Submitted by राजेंद्र देवी on 19 November, 2013 - 23:02
क्षणाचा सहवास
क्षणाचा हा सहवास कायमचा दुरावा
आठवणींचा कैफ कैक रात्री उरावा
निथळत्या रात्रीत पहाटेचा ओलावा
डोळ्यातल्या तुझ्या अबोला बोलावा
मदमस्त नजरेत चंद्र खुलावा
जसा अंगणी पारिजात फुलावा
लडिवाळ केसांचा हळुवार हेलकावा
मनात माझ्या मालकंस झुलावा
आठवणी आठवणीतच मिळावा विसावा
क्षणाचा हा सहवास कायमचा दुरावा
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त क्षणाचा हा सहवास कायमचा
मस्त
क्षणाचा हा सहवास कायमचा दुरावा
आठवणींचा कैफ कैक रात्री उरावा>>>>
धन्यवाद प्रितिभुषणजि...
धन्यवाद प्रितिभुषणजि...