माझी हि अक्षर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 December, 2013 - 11:24

माझी हि अक्षर | उधार बाजार |
रसिका स्वीकार | केली तुम्ही || १ ||
पुरविली हौस | लिहण्याचा सोस |
केलेले सायास | कामी आले ||२ ||
झाला कृपावंत | शाबासी दिलीत |
न्हालो कौतुकात | पुनःपुन्हा||३||
कधी आणियेला | तुम्हाला कंटाळा |
उगाच मांडला | पसारा हि ||४ ||
कधी सुख दु:ख | सांगून रडलो |
गळा मी पडलो | बळे कधी ||५||
कधी शब्दातून | कधी शब्दाविन |
गेला थोपटून | प्रेमभरे||६ ||
ऐसे सांभाळिले | मानून आपुले |
मैत्र हे जागले | हृदयात ||७||
आहे ऋणाईत | तुमचा अनंत |
नमितो विक्रांत | म्हणूनिया ||७||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधी शब्दातून | कधी शब्दाविन |
गेला थोपटून | प्रेमभरे||६ ||......... क्या बात है - अगदी ये ह्रदयींचे ते ह्रदयी !!

धन्यवाद शशांक वैभव,अंजली,शिल्पा .पुन्हा उशीरा बद्दल क्षमस्व .