घरात बाग करायची आहे

Submitted by वेल on 13 November, 2013 - 06:02

मी मुंबईत - बोरिवली पश्चिमेला राहाते. इमारतीत, पाचव्या मजल्यावर. गॅलरी नाही. छोटासे तीन फ्लॉवर बेड आहे ९ फूट बाय दीड फूट. ऊन येईलच याची गॅरण्टी नाही. दोन फ्लॉवर बेडचा अक्सेस घ्ययला तीन फुटाची भिंत आहे. इमारतीला अकराव्या मजल्यावर गच्ची आहे आणि खाली छोटी बाग आहे. सोसायटीने बागेत सध्या तगर लावली आहे. इमारतीच्या मागे मोठी मोठी आठ दहा झाडं आहेत, कडूनिंब, चिंच आणि मला वाटतं रेन ट्री आहे. त्या झाडांवर खारी, पोपट, साळुंक्या आणि कावळे असतात. त्यामागे मुसलमान लोकांची दफन्भूमी आहे. त्या मोठ्या मोठ्या झाडांजवळ मी कोरफड लावली होती, पण ती मरून गेली, कधी कशी मला कळलेही नाही.

मला स्वत:ला बागकामाचा काहीही अनुभव नाही. आवड आहे का नाही तेही माहित नाही. पण असं वाटत राहावं स्वत:ची भाज्यांची, फळांची बाग असावी. जेवणात स्वतःच्या बागेतल्या मिरच्या, टॉमेटो, वांगी, कोथिंबीर, कढीपत्ता, मेथी एवढ्या तरी भाज्या असाव्यात असे वाटते. आई तिच्या घरच्या बागेत झाडं लावली आहेत पण तिच्याच्याने देखभाल फारशी होत नाही (असे मला वाटते, म्हणजे वरचे वर माती खुरपणे, झादे छाटणे इ.)

घरी कुंड्या आणि माती आणली आहे, परंतु काय करावे कसे करावे सुचत नाही. एक छोटे लिंबाचे झाड येते आहे कुण्डीत. माझ्या घरात तुळस अज्जिब्बात टिकत नाही. आसाबांनी लावून पाहिली मी लावून पाहिली, अनेक वेळा लावून पाहिली. आई म्हणते, तिला "त्या" दिवसातला वारा लागतो आणि मागे स्मशानभूमी आहे म्हणून,पण मला ते पटत नाही. आता मी माझी छोटीशी बाग कशी बनवू? कुठल्या झाडापासून सुरुवात करू.

इमारतीच्या कम्पाउण्ड मध्ये मला वासाची मोठी होणारी झाडं लावायची आहेत, उदा. बकुळ किंवा मिडियम साईजची राहतील अशी रातराणी किंवा जुई चालतील. ती कशी लावायची? बियाणे कुठे मिळेल? नारळ आंबा लावता येतील का?

अनुभवी हुषार लोकांनी मला मदत करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी टोमाटोची रोपं खूप मोठी झाली, खूप फुलं आली आणि टोमाटो मात्र एकच आला. अजुनही खूप फुलं आहेत पण फळ नाही येत. जाऊदे एकतरी आला म्हणायचं. मी अशाच बिया टाकून ठेवलेल्या, घरी टोमाटो आणते त्याच्या.

टोमॅटोवर मावा पडतो ह्या दिवसात. मी पाणी मारून त्यांना काढून टाकायचे, सुरवातीला ही पद्धत कामी येते.

मी थोडं गोमुत्र जास्त पाणी मिक्स करून मारलेलं, सर्व रोपांवर मधे. मिरचीच्या पानांवर पण काळे पांढरे काहीतरी दिसत होतं, टोमाटोवर पण. काही पाने काढली.

गुगल इनपुट टूल्स वरून tomato देवनागरीत नीट नाही लिहिता येत.

टॉमेटो अगदी ग्रीडी असतात. भरपूर उन, भरपूर पाणी पण नीट निचरा होणारी माती आणि ऑर्गॅनिक मॅटर जास्त असणारी माती लागते.
तुम्हाला मिळत असल्यास कॉम्पोस्ट / सी वीड पावडर किंवा एक्स्ट्रॅक्ट घाला थोडं थोडं त्याच्या मुळाशी.
पाणी देताना पानांवर पडू देऊ नका.

आमच्या इथे जुलै -ऑगस्ट ऐन उन्हाळ्याचे महिने असतात. तेंव्हा एकदम बंपर पीक येतं - दिवसाचे बारा तासांपेक्षा जास्त उजेड असतो आणि तापमान ३०डि फॅ च्या वरच असतं .

मनिम्याउ , हाउ क्यूट .

माझ्या मिरचीला , २ च मिरच्या लागल्यात . कारल्याला नुसतीच फुलं येतात सध्या आणि टॉमेटो च रोप तिसर्यान्दा लावलयं .
पहिलं चांगल फूटभर उन्च झाल होतं , भरपूर फुलं यायची मग एक्दम वाढच खुंटली . मग काढून टाकलं .
दूसरं लहान असतानाच सुकुन गेलं . आता तिसरं बघूया काय दिवे लावतय्ते .
आलं मात्र फोफावलंय. आता कधी तयार होतयं अस झालाय मला . सारखे नविन नविन कोंब येतायेत Happy

अजुनही मिरची येत नाही. फुल बरीच येतात. गळुन जातात. कळ्याही आहेत. इथे हॅन्ड पोलिनेशन लिहिलंय ते कसं करायचं? म्हणजे नर फुल मादी फुल कसं कळतं?

हॅन्ड पॉलिनेशनसाठी एक चित्र रंगवायचा ब्रश घ्या. तो प्रत्येक फुलांच्या परागकणांमधून फिरवा.

बाकीच्या गोष्टी पण तपासून पहा. मिरचीला भरपूर सूर्यप्रकाश लागतो. पाणी पण मॉडरेट चालते.

हँड पोलीनेशन

नर व मादी फुलांची डोकी एकमेकांवर हलके भिडवा
ते पूर्वी सिनेमात गाण्यात शॉट असायचा तसे

भारतीय चेरी म्हणतात ती सहज इकडे तिकडे रस्त्याकडे, भिंतीकडे आपोआप वाढतात. ( त्यांचा प्रसार वटवाघळं करतात.) ठाणे जिल्ह्यातले तापमान चालते. तेच छोटे झाड बाल्कनीत नक्की वाढेल. पण . . . . खरं चेरी झाड वाढण्याचं तापमान भारतात सर्वच शहरांत नसेल.

खूप दिवस बाहेर जाणार तर झाड कसे जगणार ?

मी साधी युक्ती केली

एक लिटर च्या बाटलीत पाणी ओतून त्यात बुटाची कॉटन लेस बुडवली व त्याचे दुसरे टोक झाडाजवळ मातीत पुरले

चार दिवसांनी गेलो तर झाड टवटवीत आहे

gandhi land.jpg

आता पाण्यावर भाज्या उगवणार आहे

जाळीदार भांडे , ते आत थोडे वर बसेल असे दुसरे भांडे घेऊन त्यात पाणी टाकणे व वरच्या जाळीदार भांड्यात मेथी , मोहरी , गहू , हरभरे लावून उगवता येतात , असे आठ दहा पॉट करून ठेवले की मिश्र भाजी किंवा सॅलड करता येते

पहिला प्रयोग गव्हावर केला , तीन दिवसात हिरवे कोंब आलेत.

अशी एकात एक बसू शकतील व जाळीचे , दुसरे पाणी ठेवण्यासाठी इ भांडी मिळवणे हाच पहिला टप्पा अवघड असतो .

बाहेरचे भांडे अगदीच लहान असू नये , त्यात भरपूर पाणी बसावे , पाणी फारच कमी बसले तर ते गरम होते व बिया रुजत नाहीत .

पाणी 1,2 दिवसांनी बदलावे

Society Notice : Water missuse पाण्याचा गैरवापर

गॅल्यारी मध्ये ठेवलेल्या झाडांना पाणी आणि त्या मुळे होत असलेल्या लाल मातीचा पाणी या साठी फ्लॅटच्या गॅल्याऱ्या धुवणाया साठी सरास पाण्याचा गैरवापर होत आहे.जर पाण्याचा असाचा वापर दिसून आल्यास बिल्डर कडून पाणी सोडण्या साठी ठरावीक टाईम नीचित केला जाईल.

याची सर्व फ्लॅट धारकांने नोंद घ्यावी.

समाप्त
Proud

मी लावलेल्या रोपांवर काही दिवसांनी कापसासारखं काही तरी दिसायला लागतं.हा मावा नसावा. ही कीडच असावी पण उपाय काय करावा ?
माझी अबोली , गोकर्ण , भोपळ्याचा वेल अशी चांगली बहरणारी बरीच रोपं काढून टाकायला लागली. .

खूप दिवस बाहेर जाणार तर झाड कसे जगणार ?
जमिनीपासून एक फुटावर झाड कापून टाकायचे आणि पाणी द्यायचे. कापलेल्या झाडाचा पाला पाचोळा बुडाशी पसरून ठेवायचा. पाण्याची वाफ होऊन ते लवकर उडत नाही.
--------------------------------
रोपांवर काही दिवसांनी कापसासारखं काही तरी दिसायला लागतं. . . . रोपं काढून टाकायला लागली. .
अबोली , गोकर्ण एक फुटावर कापून टाका ( छाटत राहा). हा पांढुरक्या रोग ऑक्टोबर ते फेब्रुवारी जोरावर असतो. संपूर्ण झाड काढू नका. मार्च नंतरची पालवी निकोप येईल.
भोपळ्याचा वेल काढून टाकणे ठीक आहे. तो मार्चमध्ये बिया लावून वाढवा. उन्हाळी पीक घ्या.

मी लावलेल्या रोपांवर काही दिवसांनी कापसासारखं काही तरी दिसायला लागतं.>>
अबोली, गोकर्ण सारखी झाडं छाटल्यावर पुन्हा छान वाढतात. त्यामुळे काळजी करू नका.

Pages