नवे लिखाण करणा-या स्त्री आयड्यांची गळचेपी

Submitted by जुनाच कुणीतरी on 27 November, 2013 - 14:34

मायबोलीवर ब-याच स्त्रिया हिरीरीने लिखाण करत असल्या तरी एकूणात प्रमाण कमी आहे असं दिसतं. त्या मानाने पुरूष सदस्यांचं लिखाण लक्षणीय आहे. काही लेखकांना लक्षणीय फॅन फॉलोइंग आहे. त्या मानाने स्त्री लेखकांचे विषय ठराविक असतात. पण ते कामाचे असतात असं वाटतं.

एक गोष्ट निरीक्षणातून नोंदवाविशी वाटत ती अशी कि पुरूष आयड्यांच्या लिखाणाला स्त्री आयड्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो.पण स्त्री आयड्यांच्या लिखाणाबद्दल हेच पुरूष आयडी उदासीन असतात. काही काही पुरूष लेखक तर आत्ममग्न असल्याचं जाणवतं. ते कधीच कुणाला प्रतिसाद देत नाहीत. दिला तर त्यांच्या सर्कलमधेच. पण तेच लेखक स्वतःच्या लिखाणाला सर्वांनी दाद द्यावी अशी अपेक्षा करताना दिसतात. इथंही बहुतेक स्त्री आयड्या समंजस भूमिकेत दिसतात. काही स्त्री आयड्यांचंही सर्कल असल्याचं जाणवतं. त्यांनाही वर सांगितलेल्या पुरूष आयड्यांप्रमाणेच स्वमग्नतेचा छंद आहे असं वाटतं. पण असे आयडी मूठभर असावेत.

हे निरीक्षण बरोबर असेल तर यात बदल व्हावा असं वाटत का ?
कि निरीक्षण बरोबर असूनही दखल घेण्याजोगं नाही असं वाटतं ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे काय मज्जा नाई इथे अर्धवटराव. एवढा अ‍ॅनोनिमस आय्डी असून असं "काही स्त्री आयड्या" वगैरे असलं मिळमिळीत का लिहिलंय ! जरा धुळवड करा की . मग येतील लोक रंग उधळायला ! Happy

इथंही बहुतेक स्त्री आयड्या समंजस भूमिकेत दिसतात. >>> हे तुम्ही नक्की कुठल्या मायबोलीविषयी बोलताय ? ( घ्या टाकली काडी Proud )

इथे गेल्या १० वर्षात अनेक विषयांवर स्त्री व पुरुष दोघांनीहि आपआपली मते मांडली, दणदणित चर्चा झाली. पण पुरुष वि. स्त्री लेखक असा भेदभाव जाणवला नाही.

मैत्रेयी, हे लेखक जरा नवीन आहेत, त्यांना अजून एक वर्ष पण झाले नाही मायबोलीवर. त्यांना आपल्या वेळची मायबोली माहित नाही.
बिचार्‍यांनी कळकळीने लिहीले आहे. करू दे की "गंभीर व विचारप्रवर्तक" चर्चा.

अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंति आहे.

बाकी इथे धुळवड वर्षभरच चालू असते, मुद्दाम प्रयत्न करायला नको, हे तुमच्या सारख्या अत्यंत अनुभवी व जाणकार लेखिकेस माहित असेलच. त्यातून आपण काय धुळवड केली असेल इतकी मोठ्या प्रमाणात आजकाल इथे धुळवड होते. काही लोक आजकाल तर प्रोफेशनल धुळवडकर आहेत. कुठेहि जाऊन बघता बघता चिखलफेक, करतात.

त्यांना स्वानुभव घेऊ द्या.
Light 1

हे निरीक्षण बरोबर असेल तर यात बदल व्हावा असं वाटत का ?
कि निरीक्षण बरोबर असूनही दखल घेण्याजोगं नाही असं वाटतं ?>>>

दोनच पर्याय?

निरिक्षण चुकलं.

कित्ती दिवसांनी माबोवर मोठ्या 'रोचक ' चर्चाविषयाचा जन्म झाला आहे.
(रोचक शब्द ऐअ वरून साभार)
अर्धवटराव, मुळात स्त्री असणे आणि स्त्री आयडी असणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी असल्याने आपल्या स्त्री आयडीला प्रतिसाद मिळतायत की नाही याबद्दल कुणाला फार देणं घेणं नाही. Wink
त्यात तुम्ही म्हणताय खास नव्या स्त्री आयडींबद्दल. तर अश्या आयडींचे जुने स्त्री/ पुरुष आयडि असू शकतात त्यामुळे नव्या स्त्री आयडींनाही काही प्रतिसादांचे पडलेले नाही. Happy

स्त्री का पुरुष माहिती नाही पण एकंदरीत इथे नव्या लोकांकडे फारसं लक्षच देत नाही लोकं. त्याचं लिखाण वाचतही नाहीत त्यांना चर्चा इत्यादीत शामिल करून घेणे तर दूरच. एकंदरीत जुने असतील तेच पारंगत आणि चांगले कलाकार आहेत असा इथला समज असावा (काहींचा .. सगळ्यांचा नाही)

प्राप्ती, तुम्हाला असा अनुभव आला आहे का? नविन सभासद झाल्यावर तुम्ही किती लिखाण वाचून त्यावर प्रतिसाद दिलेत?

मायबोलीवर चांगल्या लिखाणाला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो मग ते जुने असोत की नवे. तुम्ही लिहिलेले विषय जर आधी बरेचदा चर्चा होऊन गेले असतील तर प्रतिसाद कमी मिळतो.

सहज म्हणून आपल्या दोघींची प्रोफाईल्स पाहिली. आपल्या दोघींनाही बरोबर ३ वर्षं १९ आठवडे झाले आहेत. तुमचा सदस्य क्रमांक ३००१० आहे आणि माझा ३००१३ आहे.

(काहीही कारण असो) पण माझ्या पाऊलखुणांत १४२ पानं आहेत. तर तुमच्या पाऊलखुणांत २ पानं दिसत आहेत. यावरून तुम्ही मायबोलीवर अत्यंत कमी प्रतिसाद दिला आहात हे लक्षात येतं.

(पुन्हा काहीही कारण असो) पण माझ्या मायबोलीवरच्या लिखाणाची यादी दोन पानी आहे तर तुम्ही आतापर्यंत मोजून ५ लेख लिहिले आहेत.

इतरांना दोष देण्याआधी जरा स्वतः प्रयत्न करायला हवा. आपण नविन आल्यावर आपणहून मैत्रीचा प्रयत्न न करता बाकीचे धावत येतील अशी अपेक्षा अवाजवी नाही का? मायबोलीवर रोज ढिगानं लेख येतात त्यात काही तरतात काही बुडतात. सातत्यानं लिहा, गप्पा मारा, चर्चेत भाग घ्या. लवकरच तुम्हालाही अनेक प्रतिसाद मिळतील.

मैत्रेयी, हे लेखक जरा नवीन आहेत>> लेखक नव्हे हो, आयडी नवीन आहेत Wink
बाकी, यांच्या ज्ञानसूर्याचे किरण जिकडे तिकडे पडलेले दिसले नाहीत का तुम्हाला? Proud

बिच्चारे
१स्त्रीफैन फालोइंग नसलेले पुरुष आइडि
२ प्रतिसादापासून वंचित सर्व आइडि .
ग्यानबाचि मेख ओळखा पाहू कुठे आहे ते .

हे निरीक्षण बरोबर असेल तर यात बदल व्हावा असं वाटत का ?
कि निरीक्षण बरोबर असूनही दखल घेण्याजोगं नाही असं वाटतं ? >>

काही शंका -
काही काही सदस्यांच्या लिखाणाला खूप कमी प्रतिसाद असतात किंवा कधी कधी काहीच नसतात.पण लोक वाचून प्रतिसाद देत नसावेत की वाचतच नसावेत?
लिखाण वाचून लोक प्रतिसाद देतात की अमुक एक स्त्री आय डी आहे तर अमुक एक पुरुष आय डी आहे ते बघून देतात ?
स्त्री आय डी नावाने पुरुष सदस्य वावरत असेल तर ? अशांच्या गळचेपीचं काय मग?

नाही पटलं अजिबात!
जे चांगलं त्याल नेहमीच चांगलाच प्रतिसाद मिळालाय.
नव्या आयडींबद्दलही नाही पटलं. इथे अनेक असे आयडीज आहेत जे येऊन वर्षही नाही झालं पण त्यांचं नुसतं नाव वाचुन त्यांचं लिखाण वाचलं जातं!

तेंव्हा नवं,जुनं, स्त्री, पुरुष, खरा,खोटा असं काहीही न बघता मी तरी जे चांगलं तेच वाचते आणि त्यालाच प्रतिसाद देते

ख-या खोट्या आयडींचा विषय वेगळा आहे.
सर्वसाधारण महिला वर्गाचं कौतुक करणे हे नैसर्गिक वैशिष्ट्य आहे. तसंच पडतं घेणं किंवा सामंजस्याची भूमिका घेणं हे नैसर्गिक पणे होत असतं. तेच इथंही दिसतं. असे स्त्री आयडी बहुसंख्य पण असंघटीत आहेत. अपवाद आहे तो वेगळा विचार करणा-यांचा.
पुरूष आयडींना थोडा इगो असतो हे निरीक्षण सर्वत्र लागू पडतं.

आंतरजालीय वावराचा प्रदीर्घ, क्लिष्टतायुक्त व सखोल व्यासंग असलेल्या अर्धवटरावांनी (हे उपरोधाने म्हणत नाही आहे) मला माफ करावे.

लेखाशी तर सहमत नाहीच आहे, पण त्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिसादांशीही समहत नाही.

किंबहुना, म्हणजे सहमती, असहमती तर बाजूलाच राहो, काही विधाने तर खटकलीच (मला तरी):

>>>सर्वसाधारण महिला वर्गाचं कौतुक करणे हे नैसर्गिक वैशिष्ट्य आहे.<<< मायबोलीपुरते बोलायचे झाल्यास विऱळा दिसणारी कंपूबाजी सोडली तर चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट म्हणणारेच सर्वत्र दिसत आहेत. आय डी कोणता हे न बघता परखडपणे लिहिणारेच येथे दिसतात. इतपत ठीक आहे की एखाद्या आय डी चा दबदबा असल्यास होणारा विरोध जरा वचकून केला जातो इतकेच फार तर!

>>>असे स्त्री आयडी बहुसंख्य पण असंघटीत आहेत.<<<

मुळात आय डी संघटीत वगैरे असायला मायबोली हे एखादे सामाजिक आंदोलन नव्हे. तरीही, कित्येक आय डी (स्त्री - स्त्री, पुरुष - पुरूष - स्त्री - पुरुष) हे बर्‍याच प्रमाणात संघटित आहेत. मला संघटित या शब्दातून अभिप्रेत हे आहे की एखाद्या विषयावर अनेकांचे एकमत होणे हे येथे सहज दिसते. (ही कंपूबाजी खचितच म्हणता येणार नाही).

>>>अपवाद आहे तो वेगळा विचार करणा-यांचा.<<<

हे विधान निव्वळ कातडी बचाऊ प्रवृत्तीचे वाटले असे स्पष्ट लिहिण्यासाठी दिलगीर आहे. कोणी विरोध केलाच तर 'मी हे तुमच्याबाबत बोलत नव्हतो' असे म्हणण्यास वाव देणारे हे विधान आहे यापलीकडे काही नाही.

पुरूष आयडींना थोडा इगो असतो हे निरीक्षण सर्वत्र लागू पडतं<<<

हे सरसकटीकरण आहे व माझ्या अल्पमतीनुसार चूक आहे. इगो सर्व आय डीं ना असतो व कमी अधिक असतो तसेच त्याचा स्त्री वा पुरुष असण्याशी किंवा जे आहोत त्यापेक्षा वेगळाच आय डी घेण्याशीही संबंध नाही.

हे असे लेख गंमत म्हणून लिहिले जात असतील तर सर्वांनी गंमत तरी करावी व करू द्यावी. पण प्रतिसादात गंमत केली गेली तर त्यावर जर गंभीर प्रतिवाद केला जात असेल तर त्याचा अर्थ मूळ लेख गंमत म्हणून लिहिलेला नसावा हे स्पष्ट होते. जर असे लेख गंभीरपणे लिहिले जात असतील तर संतुलन ठीक आहे किंवा नाही हे पडताळून पाहिले गेले पाहिजे, असे (पुन्हा, फक्त) मला(च) वाटते.

-'बेफिकीर'!

तुम्ही सहमत नाहीत हे कळाले. आंतरजालीय क्षेत्रातला तुमचा दबदबा पाहता त्यावर काही बोलणे योग्य होणार नाही.

जर असे लेख गंभीरपणे लिहिले जात असतील तर संतुलन ठीक आहे किंवा नाही हे पडताळून पाहिले गेले पाहिजे,

असं तुम्हाला का वाटते ? म्हणजे सध्याचा प्रतिसाद लिहीताना तुमचं संतुलन ठीक आहे किंवा कसं हे पडताळून कसं पहायचं ? Proud

तुमच्या धाग्यांवर प्रतिसाद देणा-या स्त्रीआयड्यांविषयी किंवा तुम्हाला त्रास देणा-या संटोसा कि काय किंवा कंपूबाजी बद्दल काहीच म्हणायचं नव्हतं हे तुमची शप्पथ घेऊन सांगतो.

मायबोलीपुरते बोलायचे झाल्यास विऱळा दिसणारी कंपूबाजी सोडली तर चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट म्हणणारेच सर्वत्र दिसत आहेत. आय डी कोणता हे न बघता परखडपणे लिहिणारेच येथे दिसतात.

Lol

हे तुमचं मत अचानक झालेलं आहे का ? कि पूर्वीपासून हेच आहे ? Wink
कंपूबाजी बद्दल तुम्ही यापूर्वी संतुलित मतं मांडलेली नसावीत असं समजूयात. तुमची यापूर्वीची या विषयावरची मतं ज्यांनी वाचली असतील त्यांच्यासाठी आताची कोलांटौअडी म्हणजे मनोरंजनच ठरेल. पण या अशा कोलांटौड्यांच्या मागे हा आयडी माझा नाही हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न असावा अशी शंका येते. असं वारंवार स्वतःहून सिद्ध करायला लागणं याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. शक्यतो हे टाळावे आणि गंमत वाटत असल्यास गंमत म्हणूनच पहावे असा माझा आपणासारख्या दिग्गज विद्वानास केविलवाणा सल्ला आहे.

@ मैत्रेयीजी
धुळवड खेळण्यासाठी अ‍ॅनोनिमस असणे किंवा नसणे याच्याशी काहीच संबंध नसतो हे सिद्धच झाले कि नाही ? माझा हा आयडी अ‍ॅनॉनिमस वाटत असू शकेल पण वैयक्तिकरित्या कुणाबद्दल काही लिहावंसं वाटलं नाही. त्यासाठी काही गुण अंगात असावे लागतात. लोकांच्या विपूत डोकावणे, स्क्रीन शॉट्स घेणे, अ‍ॅनॉनिमस आयडीने ए स्क्रीन शॉट्स फोरम मधे चिकटवणे हे गप्पिष्ठसारख्यांचे उद्योग सर्वांनाच कसे जमतील ? ते तसं मंदार जोशी या नावाएही करतात आणि दुस-या नावानेही करतात.
इथं माझी जनरल ऑब्झर्वेशन्स मांडली फक्त. काडीच समजा हवं तर.
आपण विषयावरच बोलूयात.

मंडळी…. मंडळी… मंडळी, मला एक शंका कुरतडतेय … अर्धवटरावांचा "मूळ उद्देश" सफल झाला कि काय? घमासान चर्चा होऊ लागलीये राव (साला या कार्पोरेट जगात राहून सगळीकडे संशयाने बघायची खोड जडलीये)

Happy

सगळं एकूण हास्यास्पद आहे. पण तरीही,
मैत्रेयी भागवत आणि आणखी एक स्त्री आयडी (नाव नेमके आठवत नाही) असे बायकी आयडी घेणे, स्त्री कवयत्रींच्या कवितांवर आवर्जून प्रतिसाद देणे आणि त्यांना आलेल्या टीकेला परस्पर उत्तर देणे, स्वतःवर उलटलं की इतरांवर डुआयडींचा संशय घेणे, मतं पटली नाहीत की रात्रीबेरात्री जुन्या मित्रांना शिव्या देणारे आणि तत्सम व इतर घाणेरडे ईमेल्स पाठवणे हे उद्योग काय फक्त किरण चव्हाण याच नावाने जमतात असे नाही. तर वीरू, अर्धवटराव, अशा अनेक नावांनी सुद्धा ते उद्योग करतातच.

बाकी, मंदार जोशी यांच्या नावाचा जप केल्याने काही पुण्य मिळतं किंवा सिद्धी प्राप्त होते असा इथल्या बर्‍याच लोकांचा समज आहे वाटतं.

.

कुणाचं काय कुणालाही चिकटवता कि काय ? Lol

मंदार जोशी या नावाने लोकांना आलेले इथल्या आयड्यांबद्दलचे आणि त्यांच्या विपूतले आक्षेपार्ह मेल्स फोरम मधे इतर नावाने चिकटवलेले दिसले. ते फॉरवर्ड झाल्याने कळालं इतकंच. हवं असल्यास इथं पेस्ट करतो.

(एका कवितेच्या धाग्यावर ती कविता आहे कि नाही अशी चर्चा झाली होती. त्यात मंदार ओशी यांनी एक विपू कॉपी पेस्ट केली होती. तो धागा उडाला अशी कहाणी. )