काव्य लेखन

Submitted by पशुपति on 9 November, 2013 - 08:49

नजराणा

कर स्वीकार ही शब्द भेट प्रिये |
अर्पितो चार शब्द तुज साठी प्रिये ||

तू तिथे अन मी इथे |
कसा करावा आनंद गडे ||

वाटते एकदा .........
यावे जवळ तुझ्या, पक्षी होऊन |
बसुनि खांद्यावर, द्यावे अभिनंदन ||

वाटते एकदा............
पुष्प होऊन गुलाब, उमलावे बागेत |
भेट म्हणुनी दरवळावे तुझ्या केसात ||

वाटते एकदा...............
ढग होऊनी, यावे वहात तुझिया गावात |
चिंब करावे, द्यावा आनंद आलिंगनात ||

वाटते एकदा............
नकोच ते सर्व, स्पंदन होऊन यावे |
अन हृदयात तुझ्या, एक रूप व्हावे ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users