मेडिआ आणि अतिरेक

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मेडिआचा वापर हा अतिरेकी फोर्स मुल्टिप्लायर मह्णुन करत आहेत आणि ते थांबायला हवे. जसे अतिरेक्यांशी कुठल्याही वाटाघाटी करणार नाहि हि भुमिका योग्य आहे तशाच प्रकारचि भुमिका मेडिआने घ्यावी. अतिरेक्यांना त्यांच्या कारवायांना ठळक प्रसिद्धि दिलि जाणार नाही असे एक्तर मेडिआने स्वतःवर बंधन घालावे अथवा तसा कायदा सरकारने करावा असे मला वाटते. तसेच जेंव्हा अतिरेकयांवर कारवाइ होत असेल तेंव्हा मेडिआने लाइव कव्हरेज द्यायचे टाळावे तसे मेडिआ करणार नसेल तर जि मेडिआ असे करेल त्यांचे लायसन्स जप्त करावे अथवा प्रचंड दंड आकारावा...

माहिती हे शस्त्र आहे आनि त्याचा वापर अतिरेकि त्यांच्या विरोधात होणार्या कार्यवाहिला निष्प्रभ करण्यासाठि वापरू शकतात किंबहुना करतात. हे मेडिआला समजत नाही असे नाहि. पण फालतू चढाओढीत राश्ट्रहिताचे समाज हिताचे काय हे मेडियाला समजत नसेल तर मेडिआला लगाम हे लोकशाहीतील नागरीक म्हणुन आपले कर्तव्य आहे.

त्याच प्रमाणे कोणत्याहि चालु केस वर, पोलिस चौकशि संदर्भात मेडियाने बातम्या देउ नयेत असहि नियम काढावा ह्या मताचा मी आहे. एखाद्या महत्वाच्या केसचे राजकियकरण करणे हे टाळणे एक लोकशाही म्हणुन महत्त्वाचे आहे. योग्य न्याय मिळाला नही असे वाटल्यास मेडियाने तशि मोहिम उघडणे योग्य पण न्याय मिळायच्या आधिच ती केस मेडिआने चालवून जनतेच्या मनात आधिच एखाद्याला (एखाद्या समजाला) गुन्हेगार ठरवणे हे पुर्णतः चुकिचे, न्यायाच्या विरुद्ध व लोकशाहीला घातक आहे.

अतिरेकी मेडिआ हा समाजाचा चौथा खांब होउ शकत नाही. इतर खांबावर समाजाचा अंकुश निवडणुकीद्वारे आहे मेडिआवर समाजाचा अंकुश नाही. त्याचा गैर्फायदा मेडिआ घेत आहे असे मला वाटते. तो अंकुश असायला हवा. मेडिआ राजकार्ण्याच्या हातातल बाहुल होण समाजाला परवडणारे नाही म्हणुन एकतर मेडिआने स्वतःची अशि आचार संहिता तयार करावी अथवा अशी संहिता इन्डीपेंड्न्ट पणे तयार करून ती लोकानी मतदानाद्वारे मेडिआवर बंधन्कारक करावी.

विषय: 
प्रकार: 

चांगला धागा सुरु केला आहे. अनेक पातळ्यांवर आपल्याला लढा द्यावा लागणार आहे, ही (अप्रत्यक्षपणे) हातभार लावणारी एक अघाडी आहे.
दहशतवाद्यांच्या अनेक अनेक उद्देशां पैकी मला दोन ठळकपणे दिसतात.
(१) अमाप प्रसिद्धी, सर्व चॅनेल्स वर दाखवलेवि. जात होते. जगभरात लोकांच्या नजरे समोर रहाणे, प्रसिद्दी मिळवणे (टिकवणे)
(२) समाजात दंगली माजवणे. जेणेकरुन त्याचे भांडवल (कारण) पुढच्या हल्ल्यासाठी करणे. याचा दुसरा उपयोग नवीन भरती (बघा तुमच्या वर अन्याय होतो आहे) करण्यासाठी पण होतो.

सुदैवाने #२ मधे अजुन तरी काही यशच नाही मिळाले आहे. पण #१ मधे चांगल्याच प्रमाणात यश मिळवले आहे, अप्रत्यक्षरित्या मेडियाची मदतच होते आहे. कधी कधी अत्यंत बारिक details मधे कसा पकडला गेला याचे वर्णन देखील येते. आता याचा जास्त उपयोग (जनतेला माहिती देण्यापेक्षा) अतिरेक्यांना पुढच्या वेळेला झालेल्या चुका टाळण्यासाठी होतो. सामान्य व्यक्ती बातमी वाचुन सोडतो पण अतिरेकी त्यातून शिकतो...

NSG चढाई करत आहे, बाहेरून live कॅमेरेज लागलेत. बाहेरची बित्तमबातमी म्हणजे कुठुन येत आहे, काय हालचाली आहेत, कुठल्या level (कापसाचे वि. लोखंडी हात) ने हाताळणी होते आहे या बातम्या आत मधे अतिरेक्यांना सरकारी माध्यमांच्या मदतीने आरामात मिळात होत्या. त्यांचे स्वतःचे पण नियंत्रण कक्ष होते...

मला नेहेमीच वाटते बातमीतील भडकपणा खुप कमी करावा, पण सोबतच अतिरेक्यांचा मुकाबला लोखंडी हाताने/ काळजाने करावा. दुर्देवाने दोन्ही गोष्टी होतांना दिसत नाहीत.

फक्त टी आर पी वाढवने आनी पैसा कमावने यापलिकडे या डुकरान्चा उद्देश असुच शकत नाही, एक प्रामानिक गावठी मत.

पेशवा, योग्य लिहिले आहेस. ज्याप्रमाणे असे म्हंटले जाते की सामाजीक अन्याया विरुद्ध लोकांनी प्रसारमाध्यमांना पत्र लिहुन गार्‍हाणे नोंदवावे, त्याचप्रमाणे त्यांच्याविरुद्ध देखिल त्यांना आणि त्यांच्या competitors ना लिहावे. कायदा पारीत करणे अर्थातच गरजेचे असु शकते पण तो अतिशय कडक असुन चालणार नाही. अजुन काय करता येईल?

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

>>फक्त टी आर पी वाढवने आनी पैसा कमावने यापलिकडे या डुकरान्चा उद्देश असुच शकत नाही, एक प्रामानिक गावठी मत.>> १०००% सहमत.

माझ्यामते इंडिया टि व्ही हे सगळ्यात भडक न्यूज चॅनल आहे. तिथल्या बातम्यांना काहीही ताळतंत्र नसते. एकच बातमी फिरून फिरून दाखवतात. कोणतेही फोटो अतिरेक्यांचे म्हणून दाखवतात. काहीही ब्रेकिंग न्यूज आली की 'ये आपको पहलीबार इंडिया टि व्ही ने दिखाया... ' वर हा आणि सर्वात पुढे असल्याचा दावा.
मुंबईच्या ताज हॉटेल वर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात एक डॉक्टर दांपत्य अडकले होते. तिलू मंगेशकर आणि त्याचे पती. इंडीया टि.व्ही. ने धडधडीत खोटं सांगितलं की हे दोघं म्हणे हॉटेलात ५९ तास अडकून होते. यावर मि. मंगेशकर म्हणाले "हे पहा आम्ही तिथे ५९ तास नव्हतो, फक्त ११ ते १२ तास होतो." त्यांची सुटका २७ तारखेला सकाळी ९.३० च्या सुमारासच झाली होती.

या एका छोट्याश्या गोष्टीवरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की आपल्या पर्यंत पोहोचलेल्या बातम्या किती 'प्रोसेस्ड' असतील ते. माहीती नाही आता मूळामध्ये बातमी गोळा करणारे पत्रकारच जर बातमी फुगवून पुढे सरकवत असतील तर??

थोडं विषयांतर होईल, पण इथे सांगितल्यावाचून राहवत नाही. मध्यंतरी एक बातमी आली होती याच चॅनलवर की एका माणसाने आपल्या बायकोला मारून टाकले, त्याची जी ठळक बातमी येत होती ती विचित्रच होती, की आत्मा ने मारा पत्नी को, खिडकी से आयी चाचा की आत्मा'' Uhoh

हे न्यूज चॅनलवाले आपल्याला मूर्ख समजतात का? Sad यांना अशा बातम्या रंगवून सांगताना थोडीही लाज का नाही वाटत? त्या माणसाला काहीतरी मानसिक रोग असेल असं एक सेन्सिटिव्ह वाक्य ही शक्यता म्हणून त्यांच्याकडून उद्गारलं गेलं नाही, शेवटपर्यंत आत्मा ने पत्नी को मारा हेच तुणतुणं. Uhoh Sad

बाकी पेशवा आणि उदय यांच्याही पोस्टला अनुमोदन. मिडियावाल्यांच्या अति उत्साहामुळेच हेमंत करकरेंना आपला जीव गमवावा लागला. मिडियाने त्यांची प्रत्येक न प्रत्येक हालचाल टि. व्ही. वर दाखवली होती. Sad

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अजुन काय करता येईल? >>> त्यांच्या मालकांना फोडून काढले पाहिजे... (हे एक मत)

त्याचबरोबर.. मला वाटते,

१. सरकारने या सर्व मिडियावर तांत्रिकदृष्ट्या ताबा ठेवायला हवा.. हे शक्य आहे की नाही माहित नाही पण तार्किक पद्धतीने तरी शक्य होईल असे वाटते.. प्रत्येक वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण उपग्रहामार्फत होत असेल तर सरकारी यंत्रणांना परस्पर या प्रक्षेपणाला तात्काळ थांबवता आले पाहिजे. आणि अशा परिस्थितीत फक्त दुरदर्शनवरुन माहितीपर बातम्या दिल्या जाव्यात म्हणजे जनता अफवांनी अस्वस्थ होणार नाही..

२. अधुनमधुन यांच्यावरुन दाखवल्या जाणार्‍या कंटेन्टची तपासणी केली जावी. ही तपासणी सर्व क्षेत्रातील मान्यवर (शक्यतो राजकीय नसलेले.. किंवा एखादा जबाबदार राजकीय व्यक्ती [ही कुठे शोधायची :)]) आणि थेट जनतेतील काही प्रतिनिधी यांनी करावी. हीच गोष्ट राज्यपातळीवर कींवा जिल्हा पातळीवर वर्तमानपत्रांच्या बाबतीत सुद्ध करता येईल. सर्वसंमतीने एखादे चित्रिकरण चुकीचे असल्यास तात्काळ दंड (किंवा चुकीची पातळी लक्षात घेउन तेवढे दिवस बंदी) अशी शिक्षा द्यावी.

३. सर्वसामान्यांनी या सर्व मिडियाला ईमेल , फोन द्वारे वारंवार संपर्क साधुन त्यांच्या चुकीची जाणिव करुन द्यावी. म्हणजे ऐश्वर्याची शिंक, अमिताभची पोटदुखी, सुष्मिताचा कुत्रा यापेक्षा वेगळे काहीतरी लोकांपर्यत पोचवता येईल..

कुल, २ आणि ३ कुल.

१ ला मात्र अनुमोदन नाही. सरकारचे असे कंट्रोल असणे मला पटत नाही. Sad
त्यांना कंट्रोल करायला हवे ते त्यांनी स्वतः किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकुन आम्ही (न पहाणे, जाहिराती न देणे ई.). सरकारकडे जरुरीपेक्षा जास्त कोणतेही हक्क दिले तर त्याचा गैरवापर होऊ शकतो.

-------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

माझ्यामते तर २४ तास न्यूज देण्याचा दावा करणारी सगळी चॅनल्सच आधी बंद करायला हवीत. सतत काहीतरी नविन देण्याच्या नादात आणि स्पर्धेत सामान्य लोकांचं खाजगी जीवन चव्हाट्यावर आणायला मिडिया दिवसेंदिवस पुढेच सरसावते आहे. 'बातमी' 'ब्रेकिंग न्यूज' या मथळ्याखाली काहीही दाखवतात. Angry

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

खरच या न्यूज चॅनेलवाल्यांना काही ताळतंत्रच उरलं नाहीय. सर्वात कहर म्हणजे या अश्या जीवावरच्या गंभीर प्रसंगातून बाहेर आलेल्यांना बिनडोकपणे विचारतात ना की आता तुम्हाला कस वाटतय? तेव्हा शप्पथ असे वाटते त्यापैकी कुणीतरी एकदातरी त्या वार्ताहराच्या श्रीमुखात ठेवून द्यावी. Angry त्यातल्या त्यात मराठी चॅनेल्स थोडेतरी शुद्धीत असतात. पण सध्या तिथेही आनंद्च आहे Sad

>>>त्यांच्या मालकांना फोडून काढले पाहिजे... कूल एकदम सहमत

कुल ला आणी दक्षीणाला १००० वेळा अनुमोदन!!!! खरंच बातमीच्या नावाखाली हे मिडीयावाले काहीही खपवतात!!
शनीवारी आज तक वर या हल्ल्यामागे कुणा रेहमानचा हात असल्याची बातमी झळकत होती. पण फक्त थोडा वेळच दाखवली आणी नंतर अचानक गायब!!! काहीही खुलासा नाही!!! या एवढ्या गंभीर प्रसंगीही बिनबुडाच्या बातम्या दाखवुन लोकांची दिशाभूल करतात Sad
आणी २४ तास बातम्यांची चॅनेल्स खरोखर बंद केली पाहीजेत. आधी कुठे होती अशी चॅनेल्स? वर्तमानपत्रांनी भागत होतं ना लोकांचं?

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

Happy इतकं सरळ सोप्पं असतं तर काय पाहिजे होतं महाराज?
फारच भोळसट अपेक्षा असतात आपल्या.
मिडीया म्हणजे आपले खादीचा कुर्ता, शबनम बॅग लावून सत्य शोधायला निघालेले पत्रकार आणि प्राणांची आणि तोट्याची पर्वा न करता सत्य तडीला लावायला निघालेले संपादक राहिलेले नाहीयेत आता.
कोट्यवधींचा बिझनेस झालाय तो.
शिवाय नवीन शहाण्या जनतेला राजकारणी विश्वासू नाही ना वाटत? मग आम्ही आहोत ना म्हणून पुन्हा राजकारण्यांचीच री ओढणारी आणि स्वत:ची मत सत्य म्हणून मांडणारी ही नवीन पिढीतली फोर्थ इस्टेट.
मुंबई हल्ल्याच्या वेळी थेट प्रक्षेपण बंद करा अशी एनेस्जी ची विनंती फक्त एक तास मान्य झाली. त्यावेळीही म्हणे मिडियावाल्यांनी त्यांना धमक्या दिल्या की तुमच्या चुका हायलाईट करून तुमची कशी वाट लावतो बघा. आणि एका तासात चक्रं फिरून पुन्हा थेट प्रक्षेपण चालू. अहो करोडो लोक हा तमाशा टिव्हीला डोळे लावून बघत असताना त्या पैशांवर देशासाठी पाणी सोडायचं? आजच्या मिडिया नावाच्या (अंडर) वर्ल्डला हे सहन तरी होईल का?
आता तर देशाचं राजकारणही त्यांना आपल्या मतांवर चालवायचंय. आरार गेले ते त्यामुळंच. लालू राहिलेयत आणि भुंकतायत तेही त्यामुळंच. वाट्टेल ते खोटंनाटं बोलून इतरांच्या चुका झाकून मराठी लोकांच्या मात्र उघडकीला आणून अँटी नॉर्थ कॅम्पेनचा महाराष्ट्राला धडा शिकवायचा हे सध्याचं हॉट कँपेन आहे.
अर्थात आपले राजकारणी काही कमी नाहीत पण कृपाशंकरापेक्षा विलासराव बरे नाही का?

संघमित्रा,
तुम्ही म्हणता ते ही दुर्दैवाने सत्य आहे. Sad मिडियावाल्यांच कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. त्यांच्या वाटेला गेलं तर, ते होत्याचं नव्हतं करून टाकू शकतात. आता खरंतर आपण म्हणजे जनतेनेच ठरवलं पाहीजे की कुणाच्या हातात किती पावर द्यायची ते. Sad
पण जर समस्त भारतीय जनतेने ह्या २४ तास चालणार्‍या न्यूज चॅनलवर एकत्रित बहिष्कार घातला तरंच थोड्या फार प्रमाणात क्रांती शक्य आहे. अन्यथा नाही.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

... इतका राग येतोय ना की डोक बधीर होऊन जात... एक हे पुढारी जीव घेणारे आणि दुसरी कडे हे मिडीया वाले... जीव जाताना फोटो काढणारे... बी बी सी वर एका क्लीप मधे धाखवत होते की एका माणसाला हाताला गोळी लागलीये आणि हा कॅमेरामन पठ्ठ्या त्याचा जखमी हात पुढे कर म्हणून त्याला सांगतोय... इतकी चीड आली ना ते बघून...

१]आपल्याकडच्या मिडिआवाल्यांना डुक्कर, गिधाडं अशा प्राण्यांची नावं देणं हा त्या प्राण्यांचा अपमान आहे.
२] नरीमन हाऊस बाहेरून चाललेल्या कमांडोंच्या सर्व हालचाली टीव्हीवर निर्वेधपणे आत बसलेल्या अतिरेक्यांना पहायला मिळत होत्या. यापे़क्शा अधिक देशविघातक कारवाई कोणती असू शकेल? अशा बेअक्कल मिडीआवाल्यांवर बन्दी घालून त्यांच्यावर खटले भरले पाहीजेत.
३] २८ नोव्हेंबरला ’ व्हि.टी. स्टेशनवर नव्याने गोळीबार सुरू ’ अशी धादांत खोटी बातमी दिली जात होती. यामुळे के्वढी घबराट माजली असेल याची कल्पना मिडीआवाल्यांना अर्थातच नव्हती. त्यांना कुणी धडा शिकवायचा?
४] प्रिंट मिडीआवर प्रेस कौन्सिलचा थोडा तरी अन्कुश आहे. ईलेक्ट्रॊनिक मिडीआवर तोही नाही. तशी व्यवस्था कायद्याने करणे आवश्यक झाले आहे.

बापू करन्दिकर