सुनंदालाअस्सा राग आला मैत्रिणीचा, “ ए, नेहमी नेहमी बंगाली बाबू काय म्हणते, सुब्रतो नाही का म्हणता येत!!”
“ओह...असे आहे तर!! आम्हाला काय बाई...एका प्रिय माणसाचे नाव सुब्रतो आहे तर! सॉरी...” असे म्हणत मैत्रिणीने चक्क सुनंदाचा पापा घेतला आणि म्हणाली, “बरे बाई....हा घ्या बंगाली बाबूचा रोशोगुल्ला!!
सुनंदाला त्याही अवस्थेत ‘रोशोगुल्ला’ शब्द ऐकून खुदकन हसू आले! पण तेवढ्या पुरतेच. घरी जाताना तिला अगदी उदास उदास वाटत होते. तिला सारखे वाटत होते, हा असला दिवस उगवलाच का? त्याला तरी मित्राकडे जायलाच पाहिजे होते का? ना ना विचार डोक्यात घेऊन ती घरी पोहोचली आणि डोके दुखतेय म्हणून पडून राहिली. नियती मात्र तिच्या बालिशपणावर हसत होती. ह्या अनुभवशून्य मुलीला जगाच्या दु:खाची अजून कल्पनाच नाही.
रामप्रसाद्च्या घरी सुब्रतो पण गप्प गप्प बसला होता. सुचित्राने चहा आणून ठेवला आणि तिथेच एका सोफ्यावर ती बसली.“कश्याचाआजएवढा विचार चालू आहे...म्हणून बोलायचे पण विसरलात? की आज एका माणसाची गाठभेट झाली नाही म्हणून उदासी छायी है?”
“काय वहिनी तुम्ही पण!! काहीतरीच काय?”
“माझ्या लक्षात आले नाही असे समजू नका महाशय!! त्या दिवशी सिनेमा सुटल्यावर टाटा केलेले मी पाहिलेय! काय ते खरेखरे सांगून टाका बरे!! मनात ठेवू नका.”
सुब्रतोने शेवटी सगळे कसे घडत गेले ते सांगितले आणि आता मात्र प्रेमात पडल्याची कबुली पण दिली.
रामप्रसाद म्हणाला, “ बाकी सर्व ठीक आहे, पण एक अडचण आहे. तू बंगाली, ती मराठी....कसं जमायचं? घरच्यांची संमती मिळेल का?”
आता मात्र सुब्रतो गंभीर झाला. हि गोष्ट आत्तापर्यंत त्याच्या ध्यानात पण आली नव्हती.प्रेमाचे हे असेच असत्ते. त्याला कोणतीही बंधने मान्य नाहीत. प्रेमाची देवता दोन जीवांना एकत्र आणून ठेवते, दोघांच्या मनात प्रेमाचे बीज रुजवून स्वतः निघून जाते!! पुढचे तुमचे तुम्ही बघून घ्या! प्रेमी जीव हे सागरात गटांगळ्या खातच असतात. काहींना किनारा सापडतो, बाकीच्यांचे काय होते ही माहिती जगाला कळतेच असे नाही!
सुब्रतो lodge वर अस्वस्थपणे परत आला.आज सुनंदाला आपण भेटलो नाही ह्यापेक्षा वेगळ्याच मुद्द्यावर त्याचे विचारचक्र सुरु झाले. ‘मी बंगाली...सुनंदा मराठी...मी बंगालचा, सुनंदा महाराष्ट्राची..!!
....क्रमशः
फिनिक्स पान (०६)
Submitted by पशुपति on 18 November, 2013 - 08:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा