठी खुप प्रयत्न करणे आवश्यक आहे.
केवळ दिल्लीच्या विजयाच्या जोरावर जर त्यांना असे वाटत असेल की आपण कॉन्ग्रेस आणि भाजपच्या बरोबरीचे आहोत देशभरात तर ते खरे नाही, सोपे नाही.
आप नाही करणार मदत ९९.९९%.
आप नाही करणार मदत ९९.९९%. कारण तसं झालं तर तो मतदारांचा विश्वासघातच होईल.
दिल्लीत रिइलेक्शन आणि तोपर्यंत राष्ट्रपती राजवटीची शक्यता जास्त वाटतेय मला.
@ महेश, दिल्लीमध्ये सुद्धा आपने ज्यावेळी काम सुरु केलं त्यावेळी त्यांचं काही भविष्य असेल असं वाटत नव्हतं. त्यामूळे आपबद्दल काही सांगता येणार नाही. तसंही त्यांचे नेते किंवा कार्यकर्ते अगदी नवे आहेत इथेसुद्धा. कदाचीत बाकी ठिकाणीसुद्धा असंच नवं नेतृत्व तयारही होईल. यु नेव्हर नो.
>>तसंही त्यांचे नेते किंवा
>>तसंही त्यांचे नेते किंवा कार्यकर्ते अगदी नवे आहेत इथेसुद्धा. कदाचीत बाकी ठिकाणीसुद्धा असंच नवं नेतृत्व तयारही होईल.
तीच तर भिती आहे. अननुभवी आणि रूट लेव्हलला जाऊन लोकसंपर्क नसलेल्या लोकांच्या हातात नेतृत्व जाणे आणि ते सुद्धा एवढ्या कमी काळात हे फार चांगले नाही. असो काहीतरी बदल होतो आहे हेही नसे थोडके.
स्पष्ट आणि अस्पष्ट बहुमत असे
स्पष्ट आणि अस्पष्ट बहुमत असे काही नसते, फक्त बहुमत असते, ज्याने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पास करता येतो. ७० सदस्यसंख्येच्या विधानसभेत ३६. महाराष्ट्रात २८८ पैकी १४५.
अल्पना+१ आम आदमी पक्षाला
अल्पना+१
आम आदमी पक्षाला मिळालेली मते ही केवळ काँग्रेसविरोधी मते नसून तो त्या पक्षाला मिळालेला पाठिंबा आहे. मतांची टक्केवारी आल्यावर कळेलच की भाजपची मते वाढली आहेत का ते.
दोन्ही पक्षांना जागे करण्यात आपला अखेरीस यश मिळाले.
मयेकर.... स्पष्ट बहुमत या
मयेकर.... स्पष्ट बहुमत या अर्थाने म्हणत असतील की ... कोणताही कायदा अथवा ठराव पास करायचा असेल त्याल २/३ बहुमत लागते..... अश्या अर्थाने राज्यात होणारे सगळे पक्षाचे ठराव कोणत्याही इतर कोणत्याही पक्षांच्या कुबड्या न घेता सुध्दा पास करु शकतात...
नाशिक सारखी अवस्था दिल्लीची
नाशिक सारखी अवस्था दिल्लीची होउ नये ................
सत्ता स्थापन करायला ५०
सत्ता स्थापन करायला ५० टक्के+१ इतक्याच जागा लागतात हो. बहुसंख्य ठराव साध्या बहुमतानेच पास होतात. घटनेतील काही कलमांच्या दुरुस्तीसाठी तेवढे २/३ बहुमत लागते.
(इथे बरेच पहिल्यांदाच मतदार होऊ घातलेले लोक दिसताहेत
)
आप नी इथेतरी अगदी घरोघरी
आप नी इथेतरी अगदी घरोघरी जावून प्रचार केला होता. त्यामूळे लोकसंपर्क नाही असं म्हणता येणार नाही. पण अर्थात मला पण त्यांच्या अननुभवी असण्यची भिती वाटतेय. भ्रष्टाचार आणि महागाई हे दोन त्यांचे मुद्दे होते. वीजेचे दर कमी करणार, घरटी ७०० लीटर पाणी फ्री देणार ( हे केलं तर निम्म्यापेक्षा जास्त दिल्लीचं पाण्याचं बील शुन्य येईल) अश्या काही घोषणा होत्या त्यांच्या. हे सगळं अश्वासनाप्रमाणे कसं जमेल कोण जाणे.
आप स्पष्टपणे हातमिळवणी
आप स्पष्टपणे हातमिळवणी करण्यापेक्षा "बाहेरून पाठिंबादेखील" देऊ शकेल. भाजप एक किंवा दोन सीटसाठी सत्ता हातातून जाऊ देईल असे वाटत नाही. कदाचित घोडेबाजार ऑलरेडी तेजीत आला असेल.
भारतामधे सत्ता स्थापन करायला २/३ बहुमत ठेवलं तर दर वेळेला त्रिशंकू अवस्थाच येत राहिल.
सत्ता स्थापन करायला ५० टक्के+१ इतक्याच जागा लागतात हो. बहुसंख्य ठराव साध्या बहुमतानेच पास होतात. घटनेतील काही कलमांच्या दुरुस्तीसाठी तेवढे २/३ बहुमत लागते.>> +१.
भाजपने कॉँग्रेसचा धुव्वा
भाजपने कॉँग्रेसचा धुव्वा उडवला ही फारच मस्त गोष्ट झाली. सत्तेच्या मदाने आंधळे होऊन काय वाट्टेल ती विधाने करून कॉंगींनी सर्वांचाच रोष ओढवून घेतला होता.
पण आता एक भारतीय म्हणून एकच इच्छा
हाच मद भाजपला ही होऊ नये. म्हणजे यांच्यापेक्षा कॉँग्रेस परवडले अशी गत कृपया होऊ देऊ नये हीच कळकळीची इच्छा
या निवडणूकांमध्ये मते
या निवडणूकांमध्ये मते खालीलपैकी नेमकी कशामुळे मिळाली याबाबत कृपया आपापले म्हणणे मांडू शकाल का? (राज्यनिहाय वेगवेगळे दिलेत तर अधिक उत्तम व्हावे) (काँबिनेशन ऑफ टू ऑर थ्री असेही दिले तरी आवडेलच)
१. चांगले प्रशासन किंवा वाईट प्रशासनाविरुद्ध?
२. विशिष्ट व्यक्ती त्या पक्षाची प्रमुख असणे / चेहरा असणे
३. केवळ एक बदल हवा असणे
४. अधिक मतदान होणे
५. जागतिक / सुधारणावादी / पारदर्शीत्ववादी दृष्टिकोन ठेवणार्या तरुणाईने मतदानात सहभागी होणे
६. विशिष्ट व्यक्ती हा पक्षाचा चेहरा नकोसा वाटल्यामुळे
७. इतर काही कारणे
धन्यवाद!
सर्वांकडून होत असलेल्या हेल्दी चर्चेसाठी सर्वांचे आभार!
केवळ एक बदल हवा असणे!!! हेच
केवळ एक बदल हवा असणे!!! हेच सर्वात महत्त्वाचे एकमात्र कारण बाकीची कारणे ह्याच्या खाली झाकली जातील अशी आहेत
महेश, >> तरी देखील 'आप' ला
महेश,
>> तरी देखील 'आप' ला शुभेच्छा 'केजरीवाल' यांना नाही. कारण या पक्षाकडून व्यक्तीपुजेची अपेक्षा नाही.
माझं थोडं वेगळं म्हणणं आहे. व्यक्तिपूजा म्हणजे सारासार विचार ना करता कोण्या व्यक्तीच्या गुणावगुणांची भलामण करणे असं मला वाटतं. या संदेशात तुम्ही सारासार विचार केल्याचं दिसून येतं. त्यामुळे केजारीवालांचं अभिनंदन केलं तरी त्यास व्यक्तिपूजा म्हणण्यात येऊ नये.
आ.न.,
-गा.पै.
या निवडणूकांमध्ये मते
या निवडणूकांमध्ये मते खालीलपैकी नेमकी कशामुळे मिळाली याबाबत कृपया आपापले म्हणणे मांडू शकाल का? (राज्यनिहाय वेगवेगळे दिलेत तर अधिक उत्तम व्हावे) (काँबिनेशन ऑफ टू ऑर थ्री असेही दिले तरी आवडेलच)
१. चांगले प्रशासन किंवा वाईट प्रशासनाविरुद्ध?
* राजस्थानः- यात चांगले किंवा वाईट प्रशासन हा मुद्दा नव्हता माझ्यामते.. राजस्थानात नक्कीच चांगली कामगीरी केलेली होती.. परंतु दर पाच वर्षांनी सरकार बदलणे हा ट्रेंड बहुदा जास्त रुजला आहे..
* दिल्ली:- कॉमनवेल्थ चा भ्रष्टाचार आणि निर्भया प्रकरण चांगलेच शेकलेले आहे.. मुळात दिल्लीची पोलीस ही मुख्यमंत्र्यांच्या हाती नसुन केंद्राच्या हाती आहे त्याचा फटका मुख्यमंत्र्यांना बसला..त्यातच १५ वर्षापुर्वी ज्या मुख्य कारणाने भाजपाची सत्ता गायब झालेली कांदा महाग झाल्यामुळे ..... त्याची पुनरावृत्ती परत झाली त्यातच महागाईला आप ने झालेल्या भ्रष्टाचाराशी जोडले.. आणि तसेच झालेले अण्णांचे आंदोलन याचा प्रतिकुल परिणाम दिल्लीच्या मतांवर झाला आणि भुतोनाभविष्य काँग्रेस चा पराभव झाला...
जी व्यक्ती १५ वर्ष सत्तेवर होती आणि कॉमनवेल्थ च्या वेळेला मंचावर सगळ्याचा हुर्या उडत असताना शीला दिक्षित आल्यावर टाळ्यांचा गजर झालेला...... अश्या व्यक्तीचा पराभव हा केवळ काँग्रेस चा पराभव आहे.. ज्या महागाई आणि इतर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले........त्याच मुद्द्याचे कारण आले....
२. विशिष्ट व्यक्ती त्या पक्षाची प्रमुख असणे / चेहरा असणे
असे असते तर दिल्ली आणि छत्तीसगड मधे सुध्दा एक हाती सत्ता आली असती.. काँग्रेस विरोधी रोष आपल्याकडे वळवण्यात भाजपा अपयशी ठरली .. जिथे ४०-४५ सीटस यायला हवी तिथे ........ भाजपाला पर्याय म्हणुन मतदारांनी आम आदमीचा हात पकडला........
छत्तीसगड आणि राजस्थान इथे जर भाजपा आणि काँग्रेस व्यक्तिरिक्त दुसरा चांगला पक्ष असता तिथे सुध्दा हेच चित्र दिसुन आले असते..
अल्पना, दिल्लीचा हा पक्षनिहाय
अल्पना, दिल्लीचा हा पक्षनिहाय नकाशा पहा. मतदारसंघांच्या नावावरून मध्यमवर्गीयांचे/शिक्षितांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांत आपने विजय मिळवलेला दिसतोय. त्यांच्या मतदारसंघांचे भौगोलिक क्षेत्र कमी तर भाजपाने जिंकलेल्या मतदारसंघांचे भौगोलिक क्षेत्र जास्त आहे. भाजपचे मतदारसंघ ग्रामीण/निमशहरी आहेत का?
भाजपने कॉँग्रेसचा धुव्वा
भाजपने कॉँग्रेसचा धुव्वा उडवला ही फारच मस्त गोष्ट झाली. सत्तेच्या मदाने आंधळे होऊन काय वाट्टेल ती विधाने करून कॉंगींनी सर्वांचाच रोष ओढवून घेतला होता.
पण आता एक भारतीय म्हणून एकच इच्छा
हाच मद भाजपला ही होऊ नये. म्हणजे यांच्यापेक्षा कॉँग्रेस परवडले अशी गत कृपया होऊ देऊ नये हीच कळकळीची इच्छा>>> आगदी मनातलं लिहिलत चँप |...
http://www.firstpost.com/poli
http://www.firstpost.com/politics/rs-2960-cr-assets-2-rajasthan-candidat... यातली किमान एक निवडून आली आहे.
मयेकर अगदी अगदी तुम्ही म्हणता
मयेकर अगदी अगदी तुम्ही म्हणता तसेच असणार आहे हे.
मला आआपचा विजय हा केवळ उच्चमध्यमवर्ग, युवक आणि एलाईट क्लासच्या मतदानामुळे झाला असे वाटत आहे.
या लोकांचा लोकसंपर्क (जरी वर अल्पना यांनी म्हणले आहे की घरोघरी जाऊन प्रचार केला) तरी तो कॉन्ग्रेस आणि भाजपसारख्या पक्षांप्रमाणे तळागाळात नाही.
या विजयाच्या उन्मादात आआपचे लोक म्हणत आहेत की २०१४ च्या केंद्रीय निवडणूकीत २ किंवा ३ क्रमांकाचा पक्ष आमचा असेल. हे जरा कैच्याकै अतीच वाटत नाही का ?
आआपने अण्णा हजारे यांचे जाहिर आभार मानले पाहिजेत या विजयासाठी.
लोकहो, बीबीसीने काल
लोकहो,
बीबीसीने काल संध्याकाळी ५ वाजल्यापासून (भाप्रवे २१३०) ताजी माहीती स्थळावर टाकली नाही. हे असं क्वचितच घडतं. भाजपचा एव्हढा धसका घेतला की काय!
आ.न.,
-गा.पै.
गामा........... हिंदी बीबीसी
गामा........... हिंदी बीबीसी बघा जरा...... त्यात स्प्ष्ट दिलेले आहे... लाईव्ह अपडेट चालु आहे..
उगाच बागुलबुवा ची भीती दाखवु नका इथे
कोण कुणाला घाबरत नाही
अहो उदयन.., हिंदी बीबीसी
अहो उदयन.., हिंदी बीबीसी भारतीय लोकांसाठी ठीकाय. जगातल्या बाकीच्या लोकांना काहीच दिसत नाही.
आ.न.,
-गा.पै.
बाकीच्या जगाला छत्तीसगड
बाकीच्या जगाला छत्तीसगड राजस्थानात काय चालु आहे कुणाला काय करायचे ?
भारतातली मिडिया दाखवतात का लंडनमधल्या राज्याच्या निवडणुका ?
कैच्याकै
हाच मद भाजपला ही होऊ नये.
हाच मद भाजपला ही होऊ नये. >>> भाजपाचे माहीत नाही पण पेड आर्मीला नक्कीच चढलेला आह
स्पष्ट बहूमत म्हणजे 100 पैकी
स्पष्ट बहूमत म्हणजे 100 पैकी 51 जागा (विधान सभा/ लोकसभा) होय. एवढ्या जागा असल्या की सरकार बनवायला/ चालवायला येते. नवीन कायदे करायचे झाले तर खालच्या सभागृहात (विधानसभा/ लोकसभा) 2/3 बहूमत आणि वरच्या सभागृहात (विधानपरिषद / राज्यसभा) साधे बहुमत (100 पैकी 51) लागते. सर्वच राज्यात विधानपरिषद असतील असे काही नाही.
उदयन.., >> बाकीच्या जगाला
उदयन..,
>> बाकीच्या जगाला छत्तीसगड राजस्थानात काय चालु आहे कुणाला काय करायचे ?
जालनिर्देश (यूआरेल) भारताकडे आहे. भारतातल्या ताज्या बातम्या नकोत तिथे?
आ.न.,
-गा.पै.
लंडन मधे आहात
लंडन मधे आहात ना.............लावा जरा फोन........विचारा जाब.............. बघु बर करता येते का तुम्हाला तिथे बसुन तिथल्याच साईट वर बोलायला
इथे भारतातल्या साईटवर विचारुन उपयोग ?
वोटर टर्नआउट जास्त आहे
वोटर टर्नआउट जास्त आहे ह्यावेळी. नेहमी घरी बसून काँगेस हटाव असे चर्चेत म्हणणारे खरचं मतदानाला गेल्यामुळे काँग्रेसची वाट लागली हे ही अनेक कारणांपैकी एक.
बीजेपीचे अभिनंदन. आता २०१४ला ही असेच घडो.
Pages