चालतो मी बोलतो जे

Submitted by जयदीप. on 2 December, 2013 - 22:40

मापताना वेस माझी..काळजी तू घे जरा
जो दिसे तो मी नसे पण, मी तसा आहे खरा

का दिलासा देत नाही, आरसा आता मला
राहिलो ना आज येथे..मीच माझा आसरा

परतले कित्येक वेळा, शब्द ओठी येउनी
ती जरा हळवी तशी अन्, मी जरासा लाजरा

मी इथे नाही कुणाचा, ना इथे माझे कुणी
बघ हवेला होत आहे...आज वारा बोचरा..

पांघरूनी वेड आहे, हा जमाना बेरका
चालतो मी बोलतो जे, मी कुठे आहे बरा?

=====================================
मी तशी गोंजारली पण शांत ना झाली दुखे
बोट माझे कापलेहा..लाघवी आहे सुरा

मी तसा निश्चिंत आहे...वाहतो वार्यासवे
सांगना मज कोण तो जो , वाहतो माझी धुरा

फार चिवडा होत आहे, फोडणी मोठी इथे
हळद आहे मोजकी पण, होत पिवळा कुरमुरा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकीचे शेर अगदीच यमकानुसारी वाटत आहेत यमकेही इतकी चपखल व हृदयंगम वाटली नाहीत खयाल वा मांडणीतही फार काही नाविन्य जाणवले नाही सफाई दिसून आली नाही असे काहीतरी म्हणतात लोक तसे म्हणावेसे वाटले
फक्त एक शेर मात्र वाखाणण्याजोगा वाटला .....

मी तसा निश्चिंत आहे...वाहतो वार्‍यासवे
सांगना मज कोण तो जो , वाहतो माझी धुरा

हा शेर अप्रतीम झालाय !!

मला अजून एका कारणासाठी तो आवडला ....एक माझा शेर आठवल्याने ...

'फुटेल की उडेल'ची तुला उगाच काळजी
फुगा दिलाय सोडुनी खुशाल अंबरात मी

Happy

सुराही बर्‍यापैकी आवडला
शुभेच्छा