आजोबांना बाळूचा विसर पडला. आयर्नच्या गोळ्या खाऊन ते स्वतःला मॅन ऑफ स्टील समजू लागले होते. कुणी कुणी त्यांना उड्डाणं करतानाही पाहीलं होतं. पण त्याच वेळी दुसरे एक आजोबा बाळूच्या संपर्कात होते. त्यांनी बाळूका एक्कावन्न कविता वाचून दाखवायचा संकल्प सोडला होता. बाळूचा नि:स्वार्थी स्वभाव त्यांनी हेरला होता तसंच बाळूचे गुणही. बाळू कविता ऐकून प्रसन्न झाला.
दरम्यान रथकृपेने अनवाणी कृष्ण आजोबा खूप फेमस झाले. त्याचा फायदा होऊन त्यांच्या पक्षाला सत्ता मिळाली. पण ऐनवेळी बाळूप्रबावाने पॉझवाले कवी आजोबा अचानक पीएम झाले. अनवाणी आजोबांच्या लक्षात आलं हा बाळूला विसरल्याचा प्रताप ! अनवाणी आजोबांनी मुकाट्याने कवी मित्राला पाठिंबा देऊन आपली इभ्रत राखली. ऐनवेळी रामाच्या भूमिकेऐवजी त्यांना लक्ष्मणाची भूमिका मिळाली आणि ते अनवासात निघून गेले.
ही परवड इथंच थांबली नाही. वनवासात असताना त्यांच्या पादुका सांभाळना-या भरतासमान मानलेल्या भावाला द्वारकेचं राज्य मिळालं आणि त्याची कीर्ती त्रिखंडात दुमदुमू लागली. सिंहासनावर अनवाणी आजोबांच्या पादुका ठेवल्याने आजोबांना रानावनात काटे टोचत होते. मानलेला बंधू भरत मनोमन पादुकांकडे पाहत मुक्ट्याने राज्य करीत होता. अजोबांना मात्र द्वारका नको होती. त्यांचं लक्ष लागलं होतं हस्तिनापूरच्या गादीकडे. हस्तिनापुरातील १० जनपथ हे निवासस्थान त्यांना खुणावत होते. १० जनपथच्या जुलमी कारभाराला जनता कंआळली होती. आता बदलाची चिन्हे दिसू लागली आणि अचानक वारं हस्तिनापूरकडून द्वारकेकडे वाहू लागलं आणि तिकडचं वारं इकडं येऊ लागलं. काहीतरी अशुभ घडणार हे जाणून आजोबांनी भरताला वनवासात
साथ न देता चपला पळवून राज्य करण्याबद्दल सुनावलं. पण तितक्यात खांडववनात विराजमान असलेल्या भीष्म पितामहांनी त्यांचे कान पिळले आणि भरतालाच गादी मिळेल हे स्पष्ट केलं.
पुन्हा एकदा बाळू शिंत्रेची त्यांना आठवण झाली. एकदा धडा मिळूनही त्यापासून काहीच न शिकल्याबद्दल त्यांनी स्वतःची निर्भत्सना केली.
बाळूच्या या गुणांचा प्रत्यय अशा प्रकारे संपर्कात आलेल्यांना होत होता. त्यात प्रभावशाली व्यक्तीही होत्या. पण बाळूची प्रसिद्धी न करण्याची अट असल्याने कुणी काही बोलत नव्हतं. पण बाळूचा दबदबा वाढत चालला होता.
कॉलेजात एकदा क्रिकेटची टीम सदू शिंदे लीगसाठी पाठवण्याचा विषय उपस्थित झाला. कोच म्हणून कुणाला आणायचं यावर बराच काथ्या कुटून झाला. चंदू बोर्डे, सुरेंद्र भावे, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील अशी मराठी मंडळी आधीपासूनच कुठे न कुठे बिझी होती. ग्रेगरी डिमोण्टे तयार होता पण कॉलेजच नको म्हणालं. राजू भालेकर, संजय मांजरेकर, अतुल बेदाडे, प्रवीण आम्रे अशी मंडळी चालत होती पण त्यांच्या नावाच्या मानाने त्यांचं मानधन फारच वाटत होतं. मानधनाचा चेक पारड्यात टाकला तर दुस-या पारड्यात हे सगळे बसले तरी चेकचं पारडं काही उचललं नसतं असं सर्वांचं मत पडलं. कोचशिवाय टीम पाठवली तर सडकून मार खाणार आणि नाव जाणार हा धोका होता.