सर्कस

Submitted by सखा on 28 November, 2013 - 12:52

वेशीवर तसाच रुसतो मी
वळून पापण्या पुसतो मी

सापशिडी खेळ जगण्याचा
गारुडी बनूनी हसतो मी

मी न दिली तुला फोल वचने
कळेना का खोल फसतो मी?

सलती काटे दिवसभराचे
रात्र सारी लिहित बसतो मी

सर्कस हा खेळ जगण्याचा
असा मजेत बघत असतो मी

लुभावतात मज सूर दैवी
मेहफिलीत तशा दिसतो मी

-सत्यजित खारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>वृत्त जुळवितानाही जी सर्कस होते तो भाग निराळा...
अ. अ. जोशी काका, तुमच्या प्रामाणिक पण बद्दल कौतुक. पण मला खात्री आहे तुम्ही रोज सराव करा तुम्हाला नक्कीच जमेल.

मझ्या नजरेतून पाहता काही जाणवण्याइतपत तृटी आहेत इतकेच बोलतो आणि थांबतो
अवांतर :
आपण वाईट्त लिहित नाहीच पण अजून छान ...अजून छान गझल करण्याकडे कल ठेवा ओढ ठेवा आपोआप अजून छान गझल करण्यासंबंधीचे आकळत जाईल एक दिवस उत्तम गझल कराल ..मग एक दिवस सर्वोत्तमही .....
शुभेच्छा

अ. अ. जोशी काका, तुमच्या प्रामाणिक पण बद्दल कौतुक. पण मला खात्री आहे तुम्ही रोज सराव करा तुम्हाला नक्कीच जमेल.<<< Lol