सप्तमस्थान- भाग २(घटस्फोट)

Submitted by Anvita on 19 November, 2013 - 03:59

सप्तमस्थान- भाग २(घटस्फोट)

घटस्फोटाचे योग बघताना मुख्यत्वे सप्तम स्थान , सप्तमेश तसेच विवाहाचा कारक ग्रह शुक्र तसेच येणाऱ्या महादशा या सर्वाचा विचार करावा लागतो .
बर्याच वेळा सप्तमात पापग्रह असणे , सप्तमेश वक्री असून त्याचे पापाग्रहाशी कुयोग असणे इ . कारणे असतात.
बर्याच पत्रिकामध्ये शुक्राचा हर्षल, शनि , मंगल ,नेपचून ह्या ग्रहाशी प्रतियोग , षडाष्टक किंवा केंद्रयोग असतो. तसेच काही वेळेस शुक्र राहू युती पण असते .
कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे घटस्फोट होण्यासाठी महादशा स्वामी बघावा लागतो. तो जर सहा किंवा बारा भावांचा बलवान कार्येश असून तृतीय भावाचा पण कार्येश असेल तर कायदेशीर विवाह विच्छेद म्हणजे ' घटस्फोट ' होतो . जर तृतीय स्थानाशी संबंध आला नाही तर मग बहुतेक वेळा वैवाहिक सौख्य मनासारखे न मिळणे , एकमेकांपासून लांब राहणे इ. गोष्टी होतात .
बऱ्याच वेळा विचार केल्यावर असे वाटते कि आधीच्या काळी पण असे ग्रहयोग लोंकाच्या पत्रिकेत असणार पण त्याकाळी घटस्फोटाचे प्रमाण खूप कमी होते. आत्ता ते खूप वाढले आहे. त्याची बरीच कारणे आहेत जसे कि आधीची पिढी सोशिक होती किंवा तेव्हाची स्त्री शिकलेली नव्हती त्यामुळे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नव्हती इ.
पण प्रश्न असा आहे कि आत्ता सुद्धा बरेच जण घटस्फोट घेऊन सुखी होतात का? आता ते कोणत्या कारणाने घटस्फोट घेत आहेत त्यावर अवलंबून आहे ( काही जनाच्या बाबतीत खरेच लग्न टिकवून ठेवणे हे त्रासदायक असते ) पण नुसते पटत नाही म्हणून घटस्फोट घेणे योग्य आहे का ? विशेषत: मुले असताना .
जास्तीत जास्त जोडीदाराला समजून घेऊन नाते टिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवा .
अर्थात दोघांकडून हे महत्वाचे .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे जर सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी ६,१२ ह्या स्थानाचा बलवान कार्येश असेल व २,७,११ चा पण कार्येश असेल तर मग विवाह होतो पण तो सुखावह होत नाही .

शुक्र - राहू युती मध्ये शुक्र बिघडलेला आहे असे म्हणतात म्हणजे कदाचित विवाह बाह्य संबंध असणे किंवा अनेक affairs असणे . हि शक्यता असते किंवा आंतरजातीय , अंतर धर्मीय विवाह होण्याची पण शक्यता असते. विवाह
ठरताना फसवले जाण्याची शक्यता पण असते.
तसेच राहू ज्या ग्रहाच्या युतीत असतो त्या ग्रहाचे कारकत्व बिघडवतो म्हणजे शुक्र वैवाहिक सौख्याचा ग्रह आहे . शुक्र -राहू युती असेल आणि अजून काही कुयोग असतील तर विवाह सौख्य चांगले लाभणार नाही.

फक्त शुक्र- राहू युती आहे म्हणून कोणी काही conclusions काढू नयेत . कोणतीही गोष्ट बघत पत्रिकेचा बर्याच बाजूने विचार करावा लागतो . कोणत्याही एका ग्रहयोगामुळे चांगले किंवा वाईट फळ मिळते असे नाही तर भाव , भावेश , काराक्ग्रह , महादशा , चंद्रकुंडली
अशा बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो.

जर सप्तम स्थानात वृश्चिकेत शुक्र आणि हर्षल असतील तर?.

पण नुसते पटत नाही म्हणून घटस्फोट घेणे योग्य आहे का ?
>>
एक जुन्या काळातले उदाहरण आहे माझ्या समोर. एक आजी आजोबा आहेत, त्यांचे अजिबात पटत नाही. मुले झाली, त्यांची लग्ने झाली तरीही. मी स्वतः त्यांना क्वचितच एकमेकांशी बोलताना पाहिले आहे(म्हणजे भांडणे, टोमणेबाजी सोडून).
हे दोघे जवळ जवळ विभक्तच राहतात. एका मुलाकडे आई तर दुसर्‍याकडे बाबा!

शुक्र - राहू युती मध्ये कलेची आवड असणे किंवा त्यात प्राविण्य मिळवण्याची पण एक शक्यता असते. - शुक्र व राहु युतीत फिल्मस च्या फोटोग्राफीत निष्णांत असण्याची शक्यता जास्त वाटते. शुक्र - कलेचा कारक आणि राहु छाया ग्रह आहे. पैकी शुक्र पंचमेश असल्यास हा योग जास्त फलदायी होताना दिसेल.

पंचमेश शुक्र राहुसोबत दशमात असल्यास हा व्यवसाय होण्याची शक्यता जास्त आहे.

Astrology is a 7-story palace of cards that is blown away by a tiny fart of doubt!
'Ass-troll-ogre's build palaces of false hope in the air and collect the rent from their gullible customers’ despair! Even if they give FREE-service, life-time is wasted!

अलर्टः तुम्ही विचारलय म्हणून लिहितेय,
हे मी वाचलेल्या एका पुस्तकातून लिहिलेले आहे.
पण हे "प्रमाण" मानु नये. कारण इतर ग्रह कसे व कोणत्या स्थानातून सातव्या स्थानावर बघतात ते हे महत्वाचे.
तेव्हा ढोबळ रित्या सांगायचेच तर,

सप्तमात चंद्र म्हणजे - जोडीदाराचे वर्णन(म्हणजे, स्वभाव वगैरे)
पत्रिकेत सातव्या घरात चंद्र म्हणजे मिळणारा जोडीदार आळशी, थंड, सतत अवलंबून रहणारा( जोडीदारावर), धरसोड वृती(नोकरी, धंदा बाबतीत), मूडी, वैवाहिक सुखात थंडपणा. जोडीदाराच्या पत्रिकेत सुर्य चांगलया स्थानात व प्रभावी असेल तर चांगले नाहितर आळशीपणाचा व थंड वृतीचा कहर. (इति पुस्तकी ज्ञान).

(माझा पत्रिकेवर विश्वास नाही, पण कुतुहलाने म्हणा, असेच वाचलेय. ते हि बर्‍याचदा आजोबांबरोबर भांडायला की ते कसे चुकीचे आहेत. ) Wink