फिनिक्स पान १३

Submitted by पशुपति on 25 November, 2013 - 04:50

सुब्रतोच्याट्रीट्मेंटला ३ महिने उलटून गेले. आता तो वॉकरच्या सहाय्याने चालू शकत होता.पेंटिंगची संख्या पण प्रदर्शन भरवण्याएवढी झाली होती.सुनंदाची आता वेगळीच धावपळ सुरु झाली होती. प्रदर्शनभरवण्यासाठी काय करायला हवे,हॉल बुक करणे, प्रदर्शनाची माहिती प्रसिद्धी माध्यमामार्फतप्रसारित करणे, इत्यादि सर्व करण्यात तिला दिवस-रात्र अपुरे पडत होते.सर्व आर्थिक भार सुब्रतोच्यावडिलांनी उचलला होता.एके दिवशी पेपरमध्ये एक बातमी झळकली......
सुब्रतो चक्रवर्ती ह्या नवीन कलाकाराच्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व रंग मंदिराच्या कलादालनात भरत आहे. प्रवेश फी नाही.
प्रदर्शन पाहण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी रोजच्या रोज होत होती. पण सर्व लोक नुसते येत होते...पाहत होते.....जात होते...एकानेही चित्रकाराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली नाही किंवा कोणीही चित्र विकत घ्यायची तयारीही दाखवली नाही. प्रदर्शन संपले आणि सर्वजण हरवलेल्याचेहऱ्याने घरी परतले.कलादालन मात्र निर्विकार चेहऱ्याने तसेच उभे होते. एखाद्याचे चित्र लाखोने विकले जाते काय किंवा एखादा हताश मनाने परत जातो ह्याचे त्याला काही सुख-दु:ख नव्हते. त्याचे फक्त एकच काम....प्रत्येक कलाकाराला जागा उपलब्ध करून देणे.
सुब्रतो मात्र आता पुरता खचला होता. नोकरी सुटलीच होती, चालताही येत नव्हते, प्रदर्शनाची ही अवस्था, त्यालासगळीकडे अंधारच दिसत होता. ‘काय उपयोग ह्या जीवनाचा?? ज्या वयात आपण दुसऱ्यांना हात द्यायचा, त्या वयात आपण दुसर्याकचा हात धरून चालतोय! ह्याला काय जिणे म्हणायचे! संपूर्णपरावलंबित्व....’ आतल्या आत जळत होता तो!त्याच्या आईने आणिसुनंदाने त्याला बरेच समजावले. पण त्याचा मूड काही परत येईना.त्याच्या मनात आता वेगळेच विचार सुरु झाले. ‘सुनंदाशी तरी आपण लग्न करावे का? तिला कशाला आयुष्यभर आपल्या दु:खात सामील करून घ्यायचे?’ पणसुनंदा ह्या बाबतीत ठाम होती.
ती म्हणाली, “मनाने तर मी आधीच वरले आहे, आता सोहळा म्हणजे केवळ बाह्य उपचार आहेत. त्रास आणि दु:ख ह्याबाबत बोलायचे तर ते सगळीकडेच आहे. त्यातले आपण किती उचलायचे आणि किती सोडायचे...ते आपल्या मनावर आहे! सुखआणि दु:ख ह्या माणसाच्या मानसिक अवस्था आहेत. त्या आपण नेहमीच ठरवू शकतो.”
सुनंदाचेहे प्रगल्भ विचार ऐकून सुब्रतोची आई पण अचंभित झाली.
एके दिवशी सुनंदा सहज वर्तमानपत्रचाळत होती. त्यातल्या एका बातमीने तिचे लक्ष वेधले. ‘पर्यावरण संघटनेची जागतिक परिषद पुण्यात भरत आहे.’

....क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users