कालिदासाच्या काळात फेसबुक असतं तर ...?

Submitted by सुशांत खुरसाले on 13 November, 2013 - 08:17

कालिदासाच्या काळात फेसबुक असतं तर ...?

तर काय..
तो ही बसला असता दिवसभर 'ऑनलाईन' तुमच्या -आमच्या कवींसारखा !!

त्याचं एक -एक महाकाव्य फेसबुकवर पोस्ट करता करता त्याची हयात गेली असती ..

आणि त्याच्यावरच्या लाईक अन् कमेंटांचे हिशोब करता करता त्याचे केस पांढरे झाले असते !

आणि 'मेघदूत..'
'मेघदूत' लिहायचा विचार कॅन्सलच केला असता त्यानं..!

त्याऐवजी 'फेसबुकदूत' लिहिणं पसंत केलं असतं त्यानं !!

कालिदासानं त्या शापीत गंधर्वाच्या प्रियेच्या प्रोफाईलची रसभरीत वर्णने केली असती ..'जिची प्रोफाईल सुंदर-सुबक फोटोंनी सजली आहे, जिच्या प्रत्येक फोटोवर कमस-कम शंभर लाईक येतात आणि जी दिवसभर ऑनलाईन असते'

आणि त्या महाकाव्यातला शापीत गंधर्व आपल्या प्रियतमेशी ऑनलाईन चॅट करताना म्हणाला असता ,"विरहात व्याकुळ-बिकुळ व्हायचं नाही,प्रिये !आत्ता येतो मी !तोपर्यंत तुझ्यासाठी पोस्ट केलेली खमंग कविता वाच !!"

खरंच कालिदासाच्या काळात फेसबुक असतं तर ....???

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users