एक चिंतन

Submitted by सखा on 18 November, 2013 - 23:10

अहो स्वप्नांचे काय ती तर फुकटच पडतात
तिथे कधी झिरो इगो माणसं सुध्धा सापडतात

ते वचनांना जाहीर सभेत असे काही उधळतात
मुक्ताफळांचे भाव कांद्यापेक्षाही महागतात

शून्याचा शोध लावलाय एव्हढंच ते घोकतात
इथे पाणी दिवसाआड मंगळावर खोदतात

शिस्तप्रिय असे जगात क्वचितच आढळतात
सिग्नल राखायला पोलीसही का बरं लागतात?

काही मानवांना दोष सदा दुसऱ्यात दिसतात
असली मॉडेल्स देवबाप्पा कुठेशी बनवतात?

-सत्यजित खारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही मानवांना दोष सदा दुसऱ्यात दिसतात
असली मॉडेल्स देवबाप्पा कुठेशी बनवतात?

हाहाहाहा.... Lol

तंत्राचेही पहा जरा. अगदी बाराखडी वाचायची आवश्यकता नाही आहे. कारण, काफिया चुकलेला नाही आहे. इथल्या काही गझला नुसत्या नजरेखालून घातल्यात तरी चालेल......

ही गझल नाही

लय म्हणजे काय ते आधी नीट ध्यानात घ्यावेत असे वाटते खयाल काफिये ह्या समजून घेण्यासाठीच्या नंतरच्या बाबी आहेत
दोनोळ्या असेच मानून वाचल्या मी तरीही आवडल्या नाहीत

सर्वाना धन्यवाद, एखादी गोष्टं आवडणे न आवडणे हे फार सापेक्ष आहे त्या मुळे त्याचा कलाकारांनी फारसा विचार करायचा नसतो.
मात्र रचनेत सुधारणा करण्यासाठी आलेल्या नेमक्या 'सूचनांचे' हार्दिक स्वागत.

'सूचनांचे' हार्दिक स्वागत.<<<< ??? ओक्के असय तर ??? सूचना ला एकेरी अवतरण !!!

कुणाची सूचना ? कसली सूचना ? सूचनांचेच स्वागत ? ओके आता पहाच एकापेक्षा एक सूचना येतील

एक शेर सांगतो ज्यांचा आहे त्यांच्या परवानगी शिवाय सांगतोय त्याबद्दल आधी त्यांची माफी मागतो
शेर समजलाच तर आधी स्वता:त सुधारणा करा गझलेत आपोआप होईल ....

नुकती वसंताने दिली बहरायची परवानगी
इतक्यात जमलाही तुला तोरा फुलाच्यासारखा???

हा एटीटूड बरा नव्हे खारकर !!

वैभवजी,
Attitudde? आपल्या बालिशपणाचे हसू येत आहे. खारकर यांनी 'नेमक्या सूचनांचे' स्वागत केले तर काय चुकले? यंव करा हे वाचा ते पहा पेक्षा उदाहरण दिलं कि लगेच कळतं आणि हो कोण किती पाण्यात आहे हे पण कळते. तुम्हीच "आता बघा कशा सूचना येतात" म्हणून धमक्या देत आहात. एक काम करा तुम्ही खारकर यांच्या बद्दल जरा वाचा मग तुमचं तुम्हालाच कळेल आपण कशी भाषा वापरतो आहोत असो:
खारकर यांचाच एक शेर ऐकवतो:

"सौजन्य दाखवता इथे दुबळे ठरवतात मला
पोंगे पंडितजी काही मनसोक्त हसवतात मला"
शुभेच्छा!

पाश,

तुम्हाला 'लय' म्हणायचे आहे का? होय, लय लागते. मात्र प्रत्येक गज़ल गाता येईल की नाही यात शंका आहे. काही गज़ला इतक्या लांबलचक असतात की त्या फक्त वाचता येतात... गाता येत नाहीत. उदा:

"पालखीत पादुका, जिवंत लोक चालतात, हाल हाल पाहुनी कमाल वाटते.." ही बेफिकीर यांची गज़ल. Happy

सत्यजित, तुम्हाला मात्रा मोजता आल्या तर तुम्ही उत्कृष्ट गज़लकार बनाल यात मला शंका नाही!! Happy

शरदजी आपली गझल बाबतची मते किती चुकीची अहेत !! फार वाईट वाटले धक्का बसला मला
असो

ती पालखीत पादुका ही ओळ गाता /गुणगुणता येते अगदी व्यवस्थीत

वैवकु,

आपला गै.स. होतोय. मी म्हटले होते की गाता येत नाहीत ... म्हणजे चाल लावणे कठिण असते. गुणगुणता येत नाही असे नव्हे. माझ्या वरच्या पोस्ट मध्ये 'वाचता' ऐवजी 'गुणगुणता' म्हणा हवे तर ! Happy

तुम्हाला मात्रा मोजता आल्या तर तुम्ही उत्कृष्ट गज़लकार बनाल यात मला शंका नाही!! <<<<
मी ह्या वाक्याबद्दल बोलत होतो शरदजी अहो एव्हढ्याने जर उत्कृष्ट गझलकार बनता आले तर अजून काय हवे होते किती छान झाले असते
असो
लय पाळली की नॅच्युरली चाल बसतेच बसते हे अगदी नक्की आहे लयीत असलेल्या सर्वच रचना गाता गुणगुणता येतातच आपोआप
आपण उदाहरणादखल दिलेली गझल / ओळ लयीतच आहे व छान चालीत गाता येते