मुळव्याधीच्या उपचारांसाठी पुण्यातील चांगले डॉक्टर सुचवा.

Submitted by इदं न मम on 12 November, 2013 - 01:54

हॅलो,
मुळव्याधीच्या उपचारांसाठी पुण्यातील चांगले खात्रीशीर डॉक्टर/ हॉस्पीटल सुचवा
स्त्री डॉक्टर असेल तर उत्तमच
सर्जरी करायची असल्यास साधारणतः किती खर्च येइल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेक्कनवरचे साठे हॉस्पीटल चांगले आहे. माझ्या आईची शस्त्रक्रिया तिथे झाली होती. अजिबात त्रास झाला नाही. आणि आता परत कधीच तो त्रास झाला नाही.

धन्यवा शोभा, मृनिश
मला माझ्या मुलाच्या जन्मापासुन हा त्रास होता. जवळजवळ १५ वर्ष हे आयुर्वेदीक उपचार आणि आहारातील बदल असं करुन अंगावर दुखणं काढलं. कारण एकच, डॉक्टरकडे जायला मन धजावत नव्हतं. ऑपरेशन करुन पुन्हा कोंब उद्भवतात असं ऐकलं होतं. लेझर किरणांनी जाळुन टाकतात, हाही उपचार ऐकला होता. पण तो खर्चिक असल्याचं कळलं.
शेवटी नाही हो म्हणता म्हणता, ४ वर्षांपुवी औरंगाबादेत जाउन दॉ. ढमढेरेंकडे इंजेक्शन थेरपी केली.तोपर्यंत या इंजेक्शनचे काहीच डीटेल्स माहित नव्हते. त्याने चांगला फरक पडला. आतापर्यंत अजिबात त्रास नव्हता. पण गेल्या महिन्यापासुन परत त्रास सुरु झालाय. खुप ब्लिडींग होत आहे Sad म्हणुन पुन्हा इंजेक्शन थेरपीचा विचार केला होता.
परंतु नुकतच कळलं की ते स्टीरॉईडचं इंजेक्शन आहे. स्टीरॉईडच्या अतिरेकाने त्रास होत असतो ना? कि एक्-दोनदा घेउनही??
प्लीज कुणीतरी यावर प्रकाश टाका.

सर्जनला जाऊन सांगा..

जहाँ से तुम मोड़ मूड गये थे, ये मोड़ अब भी वही पड़े हैं

मूळव्याधीचे म्पोड घालवायला त्यात इन्जेक्शन देऊन / लेजरने त्या क्लोज करतात. पण कधी कधी ते पुन्हा काही काळाने येऊ शकतात.

मी युट्युब वरुन पाहिलेला उ पाय :::

" एका वाटीत हळद आणि मोहरीचे तेल मिक्स करावे ते एका चमच्यात थोडे घेउन हलकेच गरम करावे [गॅस वर]
मग ते कापसावर ठेउन मूळव्याधीचे जागी ठेउन द्यावे "
for best result change the cotton for every 2 hours ,do it for 2 days
मी माझ्या नवर्यावर हा उपाय केलाय आणि फरक चांगला पडलाय

काही टिप्स
१> शक्यतो २ दिवस बैठे काम करावे कापुस पडु न ये म्हणुन
२> आतले कपडे जुने वापरावे [हळदीचे डा ग पडायची शक्यता आहे
३> भरपुर पाणी प्या
फरक
१> खाज येत नाही
२> रक्त पडणे हळु हळु कमी होते
३> मोड हलु हळु कमी होतो

इदं न मम, आमच्या एका कलीगने सांगितल्यावर मी भानुविलास टॉकीजच्या जवळ एक दाक्षिणात्य ब्राम्हण बाई लोण्यातुन औषध देतात त्यांची ट्रीटमेंट घेतली होती. त्यानंतर इतकी वर्ष काहीच त्रास नव्हता.
नुकतच खाण्यात हिरवी मिरची, बाजरीची भाकरी, मटकी, चवळी आणि मसालेदार पदार्थ जास्त आल्याने मला परत त्रास सुरु झालाय.
मी आताच धुळ्याला जावुन दोन डॉक्टरांना दाखवुन आले. दोघांच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. दोघांनीही ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असं सांगितलय. धुळ्यातले एम. डी. (सर्जरी) डॉक्टर डॉ. देशमुख म्हणतात 'क्षारसुत्र पद्धत' खात्रीशीर आहे. खर्च १८ ते २०,०००/-रु. त्याने मुळापासुन कोंब काढले जातात तर डॉ. माधुरी बाफना यांच्या मते इन्फ्रारेड कोअ‍ॅग्युलेशन/ लेझर किरणांनी कोंब जळतात आणि कायमचा उपाय होतो. खर्च १६-१७,०००/-रु. दोघेही ज्याची त्याची पद्धत श्रेष्ठ असं म्हणत आहेत. मला कन्फ्युजन आहे.

मायबोलीवरील डॉक्टरांनी मदत करा प्लिज!

अ‍ॅक्युप्रेशर थेरपी मध्ये याचा उपाय आहे असे ऐकले आहे. मी स्वतः माझ्या कामवाली बाईवरती हा प्रयोग केलेला आहे. कदाचित तिला होणारा त्रास हा प्राथमिक स्वरुपातला असेल माहिती नाही पण त्यानंतर तिने ही तक्रार केली नाही. तिखटजाळ भाज्या खाण्यात असतात तिच्या.

आपल्या डाव्या हाताचा पंजा पूर्ण उघडायचा. तर्जनी आणि अंगठा यांमधून निघणारी जी रेषा आहे (आयुष्यरेषा म्हणत असावेत) ती खालपर्यंत जाऊन जिथे टेकते तिथे त्याच्या आतल्या बाजूला म्हणजे अंगठ्याकडच्या बाजूला दाब दिल्यास वेदना होतील. त्याच बिंदूवर उपचार करायचा आहे. त्या प्रेशरपॉईंट्वर दोन मिनीटे दाब द्यावा. असा दोन्ही हातांच्या बिंदूवर उपचार करावा तसेच तळपायावरही आपला टाचेकडचा जो भाग आहे तिथे दाबले तर दुखत असल्याचे आढळेल. तेथेही हा उपचार करावा. कोमट पाणी प्यावे.

हा सोपा उपचार आजपासूनच करायला सुरुवात करावी. पण फक्त दिवसातून तीनदाच Happy

स्वानुभव सान्गतो ... टब मध्ये गरम पाणि करून त्यात थोडे देत्तोल घाला व मग १० मिन्टे बसा ...मग कैलाश जीवन लावा..

तिखट खाण्यामुळे मूळव्याध होते हे म्हणणे पूर्ण चुकीचे आहे.मात्र ज्यांना ही व्याधी झाली आहे आशा व्यक्तींना तिखट खाल्ले की त्याजागी आग होते,दाह सुरू होतो,म्हणजेच मूळव्याधीचा परिणाम जाणवतो. तिखट खाणे हे मूळव्याध होण्याचे कारण नव्हे .
आयुष्यात कधीही अजिबात तिखट न खाल्लेल्यांनासुद्धा मूळव्याध झाल्याची असंख्य उदाहरणे मला माहिती आहेत.

धन्यवाद प्रितीभुषण . मी सुधा ह्या त्रासाने सध्या हैराण झाले आहे . healing hands क्लिनिक मधून औषध आणलंय . पण experience चांगला नाहीये . २-३ दिवस फक्त लिक्विड डायट वर रहाणार आहे .
नवी पेठेत डॉ बद्वेंचा दवाखाना नक्की कुठे आहे ? सांगा न प्लीज . जवळची खुण वगेरे

सारिका,सकाळी अनुश्या पोटी (काहीही न खाता) २ चमचे कैलास जीवनात थोडी खडीसाखर घालून ते खावे व त्यावर कोमट पाणी प्यावे. असं २१ दिवस खाल्ल्यावर हमखास गुण येतो, असं हा अनुभव घेतलेल्यांनी सांगितले आहे. त्यांनी ज्यांना ज्यांना सांगितले त्यांना ही चांगला अनुभव आहे . करून पहा.

स्वानभावरुन सांगतो की मी ते ऑपरेशन टाळले.

१)रोज जेवणात ताक ( सकाळी विरजलेल्या दह्याचे रात्री आणि रात्री विरजलेले सकाळी )आंबट दही नको.
२) रक्त स्त्राव होत असल्यास थांबेपर्यंत रोज सकाळी एक रात्री एक पेरु पिठीसाखर लाऊन खावा.
३) मोड आणि ठणका असल्यास सुरणाची भाजी किंवा आयुर्वेदीक सल्यानुसार सुरण वटी.
४) रात्री एक चमचा ( ग्रिन फार्मसीचेच ) त्रिफळा चुर्ण गरम पाण्याबरोबर रात्रीच्या जेवणानंतर २ तासांनी घेणे
५) बैठे जीवन असल्यास चालण्याचा व्यायाम, रात्री शतपावली आवश्यक

याच बरोबर

ईशम ईशो ईशाम
कंकर को न करो लालीशाम
सारे अक्षर रोज पुकारे
मुल बवासीर जल्द मिट जाए

या मंत्राचा जप रोज किमान १०० वेळा केल्यानंतर जर आवश्यकता वाटली तर ऑपरेशनचा निर्णय घ्या.

इतका वेळ आपल्याजवळ असावा असे धरुन हे लिहले आहे.

जर भगेंद्र असेल तर आयुर्वेदीक क्षारसुत्र हा उपाय ऑपरेशन पेक्षा प्रभावी आहे.

डॉ बडवे ..नवी पेठ..दाते फोटो स्टुडिओ च्या पुढची लेन..कोपर्‍यावर एक डेअरी आहे बघ..
त्या लेन मध्ये आत गेल्यावर डावीकडची पहिली किंवा दुसरी बिल्डिंग..
तिथेच लहान मुलांचे डॉ कानडे यांचेही क्लिनिक आहे..दोन्ही एकाच बिल्डिंग मध्ये आहेत..
(पत्ता विचारताना डॉ कानडे विचारले तर लौकर सांगतील म्हणुन सांगुन ठेवले)

मृनिश ,नितीनचंद्र , शोभा१
धन्यवाद . कैलास जीवन खायचं . ई… अवघड आहे . बहुतेक जमणार नाही . १ भारी उपाय सापडलाय ३ दिवस फक्त लिक्विड डायट . सकाळी उठल्यावर अनाश्यापोटी अर्धा कप थंड दुधात अर्धा लिंबू पिळून घेणे . दिवसातून ३-४ वेळा पांढर्या तिळाची पोटीस गरम करून शेकणे . चांगलाच फरक पडलाय ३ दिवसात .