फिनिक्स-पान०२

Submitted by पशुपति on 13 November, 2013 - 23:25

हाउसवाईफचा इंग्लिश डिकशनरी अर्थ काय असेल तो असेल, पण मराठीतमात्र नोकरी न करणारीबायको हाच अर्थ प्रचलित आहे.
माधवराव पेपर वाचत डूलकी घेत होते. आई मात्र ह्या दोघांचे संभाषण ऐकत आपल्याला पण भाग घेता येईल का ह्या विचारातएखादा धागा पकडण्याच्या बेतात होती.तेवढ्यात सुब्रतोने तो गुंता सोडवला. “आप मांजी, ताश खेलना पसंद करेंगी?” आंधळा मागतो एक डोळा,.... आणि तिघेही मग पुणे येईपर्यंत पत्ते खेळत बसले.सुब्रतो तात्पुरता एका लॉज मधे उतरला आणि माधवराव रिक्षात बसून आपल्या बायको-मुलीसह कोथरुडच्या त्यांच्या घरी गेले.
दुसऱ्या दिवशी सुब्रतो दास ऑटो मधे रुजू झाला.दुपारी कॅन्टीन मधे जेवत असताना कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मागे वळून पाहतो तर काय...त्याचा मित्र रामप्रसाद!! दोन-तीन वर्षांनी तो सुब्रतोला सिनीअर होता. पण त्या दोघांचे छान जमत होते.
“अरे, तू...!!” सुब्रतोआश्चर्याने पाहत म्हणाला.
“आणि तू इकडे कसा??” रामप्रसाद म्हणाला.
दोघांनाही एकमेकांना भेटल्याचा खूप आनंद झाला.सुब्रतोलाथोडा जास्तच...’कोणीतरी आपलं भेटलं!’ संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर रामप्रसाद सुब्रतोला आपल्या घरी घेऊन गेला. तीन खोल्यांचा छानसे घर. पुरेसे फर्निचर. लग्न पण झालेले. आणखी काय पाहिजे माणसाला??? सुब्रतोला सर्व स्वप्नमय वाटत होते. रामप्रसादने त्याची मनस्थिती ओळखून बोलायला सुरुवात केली.
“तुला तर माहित आहेच की इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतानाच माझे वडील गेले. परीक्षेतही लक्ष लागले नाही. पण कसाबसा सुटलो. जॉब लागला पण मनासारखा नव्हता. मग कोलकत्ता सोडले आणि अलाहाबादला आलो. तिथेही तसेच! तीनोकरी पण सोडली आणि पुन्हा कोलकत्त्याला परत गेलो. ह्या दरम्यान आईने लग्नाचा विषय सुरु केला. मी पण फारसा विचार न करता लग्न केले. नंतर दोनच महिन्यात पुण्यात ह्या कंपनीत ऑफर आली.म्हणले बघावे तरी नशीब!! पण इथे मात्र एकंदरीत छानच आहे. स्वतःचे घर आहे. बायको पण चांगली आहे. आई पण बहुतेक पुढच्या महिन्यात इथेच येईल. सध्या ती ट्रीप-कम यात्रेला गेली आहे. माझीही कथा अशी आहे. तुम बताओ यार कुछ! तुझी चित्रकला तुझ्याजवळ आहे की गेली सोडून??? कॉलेजमधे चित्रकलेच्या स्पर्धेत बरीच बक्षिसे मिळवलीत म्हणे!!”
तेवढ्यात रामप्रसाद्च्या बायकोने, सुचित्राने, चहा बिस्किटे ठेवली.चहाचे घुटके घेत सुब्रतो बोलता झाला.

.......क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users