दवांत आलीस भल्या पहाटी (विडंबन)

Submitted by सुशांत खुरसाले on 15 November, 2013 - 10:16

दवांत आलीस भल्या पहाटी (विडंबन)

घरात आलीस भल्या दुपारी
सूर्याच्या तोर्यात एकदा
जवळुनि गेलीस पेरित अपुल्या
गरम डोक्यामधला लाव्हा

अडलिस आणिक पुढे जराशी
धांगडधिंगा ,केले त्रागे
वळून असे पाहिले जहरी की
मीच सरकलो मागे मागे

लक्ष्य मीच अन् मीच पिपासा
दिला लाटण्यानेच इशारा
डोळ्यांमधल्या त्या रागाचा
कितीक चढला बघ ना पारा

मारशील तू आता म्हणुनी
कशास ओळख द्यावी सांग
कसे जुगारी वर्तन करशी
पिऊन आलीस का तू भांग ?

तळहाताच्या जहरी रेषा
गालावर माझ्या उमटाव्या
तांबुस,मळक्या नखातुनी तू
मम अंगी ओरखड्या घ्याव्या

घरात येता भल्या दुपारी
अब्रूच्या चिंध्याच कर सदा
सदा करावा तू नेमाने
मला बदडणे हाच धंदा !

--सुशांत खुरसाले
=====================

मूळ कविता :-
दवांत आलीस भल्या पहाटे -
बा सी मर्ढेकर

(मर्ढेकरांची माफी मागून)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रयत्न चांगला आहे, विडंबनात आणखी मजा यायला हवी होती. .... वैम.

----------------------------------------------------------------------------------------------------------
मूळ कविता पोस्ट करणे हे प्रताधिकाराच्या दृष्टीकोनातून कितपत योग्य आहे याबाबत कृपया मायबोली-ऍडमिन
यांचा सल्ला घेणे आवश्यक वाटते.
प्रताधिकाराबाबत माबो-प्रशासन सतर्क असते असा आजवरचा अनुभव आहे.

धन्यवाद माशा आणि उकाका ...

मी मागील एका जुन्या विडंबनात मूळ कविता देताना पाहिलं होतं . त्यामुळे येथे दिली .असो. अधिक माहिती विचारतो .

धन्यवाद माशा आणि उकाका ...

मी मागील एका जुन्या विडंबनात मूळ कविता देताना पाहिलं होतं . त्यामुळे येथे दिली .असो. अधिक माहिती विचारतो .

प्रताधिकाराच्या कायद्यात (किंवा कुठल्याही कायद्यात) 'हेतु' महत्वाचा असतो. म्हणूनच प्रताधिकाराच्या कायद्यात सोय आहे की जर 'रिसर्च साठी' किवा 'शिकविण्यासाठी' मूळ कलाकृती सादर केली तर त्याला प्रताधिकार लागू होत नाही. इथे 'विडंबन' या गोष्टीत वर नमूद केलेल्या दोन्ही गोष्टी येतात. त्यामुळे - मूळ लेखकाच्या नावासह वर सादर केलेल्या कलाकृतीला प्रताधिकार लागू होत नाही.

धन्यवाद शरदजी, मी सुध्दा वाचकांना कोरिलेट करून बघता यावं , जेणेकरून अधिक समजेल, या दृष्टीनं मूळ कविता दिली होती .:) असो ..

Sharad,
Tumchi mahiti chukichi aahe. Ithe mool kavita dena ha pratadhikaracha bhanga aahe.

चिनुक्स,

भारतीय कॉपीराईट अ‍ॅक्ट असे म्हणतो:--

"52. Certain acts not to be infringement of copyright. -(1) The following acts shall not constitute
an infringement of copyright, namely:

(a) a fair dealing with a literary, dramatic, musical or artistic work 104[not being a computer
programme] for the purposes of-

(i) private or personal use, including research;

(ii) criticism or review, whether of that work or of any other work; "

विडम्बन करणे हे या क्लॉजखाली कॉपीराईट कायद्याचा भंग करत नाही असे मला वाटते.

शेवटी निर्णय अ‍ॅडमिन चा आहे.

सुशांत, कृपया अ‍ॅडमिनला विचारावे.

सुशांत, प्रताधिकार भंग न होण्याविषयी दुसरी एक गोष्ट करता येईल. मूळ कविता आंतरजालावर कुठे ना कुठे तरी असेलच. त्याची लिंक द्या म्हणजे झाले.