कार्डियो मायोपथी

Submitted by धानी१ on 4 December, 2013 - 06:46

वरील शाब्द कदचित आपल्या पैकि बर्यच लोकान माहितहि नसेल. जसा मला न्हवता. अगदी अलिकडेच समजला आनि माझ आणि नवर्यचा आयुश्या बदालला!!!

माझा मुलगा, वय ९.५ महिने.अचनाक वरील आजारामुळे दगवला.
खारेतर माझी डिलिवरी नैसर्गिक होति. बाळ जन्मल्यावर ज्या काही टेस्त होतात त्यात बाळ अगदि नोर्मल.
त्या नन्तर ७-८ महिने बाळ अगदि छान. मान धरणे, आजुबाजुच्या आवजाचे भान्, डोळे स्थिरवणे, हुन्कार देणे, पालथे पडणे. बसणे अगदि वेळेवर. खाणे, सु-शी इत्यादी गोश्ति नियमीत. खेळकर.

७व्या महिन्यात ताप आल तोहि पाहिल्यान्दा. आणि त्यानन्तर हवे तसे वजन वाढले नाही. आम्हि वेळोवेळि डोक्टरान्च्या निदर्शनस हि बाब आणली. मात्र त्यान्च्य मते ते कळजीचे कारणन्ह्यावते,मत्र ८व्या महिन्यात वजन अजिबात न वाढता कामि झाले. तेवा डोक्टरनि blood,urine test सन्गितल्य. आम्हि त्याप्रमाने त्या केल्या.ही गोष्त aug ४ ची. repots normal.

१२ च्या रात्री सर्दि आणि खोक्ला फार जनवू लगला म्हनून आम्हि १३ ल डोक्ट कडे गेलो. आणि तेवा डोक्टला breahlessness जाणवला म्हनून immediately 2D eco cardiogram काढान्यास सान्गित्ले. अगदी १ minute न दवाड्ता अम्हला cardiologist क्डे जान्यास सन्गितले.तीथे अम्हला dialated cardio myopathy बद्दल कळले. मत्रा आजार एव्ढा बळवल कि होस्पितल च्या मार्गवरच बाळ गेले.
म्हाणेजे काहि तासन्त खेळ सम्प्ल.

dialated cardiomyopathy म्हणजे काय?
व्व्हयरस मुळे ह्रुदयाच्या काहि भागाला सूज येणे. आणि त्यामुळी ह्रुदयाच रक्त शुद्ढ करान्याचि क्शमता कामि होणे.आणि त्याचा वाधिवर परिनाम.

हे वेळ १ लखात एकद होते. आनि आम्हि ते १ ठर्लो.

या आजारावर औशधे नहित. heart transplant हाच उपचर तोहि यशस्वी होन्याचे chances only 1-1.5%
हा आजर viral आहे. त्याचे फार्शि लक्शने दिसात नहीत. त्यमुळे ह कळतोच मुळी उशिरआ.

काही महिन्यन्पूर्वि सेम केस मुम्बै ल असे doctor चे म्हणने.

या गोश्तिला आत ३ महिने होतिल मत्रा यातून अजुनहि बहेर येउ शकलो नहि. प्रयत्न करतआहोय्त.
आप्ला हसत खेळत बाळ आचनक निघून गेले हे दु:ख आहे.

कोन्णि आहे क माझ्यासर्खा दुर्दैवी माबो वर? असल्यस चाल एक्मेकना आधार देउ.

माझ्यसर्ख दु:ख कोणलही न लाभो आग्दि शत्रुलाही नाही. हीच त्या गणराया कडे प्रर्थना.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांत्वनासाठी शब्द अपूरे आहेत धानी. सध्या तुम्ही जमेल तितके इतर गोष्टीत मन गुंतवायचा प्रयत्न करा. ते तिथे रमणार नाही पण या दु:खाचे तीव्र विचार तुम्हाला जास्त त्रास देतील.

धानी वाचून अतिशय वाईट वाटलं. स्वतःला सांभाळा. हे दु:ख डोंगराइतकं आहे पण हे सोसायचं बळ मिळो हीच प्रार्थना.

सांत्वनासाठी शब्द अपूरे आहेत धानी. सध्या तुम्ही जमेल तितके इतर गोष्टीत मन गुंतवायचा प्रयत्न करा. ते तिथे रमणार नाही पण या दु:खाचे तीव्र विचार तुम्हाला जास्त त्रास देतील. >> +१
सुमेधाव्ही, तुमची मैत्रीण कोणत्या मनस्थितीतून जात असेल ह्याचा विचारही करवत नाही! Sad

धानी खूप वाईट वाटलं पण काय इलाज? कशात तरी मन गुंतव. काळ हाच उपाय.
सुमेधाव्ही, तुमची मैत्रीण कोणत्या मनस्थितीतून जात असेल ह्याचा विचारही करवत नाही! << +१
सुमेधा तुझ्या मैत्रिणी बद्दल वाचलं होतं मागे. कशी आहे ती आता?

अतिशय वाईट वाटलं वाचून. तुम्हाला यातून सावरायचं बळ मिळो. तुमचं घर पुन्हा लवकरात लवकर हसरं खेळतं होवो. >>> अनुमोदन ..

सर्वांच्या भावनेप्रमाणेच माझीही भावना आहे. फार वाईट वाटले. गा मा पैलवानांच्या मुद्याशीही सहमत असून तो एक नवीनच मुद्दा ध्यानात आला.

वाचून फार वाईट वाटले. ग्रीफ काउंसलरची मदत घेता आली तर कदाचित अजून योग्य सल्ले तज्ञाकडून मिळतील.

अतिशय वाईट वाटलं वाचून. तुम्हाला यातून सावरायचं बळ मिळो. तुमचं घर पुन्हा लवकरात लवकर हसरं खेळतं होवो. >>>+१

खूप वाईट वाटल धानी!
देव तुम्हाला सावरायचं बळ देवो! आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण येवोत.

खुप वाईट वाटलं गं!!! Sad
देव करो नि तुम्हाला यातून सावरायचं बळ मिळो. तुमचं घर पुन्हा लवकरात लवकर हसरं खेळतं होवो. >>>+१>>>+१

देव करो नि तुम्हाला यातून सावरायचं बळ मिळो. तुमचं घर पुन्हा लवकरात लवकर हसरं खेळतं होवो.>>++१११११

सर्व माबो मित्र मैत्रिनी धन्यावाद,

कोनशितरि बोलायच होत. बस!!!!

सुमेधा तुम्च्या मैत्रिनी च दु:ख खरच खूप मोथय.
एक आइ म्हनून समजू शकते.

अश्विनिमामीएखूप धन्यवद्द. एकाकि वाटल तर तुम्हि सगळे आहातच.

.

धानी स्वतःची काळजी घ्या...
असेच काहीसे आमच्या मित्राच्या कुंटुबाबरोबर झाले होते. मित्राची मिसेस खुप डिप्रेशनमध्ये होती.
कौन्सेलिंगद्वारे तिने स्वतःला खुप सांभाळले. या वर्षी त्यांच्या घरी पुन्हा छोटा राजकुमार आला आहे. खुप आनंदात आहेत ते आता. तुम्हाला देखील तुमचा आनंद लवकरच मिळो हि मनापासुन सदिच्छा...

धनी१

खुप वाईट वाटलं , ईश्वर तुम्हाला या दु:खातुन बाहेर पडण्याची ताकत देवो.

आपलं मूल आपल्या डोळ्यादेखत जाण्यासारखं दुसरं दु:ख नाही. मी पण या दु:खातुन गेलो आहे.
माझा हि मुलगा ६ महिन्याचा होऊन गेला (अर्थात ह्या आजाराने नाही) ताप पटकन पूर्ण शरीर भर आठवड्यात पसरला कि बालरोग तज्ञा ना हि याचा seriousness लक्षात आला नाही (आता तो १० वर्षाचा असता)

धानी, तुमचं दु:खं मी समजू शकते असं म्हणताही येणार नाही. नुस्तं वाचून पोटात खड्डा पडला.
इथे सगळ्यांनी जे म्हटलय तेच पुन्हा एकदा मी ही म्हणते. देवानं हे दु:खं सहन करण्याची त्यातून बाहेर पडण्याची ताकद तुमच्यातच ठेवली आहे. ती शोधून, खेचून काढून तिच्याच सहाय्यानं पुढलं आयुष्यं वेचायचय... काउन्सिलिंग, सपोर्ट ग्रुप, ध्यान.. मित्रं मैत्रिणींशी अर्थपूर्णं संपर्कं, काही छंद... ह्या सगळ्यातून तुम्हाला एकेक क्षण, मिनिट, तास... दिवस सुसह्यं होत जाणारेत.
डोंगराएव्हढं दु:ख ज्यांच्या पदरात घालतो ना देव, ती त्याच ताकदीची माणसं असतात. तुम्ही आहात असं स्वतःला बजावा. लवकरच तुमचं घर पुन्हा हसतं-खेळतं होऊदे.
तुम्ही इथल्या आम्हा सगळ्यांच्या प्रार्थनेत असाल... ह्याची मीच खात्री देते.

Pages