मासिक भविष्य डिसेंबर २०१३

Submitted by पशुपति on 30 November, 2013 - 23:34

के .पी पद्धतीप्रमाणे डिसेंबर महिन्याचे भविष्य

( सर्व भविष्य चंद्र राशी प्रमाणे दिली आहेत. खरे तर लग्न राशीप्रमाणे द्यायला हवीत पण बऱ्याचदा
लग्न रास माहित नसते म्हणून चंद्र राशी प्रमाणे दिली आहेत.)

मेष :- या महिन्याच्या सुरुवातीला रवि आठवा शनि सातवा व गुरु तिसरा आहे. त्यामुळे मानसिक त्रास, जोडीदाराशी मतभेद, व्यवसाय असेल तर भागीदार अधिक फायद्यात इत्यादी गोष्टी संभवतात. तरी मानसिक संतुलन आवश्यक. मंगळ कन्या राशीत थोड्याफार फरकाने तीच फळे संभवतात. बुधअष्टमात असल्याने प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. लग्नीकेतू देखील हेच सांगतो. शिवाय मंगळामुळे उष्णतेचे आजार पण दर्शवतात.१६ तारखेनंतर मात्र परिस्थितीत बराच फरक पडेल. अनेकांना आर्थिक लाभ, प्रमोशन्स, देवस्थानाला भेटी इत्यादी गोष्टी घडतील. मंगळ कन्या राशीतून बऱ्यापैकी आर्थिक लाभास कारणीभूत होईल. शुक्रामुळे नोकरीत असणाऱ्यांना थोडाफार त्रास संभवतो. २१ ते २४ या दरम्यान प्रेमीजनांना आपल्या भावना बोलून दाखवाव्याशा वाटतील पण सावधान. सध्या मौन आवश्यक आहे. तारीख २५ ला चंद्र-मंगळ युती. अनेकांना आर्थिक लाभ वा प्रवास संभवतात.

वृषभ :-या महिन्याच्या सुरवातीला रवि सप्तमात, शनि-राहू षष्ठात तर राशीस्वामी शुक्र अष्टमात. ग्रहांची ही परिस्थिती जोडीदाराशी तीव्र मतभेददाखवते. जमेची बाजू म्हणजे शनि, राहू आर्थिक लाभ नक्की देणार. ज्या तरुण मुलामुलींचे प्रेमसंबंध आहेत, त्यांचे विवाह जुळण्याचे योग आहेत.बुधसप्तमात आणि मंगळ-बुध लाभ योग पण वरील विधानाला पुष्टी देत आहे. अष्टमातील शुक्र बऱ्याच मंडळींना आर्थिक लाभाचे प्रसंग आणून देईल. षष्ठातील शनि काही लोकांना आर्थिक लाभ प्राप्त करूनदेईल. जोडीदाराच्या स्वास्थ्य विषयक तक्रारी असतील तर लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे. द्वादश स्थानातील केतूमुळे मात्र काही व्यक्तींना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबर नंतर रवि अष्टमातआणि केतू द्वादश स्थानी असेल. वाहन चालकांनी आपली वाहने फार जपून चालवणे आवश्यक आहे. मैदानी खेळातील खेळाडूंना १५ डिसेंबर नंतरचा काळ चांगला आहे.विवाहेच्छू मंडळींचे विवाह ठरण्याची शक्यता खूप जास्त आहे. पालकांनी मनावर घेणे आवश्यक आहे. (खायचा‘पालक’ नाही...parents) नवम भावातील शुक्र प्रवासात अडथळे आणण्याची शक्यता आहे. हा महिना आर्थिक दृष्ट्या उत्तम आहेच.

मिथुन :-गुरूचा मुक्काम सध्या मिथुन राशीतच आहे व तो उत्तम स्थितीत आहे.सप्तमात रवि, षष्ठातबुध,पंचमातशनि, राहूआणिचतुर्थात मंगळ असल्याने आरोग्यासंबंधी काळजी करण्याचे कारण नाही.काही मंडळींना घराच्या विक्रीसंबंधी बोलणी होत असल्यास त्यात फायदा होईल.काही लोकांना नवीन घरात जाण्याचा ही योग येईल.अष्टमातीलशुक्र आणि सप्तमातीलरवि ह्यामुळे जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. १६ डिसेंबर नंतर रवि धनु राशीत गेल्यावर जोडीदाराशी संबंध सुधारतील व उत्तम समन्वय साधला जाईल.शुक्र आणि चंद्र ह्यांची स्थिती वाहनाच्या दृष्टीने तेवढी चांगली नाही. त्यामुळे वाहनचालकांनी वाहन काळजीपूर्वक चालवावे.१५ व १६ डिसेंबर ह्या दोन दिवसांत वाहनाच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यावी.

कर्क:-ह्या महिन्यात रवि, बुध पंचमात आहेत.काही मंडळींना शेअर घेण्याची इच्छा होईल. पण सावधान!! तोटा होण्याची शक्यता आहे.चार ग्रह, चंद्र, बुध, शनि आणि राहू, ह्यांमुळेघरगुतीबाबतीत बराच खर्च अपेक्षित आहे.काहींनादुरुस्तीवर बराच खर्च होईल. पैशाची तजवीज आत्तापासूनच करून ठेवावी.षष्ठातील शुक्र तब्येत मात्र ठणठणीत ठेवेल असे दिसते. दशमातील केतू काही मंडळींना छोट्या-मोठ्या प्रवासाचा योग दाखवतो.१६ तारखेनंतर रविची स्थिती भक्कम होत आहे. काहींना शेअर अगर लॉटरीमध्ये बराच फायदा होण्याची शक्यता आहे. लाभातील चंद्र देखील आर्थिकदृष्ट्या स्थिती चांगली दाखवत आहे. तृतीयेतील मंगळ लेखकांना उत्तम आहे, तसेच होतकरू मंडळी, जी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू पण चांगला होईल असे दिसते. ज्यांचेइंटरव्ह्यू किंवा करार-मदार आहेत, त्यांना १५ व १६ डिसेंबर ह्या तारखा उत्तम आहेत.एकंदरीत, महिन्याचा उत्तरार्ध उत्तम आहे!

सिंह :-सिंह राशीचा राशीस्वामी रवि, घर बदलण्याचे योग दाखवत आहे. पण काहीतरी अडचण ही दाखवत आहे. तृतीय स्थानातील तीनग्रह तुम्हाला प्रवास नक्की दाखवत आहेत. काहींना ऑफिसच्या कामासंबंधी पण प्रवास करावा लागेल. पंचमातील शुक्र काहींना बदलीचे योग अगर नोकरीतील बदलाचे योग दाखवतो.लाभातील गुरु काही लोकांना घरासंबंधाने अनेक फायदे मिळवून देईल असे दिसत आहे. द्वितीयेतील मंगळ अनेकांना प्रमोशन आणि त्याबरोबरच आर्थिक फायदे मिळवून देईल असे दिसते.षष्ठातील शुक्र मात्र काही प्रसंगी नुकसान दाखवत आहे, तेंव्हा व्यवहार सावधानतेने करावेत. शुक्र प्रकृती ठणठणीतठेवेल असे दिसते.नवमातीलकेतू अनेकांना दूरचे प्रवास पण दाखवत आहे. ज्यांना अध्यात्माची आवड आहे, असे लोक धार्मिक स्थळांना भेटी देण्याची पण शक्यता आहे. त्यातून त्यांना बरीचमन:शांती मिळेल. एकंदरीत महिना चांगला जाईल असे दिसते!

कन्या:-महिन्याच्या सुरुवातीला मंगळ कन्या राशीत आहे, रवि, बुधतृतीयात आणि गुरु दशमात आहे.द्वितीयभावात शनि, राहू असल्याने एका बाजूने तुम्हाला काही लाभ होण्याची शक्यता आहे, पण तोच पैसा दुसऱ्या मार्गाने बाहेर जाण्याची पण तेवढीच शक्यता आहे. त्यामुळे व्यवहार जपून करावेत. काही लोकांना बदलीचे पण योग आहेत. महिन्याच्या उत्तरार्धात एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा प्रसंग येण्याची शक्यता आहे. लेखक मंडळींच्या लेखनाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळेल. पैशाची आवक मात्र थोड्याफार फरकाने होतच राहील.संपूर्ण महिनाभर अष्टमेश मंगळ लग्नी असल्याने काहीतरी चिंता किंवा उष्णतेचे विकार होण्याची संभावना आहे.

तूळ :-तुळेचा राशीस्वामी शुक्र तृतीय स्थानी असल्याने प्रवासी कंपन्या आणि लेखक ह्यांना हा काळ बऱ्यापैकी चांगला आहे.तुमच्याच राशीला शनि, राहू असल्याने प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. मंगळ बाराव्या स्थानी जोडीदाराशी मतभेद दाखवतो.गुरुनवमात आणि बुध, रवि द्वितीय स्थानी आहेत.नवम हे भाग्यकारक स्थान असल्याने काही लोकांच्या बाबतीत कुटुंबासंबंधीभाग्यकारक घटना घडण्याची शक्यता आहे.सप्तमातीलकेतू घरामध्ये मतभेद दाखवीत आहे.

वृश्चिक:-१ डिसेंबर १३ ला रवि व बुध हे दोन ग्रह आपल्या राशीत आहेत. शारीरिक त्रास होईल असे वाटते. काही दिवस बाहेरील खाणे टाळलेले बरे. द्वितीय भावातील शुक्र आर्थिक लाभ मिळवून देईल पण ते पैसे कुठेतरी गुंतवणूक होऊन अडकण्याची शक्यता आहे. तृतीय भावाचा स्वामी शनि प्रवासात अडचणी दाखवत आहे. षष्ठातीलकेतूनोकरीकरणाऱ्यांना उत्तम आहे ऑफिसमधे त्यांच्या पदाला बाधा येणार नाही.अष्टमातील गुरु शरीर अस्वास्थ्यामुळे मानसिक ताण दाखवत आहे. इतर ठिकाणी रमलेले उत्तम. १५ डिसेंबर १३ नंतर प्रकृती उत्तम. अनपेक्षित लाभ पण आहे. द्वितीयातील रवि कर्जमिळवून देण्यास उत्तम आहे. तृतीयातील शुक्र प्रवासात अडचणी. जोडीदाराशी संमिश्र संबंध राहतील. सर्वसाधारण महिना संमिश्र स्वरूप दाखवत आहे.

धनु:-डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला शुक्र आपल्या राशीत २७ अंशावर आहे त्यामुळे तो काही लोकांच्या पत्रिकेत भावचलीतात द्वितीयात जाऊ शकेल. काही मंडळींना शारीरिक त्रास तर काहींना अचानक लाभाचे प्रसंग येतील. काही लोकांना अडकलेले पैसे पण परत मिळतील. शनि आणि राहू महिनाभर लाभत असल्याने आनंद साजरा करण्याचे प्रसंग येतील. पंचमातील केतू मुलांच्या दृष्टीने पण छान आहे. गुरु मात्र जोडीदाराशी थोडेफार मतभेद दाखवत आहे. मंगळ नोकरीच्या दृष्टीने तणाव पूर्वक राहील.

मकर:- या महिन्यात केतू चतुर्थ स्थानी आहे. केतू मोक्षकारक ग्रह आहे. व्यावहारिक आणि अध्यात्मिक दोन्ही प्रकारच्या लोकांना केतू लाभदायक आहे. जमीन अगर घरापासून लाभ, जमिनी संबंधीचे सौदे इत्यादी मनासारखे होतील. चतुर्थ स्थान मोक्ष त्रिकोणा पैकी एक असल्याने अध्यात्माची आवड असण्यारांना मन:शांती मिळेल. एक पाउल पुढे गेल्यासारखे वाटेल. आर्थिक लाभाचे प्रसंग देखील या महिन्यात येतील. १५ तारखेनंतर काही शारीरिक तक्रारी उद्भवतील. शनि, राहू नोकरीमधील दर्जा उंचावत ठेवतील. भाग्यातील मंगळ मुलांना उत्तम आहे. एकंदरीत डिसेंबर मकरेला उत्तम आहे.

कुंभ:-महिन्याच्या सुरुवातीला केतू तृतीय स्थानी आहे. नोकरीमध्येअसणाऱ्या लोकांना उत्तमयोग आहे.कामानिमित्त थोडेफार प्रवास देखील शक्य आहेत.काही लोकांना कामामध्ये तणाव जाणवून थोडा त्रास होण्याचीही शक्यता दिसते, पण त्यांच्या एकंदरीत उत्कर्षामध्ये बाधा येणार नाही.विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी हा काळ उत्तम आहे. १६ तारखेनंतर काहींना लाभाचा योग आहे. ज्यांचास्वतःचाबिझिनेस आहेत्यांना चांगल्या ऑर्डर्स मिळतील असे दिसते.इतर दृष्टीने हा महिना चांगला आहे.

मीन:-मीन राशीला गुरु चतुर्थात असल्याने घरातील घडामोडींमध्ये जास्त रस राहील. बाहेर जाण्यापेक्षा तुम्ही घरात राहणे पसंत कराल. पणघरात राहिल्यामुळे जोडीदाराशी थोडेफार खटके उडण्याचा संभव आहे. शनि, राहूअष्टमात असल्याने ज्यांना जुनाट आजार आहे, अश्या लोकांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे.दशमातील शुक्र नोकरी करणाऱ्यांना फारसा उपयोगी नाही.१६ डिसेंबर नंतर शुक्र लाभात येऊनपरिस्थिती एकदम बदलेल.दशम, सप्तम आणि द्वितीय ह्या भावांच्या संबंधामुळे ज्या बायका नोकरी करतात त्यांना पण तेवढेच लाभदायी आहे. ज्यांना जुनाट आजार आहेत असे लोक सोडता इतरांना प्रकृतीदृष्ट्या हा महिना ठीक आहे.

२०१४नूतन वर्ष सर्वांना सुख-समाधानाचे, भरभराटीचे आणि आरोग्यपूर्ण जावो!!!
(हा लेख आवडल्यास जानेवारी २०१४ मधे भेटूच!! )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मासिक भविष्य चुकून गुलमोहोर कवितामधे टाकले होते, ते पुन्हा भविष्य या सदरात टाकत आहे. गैरसोय बद्दल शमस्व.

चंद्र रास कोणती आहे हे कसे ओळखावे ..

रच्याकने प्रतेक भविष्याच्या बाफवर खरे-खोटे वाले येउन का पो टाकतात ?
विश्वास नाही तर ठेवा की तुमच्यापाशी फुकटातले प्रबोधन दुसर्‍याच्या बाफ वर का ?

आपले भविष्य काहींच्या काही बाबत नक्की खरे ठरे ठरणार. १२० कोटींच्या देशात सरासरी १० कोटी लोक एका राशीचे असतात. मग कुणाच्या ना कुणाच्या बाबत काही ना काही तरी खरे ठरणारच ना! असो. साप्ताहिक मासिक भविश्य पाहिले की काहींच्या मनाला बरे वाटते

शाहिर | 2 December, 2013 - 13:41 नवीन

म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं काळ सोकावतो त्याच वाइट वाटत.

सुम,
चान्गल भविष्य असेल तर ठेवावा नाहीतर नाही..>>
अगदी. ज्यांचा भविष्यावर विश्वास नसतो, तेही दररोजच्या अंकातले आणि रविवारच्या पुरवणीतले राशीभविष्य हमखास वाचतात.

प्रकाश घाटपांडे,
साप्ताहिक मासिक भविश्य पाहिले की काहींच्या मनाला बरे वाटते>>
एकदा मी एका मासिकात थेट शेवटचं पान उघडून संपलेल्या महिन्याचं भविष्य वाचलं होतं. त्यातील बहुतांश बाबी खऱ्या असल्याचे लक्षात आले. नंतर मुखपृष्ठ पाहिले तेव्हा कळले की तो अंक तीन वर्षांपूर्वीचा होता. त्यानंतर सगळ्या राशी वाचल्या, तर सर्व राशीतलं भविष्य थोड्याफार फरकाने सारखंच होतं. म्हणजे प्रत्यक व्यक्तीला जुळणारे होते.

२१ ते २४ या दरम्यान प्रेमीजनांना आपल्या भावना बोलून दाखवाव्याशा वाटतील पण सावधान. सध्या मौन आवश्यक आहे. तारीख २५ ला चंद्र-मंगळ युती. <<<< Lol

चांगला उपक्रम .
ज्योतिषावर टीकाकारांसाठी हा धागा नाही .
सिंह राशीत शुक्र पंचम आणि षष्ठात दोनवेळा चुकून आला आहे .

चांगला उपक्रम आहे .या योगे गोचर फळे बघण्यास मदतच होईल .
ज्या लोंकाना त्यांची लग्नरास माहित आहे त्यांनी त्याप्रमाणे वाचले तरी चालेल असे वाटते .

अन्विता:

लग्न राशी साठी वेगळे लिहावे लागेल. हे नाही चालणार . कारण समजा लग्न मीन आहे ,आणि रास मेष आहे तर फरक पडू शकेल..........

अन्विता:

ज्यांना लोकांना त्यांची लग्न रास माहित आहे. त्यांनी चंद्र रास बरोबर लग्न राशीचे पण भविष्य वाचावे. म्हणजे दोघांचा समन्वय साधता यईल.

पारिजाता, चंद्र रास म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेस चंद्र ज्या राशीत असतो ती रास. जन्म तारखेवरून जी असते ती रवीची रास म्हणजे sunsign .

Jyana jyotish suruvatipasun shikayche ahe, tyana konti site aapan sangal?
Ek chhand , aawad mhanun shikayche ahe

#पावभाजी ,
साईट माहित नाही परंतु पुस्तके सुचवतो .

दिक्षित ,राजे (व्यवसाय मार्गदर्शन ?),
देशिंगकर ,
ह ना काटवे (ग्रह विचार),
Alen Leo (How To Judge A Nativity)
यांची पुस्तके (मिळाल्यास !) वाचा .उपयोगी आहेत .

कुंडलीची भाषा भाग १,२,आणि ३ (लेखक ?)वाचा .महत्वाचे .

फारच आवड असल्यास लोकमान्य टिळकांचे ORION .
व दा भट यांचे 'वृश्चिक लग्न '

पावभाजी ,
माझ्या ब्लोग वर सध्या मी नवीन अभ्यासकान करता लेख लिहिण्याचा प्रयत्न करते आहे . तसेच पुस्तकांची यादी पण दिली आहे.
anaghabhade.blogspot.com
I hope this helps!

पशुपती

सरळ सध्या शब्दातले मासिक राशी भविष्य आवडले . नववर्षाच्या भविष्याची वाट पहात आहे.

Srd कुछ्तो लोग कहेंगे, आपण आपले काम चालू ठेवायचे. ज्यांना वाचायचे नाही त्यांना सक्ती थोडीच आहे.