गॅस कार्ड पत्ता बदलण्या बद्दल

Submitted by प्रितीभुषण on 24 November, 2013 - 05:01

मला गॅस कार्ड पत्ता बदलण्या बद्दल माहिती हवी आहे..
माझ्या कडे असलेला रेग्युलेटर माझ्या साबां च्या नावे पुणे कोथरुड या पत्त्या वरील आहे तर तो [पत्ता] मला नेरुळ नवी मुंबई येथील hp सेंटर मधे करण्या साठी काय काय करावे लागेल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यामाहीतीप्रमाणे अ‍ॅफिडेविट नाही लागणार. साबांच्याच नावानी जर ते कनेक्शन ठेवायचे असेल तर, पुण्यात रेग्युलेटर + सिलेंडर जमा करा. त्याची रीसीट अन डिपॉझीट्चे पैसे नेरूळात भरा. नेरूळ्च्या पत्त्याचे डिटेल्स मात्र लागतीलच. रेंटेड असाल तर रेंट अ‍ॅग्रीमेंट लागेलच... नाहीतर बाकी अ‍ॅड्रेस प्रूफं लागतील.

मला ही अ‍ॅफिडेविट नव्हते लागले. वरती योगेश यांनी सांगितलेलीच प्रोसीजर आहे. बहुतेक ऑनलाइन नाही होणार हे काम. गॅस कनेक्शन माझ्या नावाने होते(जळगावचे), जेव्हा मी पुण्यात आले तेव्हा फ्लॅट आईच्या नावाने होता म्हणून अॅड्रेस प्रूफ म्हणून लाइट बिल दिले होते.

अ‍ॅफिडेव्हिट कसं करायचं ? डीलर कडे फॉर्म मागण्यासाठी काय करावं लागतं ? तो फॉर्म कसा भरायचा ?

online नाहि का होणार काम >>> बहुधा नाही. प्रत्यक्ष जावेच लागेल कारण डॉक्युमेन्ट्स सबमिट करावे लागतात रेग्युलेटर ताब्यात घ्यावं लागतं. सिलेडर ते लोक नंतर डिलिवर करतात.

आम्ही नालासोपारा येथून श्रीरामपुर येथे शिफ्ट झालो माझ्या नव-याची बदली झाली म्हणून तेव्हा दोन्ही सिलेंडर आणि रेग्युलेटर (आमच्याकडे बी.पी.आहे) जमा केले होते नालासोपारा येथे (२००२ साली). आम्हाला एक रिसिट दिली होती डीलरने, ती श्रीरामपूरला बी.पी.च्या डीलरकडे जमा केली. काही दिवसांनी आम्हाला तिथे दोन सिलेंडर आणि रेग्युलेटर मिळाले.

परत आम्ही २००६ साली डोबिंवली येथे शिफ्ट झालो, सेम प्रोसिजर केले, इथे ४ दिवसांनी गॅस मिळाला.
अँड्रेसप्रूफ लागतो. (गॅस माझ्या नव-याच्या नावावर आहे.) आता नविन बदल झाले असतील तर माहीती नाही.

खेड-सानपाडा-कामोठे-रत्नागिरी-गोवा-मंगलोर-चेन्नई अशा ठिकाणी गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायचा अनुभव गाठीशी आहे.

सासूबाईंचे कनेक्शन ज्या डीलरकडे आहे त्या डीलरकडे जा. जाताना गॅसची ओरिजिनल कागदपत्रे, ओळखीची कागदपत्रे (उदा. पॅन कार्ड, व्हेटर आयडी कार्ड) आणि मुख्य म्हणजे सासूबाईंना घेऊन जा. जाताना रेग्युलेटर आणि दोन्ही सिलेंडर सबमिट करावे लागतील, तेव्हा ते घेऊन जा. हे ऑनलाईन जमा करता येत नसल्याने प्रत्यक्ष जावे लागेल. डिपॉझिटचे पैसे लगेच परत मिळतील.

डीलर लगेच तुम्हाला एक ट्रान्सफर सर्टिफिकेट देईल. तो कागद सुखरूपपणे ज्या भागात गॅस कनेक्शन हवे आहे तिथल्या डीलरकडे नेऊन द्या. अ‍ॅद्रेस प्रूफ्ग, वैयक्तिक ओळखप्त्रे वगैरे घेऊन जा. समजा, डीलर तुमच्या कंपनीचा नसेल तरी प्रश्न नसतो,. आमचा गॅस एच पी, भारत आणि इण्डेन अशा तिन्ही ठिकाणी ट्रान्स्फर होऊन मिळालेला आहे, काही त्रास होत नाही, व्यवस्थित ट्रान्सफर होऊन मिळतो.. सोबत तुम्हाला काही पैसे (डीपॉझीटचे, रेग्युलेटरचे) भरावे लागतील. तिथला डीलर तुम्हाला रेगुलेटर आणि दोन सिलेंडर्स देइल त्याला सिलेन्डर घरी पोचवायला सांगा. किंवा स्वत: घेऊन घरी या. गॅसकनेक्शन सासूबाईंच्याच नावे ठेवा, एवढ्यात कनेक्शनवरचे नाव बदलायला जाऊ नका. पण तुमच्या घरामधे ऑलरेडी एक कनेक्शन असेल तर त्याच पत्त्यावर दुसरे गॅस कनेक्शन ठेवणे हा गुन्हा आहे हे लक्षात असू द्या. हल्ली सेन्ट्रल डेटाबेसमधून अ‍ॅड्रेस क्रॉस चेक केला जातो बहुतेकदा.