फिनिक्स

Submitted by पशुपति on 13 November, 2013 - 10:11

फिनिक्स
सुब्रतो चक्रवर्ती.......कोलकत्त्याहून इंजिनियरिंग पास झाला व ताबडतोब पुण्यात एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीत नोकरी
मिळाली. “दास ऑटो “ही मुळची कोलकत्त्याची एक मोठी ऑटोपार्ट तयार करणारी कंपनी. पुण्यात पण त्यांचे एक युनिट
आहे. तिकडेच कामावर रुजू व्हायला सुब्रतो पुण्याला यायला निघाला होता. गाडीत बसल्या बसल्या त्याचे विचार सुरु झाले
होते. ‘ आत्तापर्यंत सर्व आयुष्य कोलकत्यात गेलेले......एक महानगर ......नुसतेच महानगर नाहीतर महासागर म्हणावे
लागेल. कसे असेल बरे पुणे ?.......कोलकत्त्या एवढे गजबजलेले असेल ? का एखादे छोटेखानी शहर असेल.......? छे....?
काहिच कल्पना येत नाही. बघू......पोचल्यावर. नोकरीतर करायची आहेच.’ हा सर्व विचार डोक्यात असताना मधेच त्याचा
डोळा लागला आणि जाग आली ती गाडी भुसावळला थांबल्यावरच. खाली उतरून चहा वगैरे तरी घ्यावा असा विचार करून
प्लेटफॉर्मवर उतरला, स्टेशनवर त्याला भरपूर बदल जाणवला. ‘ हे काय......बंगाली तर कुणीच बोलत नाही, म्हणजे आता
आपल्याला मराठी भाषा शिकावी लागणार. ‘ चहा बिस्किटं खाऊन तो गाडीत चढला व आपल्या जागेवर येऊन बसला.
त्याच्या कम्पार्टमेंट मधे आधीच एक कुटुंब येऊन बसले होते. नवरा बायको आणि त्यांची एक तरुण मुलगी. बहुधा
दाखवण्याचा कार्यक्रम उरकून परतत असावेत. गाडी सुरु झाली. आणि हळू हळू एकमेकांची ओळख वाढवण्याचा प्रयत्न
सुरु झाला. वेळ तर जायला पाहिजे ना!!!!! बोलण्याच्या ओघात सुब्रातोला समजले कि मंडळी पुण्याचीच आहेत. त्या
कुटुंबियांना पण समजले कि सुब्रतो इंजिनियर आहे. कोलकत्त्याचा आहे. अवांतर गप्पा सुरु झाल्या. सगळे पुण्यालाच
चालले आहेत.
सुब्रतोने त्या तरुणीला उद्देशून विचारले, “आपले नाव काय? इतका वेळ झाला तुम्ही एकही शब्द बोलला नाहीत!”
ती उत्तरली, “सुनंदा! पुण्याला काही कामानिमित्त निघालात वाटते?” सुब्रतो,
“छे! मी आता कायमचाच पुणेकर होणार आहे! कोलकत्त्याच्या दास ऑटोची एक शाखा पुण्यात आहे, त्यात मी सेक्शन इंजिनीअर म्हणून जॉब स्विकारला आहे. आणि परवा जॉईन व्हायचे आहे. आपण काय करता? आणि हे आपले आई-वडील का?” “मी.... ना....” ती उत्तरली, “ बी. एस्सी. आहे. आणि घरापासून जवळच एका लहानश्या ऑफिसमधे क्लार्क आहे. हे माझे वडील माधवराव. राज ऑटोमधे सेल्स मेनेजर आहेत. आणि ही माझी आई. हाउसवाईफ आहे.”

क्रमशः........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थंक्स फोर द कॉमेंट.....पण अजून मला मायबोलीच्या विविध गोष्टी नीट वापरता येत नाहीत. त्याबद्दल
सॉरी....ही गोष आता कवितेतच संपवावी लागणार......