थेंब गेला फांदीवर

Submitted by सखा on 2 December, 2013 - 01:25

आला रे जोरात पाऊस
ओली झाली सारी फुले
इवला इवला एक थेंब
पहाना कसा मस्त झुले

एक फांदी म्हणे थेंबा
ये ना आपण करू दंगा
हसू खेळूया पोटभर
घेईन तुजला खांद्यावर

थेंब बसे मग फांदीवर
उड्यामारी तो पोटभर
या रे झुला आपण खेळूया
खुदु खुदु खूप खूप हसुया

सत्यजित खारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना चांगलीये, पण लयीत बांधता आली असती तर अजून छान झाले असते (वै. मत, कृपया गैरसमज नसावा.)

गैरसमज अजिबात नाहीये. हि कविता लयीत म्हणता येते कि नाही या बद्दल दुमत असू शकेल.(हि कविता मात्रा वृत्तात आहे) चला थोडा वेळ आपण हा मुद्दा जरा बाजूला ठेवूया. परंतु मला एक विचार मांडायचा आहे. मला हे कळत नाही कि कुठलीही कविता वाचताना आपण मराठी मंडळी नेहमी फुटपट्ट्या घेवून का बसलेले असतो? मला माझी पाठ थोपटून अजिबात घ्यायची नाहीये पण छोट्या मुलांनी आणि त्यांना म्हणून दाखवणाऱ्या पालकांनी हि कविता एन्जॉय केली आहे. (हि कविता बोबो नावाचा रोबो पुस्तकातील आहे आणि ही पुस्तकाची जाहिरात नाही).
मला असे वाटते कि आपला समाज कुठलीही कलाकृती एन्जॉय करणेच विसरत चाललाय. हि बाल कविता आहे आणि मला सांगा जेव्हा आई बाबा त्यांना हि कविता म्हणून दाखवतात तेव्हा एक तरी मूल लयीत हवी होती असे म्हणते काय? उलट मुले थेंब imagine करतात आणि खरच खुदू खुदू हसतात.लहान मुलांच्या कवितेचा तोच हेतू नाही काय?

मला कविता आवडली व छान लयही मलातरी मिळाली ह्यात पण लहान मुलांसाठी ही आकळायला जर्राशी जड आहे असे वाटले अर्थात लहान मुलांसाठी असे म्हणतात तेव्हा किती लहान वयाच्या मुलांसाठी हे लेखन असते हे मला माहीत नाही मी अगदीच ७-८ वर्षापर्यंतच्या मुलाना लहान समजतो त्यानंतर ती थोडी मोठी समजतो १४ पर्यंत आली की बर्‍यापैकी मोठी समजतो मग १८ आणि त्यानंतरच्या वयाची झाली की मुले मोठी झाली असे समजतो