आणि कळीचे फूल झाले!........

Submitted by sariva on 30 November, 2013 - 10:03

स्पायडर लिली बहरली होती . उमलू पाहणाऱ्या तिच्या एका कळीने माझे लक्ष वेधून घेतले.कुठल्याही क्षणी ती कळी उमलेल असे वाटत होते.नमस्कारासाठी हात जोडले असावेत असा भास होत होता तिला पाहून!म्हणून मी तिचा फोटो काढू लागले, त्या क्षणी अचानक एक हलकीशी झुळूक आली आणि त्या फुंकरीने काही पाकळ्या अलगद उमलल्या आणि कळीचे फूल होत असतानाच्या क्षणाची मी साक्षीदार झाले.निसर्गाचे हे गुपित असे अलगद सामोरे आले,याचा विलक्षण आनंद झाला. त्याचीच ही क्षणचित्रे!

1.कळ्यांचा गुच्छ

2.उमलती कळी

3. कळीचे वंदन

4.उमलू का आता?

5.अर्धोन्मीलित कळी

6.आता पूर्ण उमलले!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख अश्या अवचित लाभलेल्या क्षणाने किती आनंद दिला असेल नाही! आणि कॅमेर्‍यात ही आठवण साठवता आली हेही भाग्यच. खूप सुंदर. Happy

वा, फारच सुंदर फोटो टिपलेत .....

पण हा सोनटक्का नाहीये, स्पायडर लिली आहे - Spider lily, Beach spider lily
Botanical name: Hymenocallis littoralis

फारच सुरेख. तिसर्‍या/चौथ्या फोटोत आहे त्या स्टेजला वरून बोटानं किंचित दाब दिला असताही उमलेल बहुधा.

पण हा सोनटक्का नाहीये, >>> +१.

पुढच्या माहितीबद्दल शशांक पुरंदरे यांचे आभार. Happy

जाई.अमेय,श्री,शशांकजी आणि मामी तुमच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
शशांकजी.चुकीची दुरुस्ती लगेच केली आहे.तुमच्यामुळे माझा गैरसमज दूर झाला.अन्यथा मी त्याला नेहमी सोनटक्काच समजले असते!म्हणूनच तुमच्या मार्गदर्शनाबद्दल विशेष आभार.

सुरेख आलेत फोटो लिलीचे! Happy

तुमच्या शिर्षकावरुन मला एक कवितेचे शिर्षक सुचले...

"आणि कळीचे फूल जाहले" Happy Happy

के अंजली, तुमच्या प्रेरणेने:

....आणि कळीचे फूल जाहले,
अगा नवलची घडले
क्षणांस त्या मी सांभाळिले!

शशांकजी,जागूने टाकलेला सोनटक्क्याच्या फुलांचा फोटो पाहिला व नेटवरून दोन्ही फुलांची माहितीही वाचली.

के अंजली व साधना आभार.