मैत्री......एक आगळंवेगळ नातं

Submitted by अनिल तापकीर on 29 November, 2013 - 01:11

(सदरचा लेख याला कविता म्हणावी की निबंध काही समजत नव्हते माझी मुलगी आरती दहावित शिकते तिने स्वता तयार करुन वाचयला दिला नि थक्क झालो. तिचे हे पहिलेच लेखन वाचुन खुप आनंद झाला. पहा आपल्याला कशी वाटते.)

कु. आरती आनिल तापकीर ,
भारती विध्यापीठ कन्या प्रशाला ,
कोथरूड ,पुणे
गाव- मुलखेड .

तु मैत्रीण नाहीस ,
मैत्रीतला पहिला शब्दच तु आहेस .
तु एक दिवस जरी शाळेला आली नाहीस कि असं की काही तरी घरीच विसरले .
तुझ्यासारखी मैत्रीण मिळण्यासाठी नशीबच लागते .
मैत्री करण्यासाठी प्रेम लागतं .
तू माझं जीवनच बदलून टाकलं आहेस .
मनातलं स्वप्न साकार करण्याची जिद्द दिली आहेस.
तु मला जीवन म्हणजे काय हे सांगितलंस,जीवन या शब्दाचा अर्थ काय आहे हे तूच सांगितलस.
मैत्री म्हणजे काय असतं हे तूच शिकवलंस वेळोवेळी तूच मला जागं केलंस .
वाईट मार्गाला जात असताना,
कानाखाली वाजवून तूच मला मागे ओढलंस.
मैत्री म्हणजे नुसतं प्रेम आणि गोडवा नसून त्या मैत्रीत कधीतरी कडूपणाही असावा लागतो.
कारण त्याशिवाय मैत्रीला खरा अर्थ उरत नाही.
तु मला जसं हसायला शिकवलंस ,
त्याच प्रमाणे कोणासाठी तरी रडायलाही शिकवलंस.
तु मला सोडून जाणार या विचारानेच हातपाय थरथरतात.
माहीत आहे… का?
आमच्यात तरी यालाच मैत्री म्हणतात .
मैत्रीत जर प्रेम असेल तर रक्ताच्या नात्यात अधिक एक होतं,
पण त्याच नात्यामध्ये जास्त कडवटपणा असेल तर,
त्याच रक्ताच्या नात्यामधून एक वजा होतं.
मैत्री म्हणजे एक दोर असते.
ती घट्ट बांधायची असते.
जसे इज्जत कमाविण्यासाठी खूप वेळ लागतो.
पण ती घालवायला एक क्षण पुरेसा असतो.
जिला खरोखर एखादी जिवाभावाची मैत्रीण असेल ,
तिला प्रत्येक क्षणाला भीती वाटत असते कि ,
आपल्या मैत्रीत एखादे वादळ तर येणार नाही ना ?
या विचाराने देखील जीव घुसमटतो.
या जगात कितीही श्रीमंत व्यक्ती असली नि तिला मित्र मैत्रीण नसेल.
तर ती व्यक्ती सर्वात गरीबच आहे .
कारण मैत्री हि पैश्यात कधीच मोजली जात नाही.
खरंच ……
तु भेटलीस,
मैत्रीचा अर्थ कळला,
कारण आजवर तुझ्यासारखी जीव लावणारी मैत्रीण कुठे मिळालीच नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users