फिनिक्स पान १४

Submitted by पशुपति on 26 November, 2013 - 09:39

तेवढे एकच वाक्य तिच्या विचारांच्या चालनेलापुरेसे होते. ती तडक उठली आणि ती बातमी सुब्रतोला वाचायला दिली. बातमी वाचून त्याला काहीही बोध झाला नाही.सुनंदाकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत तो म्हणाला, “एवढे ह्यात महत्वाचे मला सांगण्यासारखे काय आहे?”
“अरेपागल,इतनीसी बात समझमेंनहींआयी? लक्षात घे, जागतिक परिषद आहे. अनेक देशांचे लोक येणार त्यात काही लोकांना तरी चित्रकलेची आवड असणारच.त्यातल्या एखाद्याला जरी तुझे चित्र पसंत पडले,तर तुझ्या चित्रांचे सोने होईल.आजपासून तू आता ‘पर्यावरण’ हा विषय घेऊन चित्र काढणे सुरु कर.ह्या विषयावर मी काही पुस्तके पण घेऊन येईन. ती पण वाचून घे, म्हणजे चित्रांचा सांगाडा तयार होईल. ह्याशिवाय तू म्हणशील ती मदत मी करेनच!! जरूर पडली तर सुट्टी पण घेईन.”
सुनंदाच्या बोलण्याचा आवेश पाहून सुब्रतोला मोठी गंमत वाटली.पण ह्या खेपेस त्याचे मन झाडावर चढायला तयार होईना. मागच्या जखमा अजून ताज्या होत्या.सुनंदाचे पुढचे आठ दिवस त्यालासमजवण्यातच गेले...तेंव्हा कुठे बंगाली मोशाय घोड्यावर बसले!! बंगालमध्ये कशावर बसतात कोण जाणे! महाराष्ट्रात मात्र चढतात हरभऱ्याच्या झाडावर आणि बसतात घोड्यावर! आणि घोड्याची अंघोळ मात्र गंगेत!!
सुब्रतोच्या प्रकृतीमध्ये आता बराच फरक पडला होता.कुबड्यांची जागा आता काठीने घेतली होती. काठीच्या आधाराने लंगडत का होईना, त्याला चालता येऊ लागले होते. कधीकधी त्याच्या डोळ्यासमोर तो पडल्यापासून आत्तापर्यंत जे जे घडले ते सर्व चित्र तरळून जायचे. सर्वांनी केलेल्या मदतीची त्याला मनापासून कृतज्ञता वाटायची.सुब्रतो-सुनंदा ह्यांचे लग्न ठरून आता ६ महिने होत आले होते. पुढे काय करायचे हे ठरवायला सुब्रतोचे वडील पण पुण्यात आले.सर्वानुमते लग्न अगदी साधेपणाने आणि रजिस्टर करायचे असे ठरले.सुब्रतो आणि सुनंदाला पण तेच हवे होते.नाहीतरी मागच्या काही महिन्यांत बराच खर्च झाला होता.सुनंदा पण तिचा जवळजवळ सर्व पगार काहीना काही कारणाने सुब्रतोसाठी खर्च करायची.
पुण्यात पर्यावरण परिषदेची जोरदार तयारी सुरु झाली होती. सर्व सरकारी संस्था नेमून दिलेली कामे पूर्ण करण्यामागे लागल्याहोत्या.वाहने अधिक कडकपणे तपासायला सुरुवात झाली होती. परिषदेच्या सप्ताहात तरी पुणे प्रदूषणमुक्त ठेवायचे, हा निर्धार सर्वांनी केला होता. बघताबघता परिषदेचा दिवस जवळ येत चालला. पुण्याची सर्व हॉटेल्स विदेशी लोकांनी गजबजून गेली होती.सुब्रतोने पण एव्हाना ३० पेंटिंगपूर्ण केली होती.ह्यावेळीसुनंदाने मोठ्या आणिडेकोरेटिव्ह स्वरुपात मराठी तसेच इंग्रजी वर्तमानपत्रात निवेदन वजा जाहिरात दिली होती. परिषदेच्या संयोजकांची ओळख काढून तिथे पण छोटासा पोस्टर वजा बोर्ड लावण्याची परवानगी मिळवली होती. इतकेच काय त्यांच्या मुख्य अधिकाऱ्याला तिने सर्व चित्र पण दाखवली होती. त्यांना ती चित्रे इतकी आवडली, की त्यांनी परदेशी लोकांसाठी आयोजित केलेल्या पुणे-दर्शन सहलीमध्ये बालगंधर्वकलादालनाचा पण समावेश केला.
.....क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users