मनस्वी पीर

Submitted by सखा on 17 November, 2013 - 20:45

सौजन्य दाखवताच इथे दुबळे ठरवतात मला
येथे पोंगे पंडीत काही मनसोक्त हसवतात मला

गात धून आपुलीच मनस्वी पीर निघूनी गेला
जिंकले लाख किताब पण ते स्वर हरवतात मला

जिगर ही अशी की झरे फुटावे खड्या फत्तराला
कथा शूर शिवरायाच्या आजही रमवतात मला

कोण म्हणाले उगाच जिभ लावू नये टाळ्याला
या सत्य असत्याच्या धूसर सीमा फसवतात मला

असले कसले कायदे? आम्ही सांगा तुम्ही बदला
झोपलेले न्यायाधीश दोषीच ठरवतात मला

-सत्यजित खारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद पुलेशु,
तिसऱ्या बद्दल माझ्या लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद. मावळ्यांचा जिगरबाजपण अधिक स्पष्ट करण्यासाठी बघतो काही दुरुस्ती करता येईल का.