Submitted by अमेय२८०८०७ on 7 December, 2013 - 00:12
नको फुलवूस श्वास
नको हताश होऊस
तुझ्या अंगणातही रे
आता पडेल पाऊस
येता बरसून धारा
मेघव्यथेला घेऊन
सहवेदनेची दिठी,
डोळा जाईल भरून
जाणीवाही नवनव्या
उरातून वाहतील
जे ना आकळले कधी
माग त्याचा काढतील
असे जगासाठी जुना
तुझा पहिला असेल
कायामन भिजताना
खूप काही गवसेल
नको आकांत जिवाचा
नको पाण्यामध्ये देव
फक्त स्वागतासाठी तू
भुई नांगरून ठेव
-- अमेय
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नको आकांत जिवाचा नको
नको आकांत जिवाचा
नको पाण्यामध्ये देव
फक्त स्वागतासाठी तू
भुई नांगरून ठेव>>>>>>> वा मस्त !!!
सुरेख!
सुरेख!
सुंदर!
सुंदर!
अहाहा, क्या बात है.... केवळ
अहाहा, क्या बात है....
केवळ सुंदर....
नको आकांत जिवाचा नको
नको आकांत जिवाचा
नको पाण्यामध्ये देव
फक्त स्वागतासाठी तू
भुई नांगरून ठेव
सुंदर..
छान कविता. शेवटची दोन कडवी
छान कविता.
शेवटची दोन कडवी खासच.
>>असे जगासाठी जुना तुझा
>>असे जगासाठी जुना
तुझा पहिला असेल
कायामन भिजताना
खूप काही गवसेल >>
आपापल्या पहिल्या पावसाची आशादायी कविता.सुंदर.
वाह अमेय !!
वाह अमेय !!
नको आकांत जिवाचा नको
नको आकांत जिवाचा
नको पाण्यामध्ये देव
फक्त स्वागतासाठी तू
भुई नांगरून ठेव
व्वा!
फेबु वर बोललोच आहोत .. शेवटचे
फेबु वर बोललोच आहोत ..
शेवटचे कडवे कळसाचे !!
व्वा! कित्ती छान कविता! सुंदर
व्वा!
कित्ती छान कविता!
सुंदर
shvatache kadave aavadale !
shvatache kadave aavadale !