हॉट ग्लू गन पुण्यात कुठे मिळेल?

Submitted by रंगासेठ on 12 November, 2013 - 02:40

कलाकृती करताना तसेच काही चिटकवताना फेवीस्टिक वापरण्यापेक्षा हॉट ग्लू गन वापरणे सोपं व किफायतशीर आहे असं वाटतयं.
१) अशी ग्लू गन व ग्लू स्टिक्स पुण्यात कुठे मिळेल?
२) यात पण श्रेणी असतीलच तर कुठल्या कंपनीची गन चांगली?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉबी आयडिया मध्ये मिळते. आणि त्यामुळे ती चांगल्या प्रतीचीही असेल. त्याकरता लागणार्‍या ड्राय ग्लु स्टीक्सही तिथे असतात.

हो मामी..
मुंबई मधे.. मॉल मधे हॉबी आयडीयाज च्या दुकानात मिळतात.. गन पण नी स्टीक्स पण..
रंगासेठ...
मुंबईत चक्कर होत नाही का..?....:)

मुंबईत चक्कर नाही होत कधीच. पण पुण्यात, हॉबी आयडीयाज, 'फिनिक्स' मध्ये आहे असं कळालं नेटवर. तिथे चक्कर टाकतो.

एव्हाना मिळाली नसेल तर व्हिनसमधे चक्कर टाका. तिथे नाही मिळाली तर फ्लिपकार्टवर बघा. कालच पाह्यलीये फ्लिपकार्टवर.

<< एव्हाना मिळाली नसेल तर व्हिनसमधे चक्कर टाका. >> कोथरूडच्या 'व्हिनस'मधून माझ्या मुलीने आणल्याचं निश्चित आठवतं.

<< व्हिनस कोथरूडला पण झालं?>> हो. आधीं कर्वेंच्या पुतळ्यासमोर 'महाराष्ट्र बँक' आहे त्या बिल्डीगमधे होतं व नंतर बाजूच्याच जागेत गेलं. अर्थात, आपटे रोडला आहे तेवढी तिथं जागा मोठी नाहीय. [ही माहिती वर्षापूर्वीची ]