आरुषी हत्याकांड : - हे असेही असू शकेल…

Submitted by मी मी on 28 November, 2013 - 05:00

आरुषी च्या केस मधून जे काही बाहेर पडतंय किंवा जगाला कळतंय ते तसेच व्हावे हीच तिच्या आई वडिलांची इच्छा होती… खरतर या सर्वांमागे खूप काहीतरी दडलंय जे बाहेर येऊ दिले जात नाहीये.

तलवार फार पोचलेला माणूस होता त्याला काहीही करता आले असते, हेमराज ला नेहेमीसाठी भारतातून हाकलवून लावता आले असते जर हे प्रेम प्रकरण असतं. पण फक्त प्रेम प्रकरण संपवण हे कारण यात नाही… यात मोठ मोठी लोक इनवोल्व आहेत आणि त्यांच्या प्रेशर खालीच हे प्रकरण गुपित ठेवायच्या हेतूने आरुषीचा जीव गेला असावा असा माझा अंदाज आहे.

तुमच्यापैकी कुणाला आठवतं का माहिती नाही पण हे हत्याकांड घडले त्या काळात काही गोष्टी पुढ्यात येत होत्या ज्या नंतर सोयीस्कर पणे दडवल्या गेल्या . जसे… ज्या रात्री आरुषी मारली गेली त्या रात्री तलवार दाम्पत्यांनी कुठल्याश्या थ्री स्टार हॉटेल मध्ये अनेक खोल्या बुक केल्या होत्या म्हणे ....

कुणासाठी, कशासाठी हे अजून गुपितच आहे.

तसेच आरुषी चा मृत्यू होण्यापूर्वी चार दिवस आरुषी च्या मोबाइल वरून दिल्ली च्या कमिशनर ला फोन गेला होता आणि त्यानंतर त्याच रात्री कृष्णा(त्यांच्या क्लिनिक मधला कम्पौनडर) च्या मोबाइल वरून त्याच नंबर वर फोन केला गेला … हि बातमी दोन दिवस दाखवली गेली होती आणि नंतर ती पूर्ण पणे झाकली गेली…. प्रश्न असा आहे कि आरुषी जवळ काहीतरी गुपित तर नव्हतं जे ओपन होणे परवडण्यासारखे नव्हते.

तेरा वर्षाच्या मुलीचे पन्नास वर्षाच्या माणसाशी संबंध जुळवून बघण्यापेक्षा दुसर्या बाजूने विचार केल्यास मनात असा प्रश्न येतो कि … हेमराज आरुषी सोबत काहीतरी चुकीच करत असतांना मारला गेला कि आरुषीला कोणी मारलंय हे त्याने डोळ्याने बघितले होते आणि म्हणून मुख्य विटनेसच संपवायचा हेतू होता …… हे आता कुणी सांगावे ??

का कुणास ठावूक पण आरुषी चुकीच काही करत होती अस वाटत नाही मनाला …. बिच्चारी जीवानेही गेली आणि काहीतरी मोठ्ठ गुपित लपवायला तिच्या चारित्र्यावरहि बोट उचलले जात आहे अस वाटतं…. हेमराज आरुषीला वाचवतांना मारला गेला किंवा आरुषी हेमराज ला वाचवण्याच्या प्रयत्नात मारली गेली अस होऊ शकतं दोघे जन मारले गेले म्हणजे त्यांचे काहीतरी अनैतिक संबंध असतील हा एकाच अर्थ निघू शकत नाही ….

यातून आणखी एक अर्थ असा निघतो कि जर असेल तर ते इतके भयंकर गुपित असेल कि जे लपवण्यासाठी तलवार दाम्पत्यांना पोटच्या पोरीच्या न आब्रू शी घेणे देणे आहे न जीवाशी ….यात इतर यंत्रणा सुद्धा कार्यरत असतील कदाचित काहीही झाले तरी गुपित बाहेर येऊ नये हा एवढाच एक मुद्दा महत्वाचा वाटतोय सर्वांना…हे असेही असू शकेल…नाही का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज आलेले शिना बोरा प्रकरण पाहून आठवले हे >>> ह्म्म्म्म . मी ही आज तेच वाचत होते .
एक्दम फिल्मी आहे हां सगळं .
मुलीला इतके दिवस बहिण म्हणून ओळख करून देत होती.
ती मुलगी सावत्र भावाच्या प्रेमात पडली .

चित्रपट निर्मात्याना नविन खाद्य आहे .

चित्रपट निर्मात्याना नविन खाद्य आहे .>>>>>अगदी. आणि तिला मारल्यानंतर तिच्या नावाने फोन करायची म्हणे नातेवाईकांना. हेही ऐकावे ते नवलच ना

पण मला फील काय झालंय ना तीन लग्न करून करोडो रुपयांची मालकीण प्रतिष्ठीत स्वतःच एवढं आयुष्य जगुनही इतकी काय जगण्याची असोशी कि आता आता जगायला सुरु केलेल्या मुलीला मारून टाकले. दुसरा उपाय नसतो का काहीच ह्यांच्याकडे ?

आजवर केवळ पुस्तकात वाचलेली अजब प्रकरणे ह्या शीना बोरा केसमधुन ख-यात उतरलेली दिसताहेत. Sad

स्वतःच्या मुलाला आणि मुलीला स्वतःचे भाऊ-बहिण म्हणुन ओळख करुन दिली त्यावर त्यांनीही कधी आक्षेप घेतला नाही. सगळे इतकी वर्षे सुरळीत चालु होते.

ह्या केसमधले सगळेच अजब आहे.

अजूनही आतले काळे-बेरे पूर्णपणे बाहेर यायचे आहे. तिचा भाऊ बोललाय असं, त्याला कारण माहितीये बहिणीला का मारलंय आईने नाही सांगितले तर मी सांगेन अस तो म्हणतोय

" तलवार" सिनेमाचे कलाकार भारी आहेत सगळे. तब्बू, कंगना, इरफान. >>>

नाही , इरफान आणि कोन्कना आणि तो मद्रास कॅफे मधला बाला सर पण दिसला .

( कंगन आणि काकणं तस सारखच म्हणा Wink )

हम्मम...मला कंगना असल्याचे कळाले होते..असो

बाकी हे शिना प्रकरण लई गूंतल हाइ ...नाई ? नवे नवे खूलासे अन काय काय

Pages