कन्याकुमारी आणि केरळ

Submitted by Srd on 7 November, 2013 - 08:56

भाग (१)
कालडी मठ फोटो

आपल्या भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण 15जानेवारी २०१० मध्ये झाले होते.
ते पाहाण्यासाठी मी कन्याकुमारीला गेलो होतो.
त्यावेळी केरळही थोडे
पाहिले होते.येथे मी माझे अनुभव देत आहे. आता केरळचा सिझनही सुरू झाला आहे. माझ्या या सहलीत मुन्नार,थेक्कडी आणि बैकवॉटर्स बोटिंग नाही . Sad

डिसेंबर नवीन आलेल्या कैलेंडरच्या मागच्या पानांवरची माहिती
वाचतांना 'भारतातून दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण' कडे लक्ष गेले.अगोदर जूलै महिन्यात उत्तर भारतातून खग्रास ग्रहण दिसले होते
परंतू अपेक्षेप्रमाणे ढगांनी निराशा केली होती.आताचे १५ जानेवारी(२०१०)ला दुपारी अकरा ते दोन या वेळात कन्याकुमारीहून कंकणाकृती दिसणार होते.शिवाय भारतातून चांगले कंकणाकृती सूर्यग्रहण पाहाण्याची संधी पुढील शंभर वर्षात नाही असे लिहिले होते. मी लगेच माहिती जमवण्याच्या कामाला लागलो.
प्रथम पेपरातील एका ग्रहणासाठी कन्याकुमारी (ककु)ला नेणाऱ्या
आयोजकाला फोन केला.
त्याने ककु एक्सप्रेसने
जाणेयेणे अधिक दोन दिवस राहाण्याचे चार हजार रु सांगितले.हे बाद झाले .
मग रेल्वेचे रेझ
तपासले तर ते
या गाडीचे होते.तामिळनाडू पर्यटन केंद्र दादरला स्वामिनारायण मंदिराच्या मागच्या गल्लीत आहे
तिथे गेलो.सर्व माहितापत्रके आणि नकाशा मिळाला परंतु तिथल्या बाईंनी प्रामाणिकपणे सांगितले (!!)की केरळची सहल करा आणि,तिरुवानंथपुरमपासून तिकडे जा फक्त ८० किमि आहे ते सोपे पडेल.
चर्चगेट स्टेशनच्या जवळ इंडिआ टुअरिझम सेंटरमध्ये उपयुक्त माहितीपत्रके मिळाली.
केरळच्या रेल्वेचे बुकिंग मिळणे शक्यच नव्हते कारण संक्रातिला कोट्टायमपासून साठेक किमि वर शबरिमलैच्या पर्वतावर अयप्पाची यात्रा असते.तरी सहजच बुकिंग किती झाले आहे ते पाहाण्यासाठी वेबसाईट शोधली.११जानेवारीला जाण्याची आणि १७ जाने येण्याची गरीबरथची (२२०१/०२)एसी बसण्याची तिकिटे चक्क उपलब्ध होती !!१५ला मी कन्याकुमारीला जाऊ शकत होतो.
[नेत्रावती(16345) गाडी त्रिशुरला साडेबाराला पोहोचते गरीबरथच्या २तास आधी.त्याचे तिकीट उत्तम.मंगला इक्स०(12618) साडेआठला जाते परंतु थंडीमध्ये दिल्लीकडून येणाऱ्या गाड्यांचा भरोसा नसतो.]
सूर्याचे कंकण दिसायला लागले.या पाच दिवसांचा केरळचा कार्यक्रम ठरवायचा होता.अगोदर केरळला जाऊन आलेत ते बहुतेकजण कोचि -मुन्नार-थेक्कडी -कोटायम-कुमारकोम -कोलम-अळेप्पीलाला ट्रावल कंपनीकडून गेले होते.मी एकटा मुन्नार अथवा बोटिँग करून काय करणार ? Sad पाणपक्षी पाहुनही कंटाळा आला होता.ही ठिकाणे गाळली.कोचि ते तिरु०पुरम हे दोनशे किमिचे अंतर रेल्वेनेच जायचे ठरले.तिकडच्या 'इंद्रायणी गाडी'चे(१६३४१) पण बुकिंग मिळत होते !

केरळचे पर्यटन कार्यालय वल्ड ट्रेड सेंटरमध्ये(मुंबई) आहे.तिकडे गेलो .तिथे सर्व नकाशे आणि माहितीपत्रके मिळाली.ताबडतोब तीन तिकीटे काढली ठाणे ते त्रिशुर,कोचि ते तिरु०पुरम आणि कोशुवेली ते ठाणे.

एक महिना भरकन सरला.
पुस्तके आणि पत्रके वाचून प्रवासाचा आराखडा डोक्यात तयार झाला होता.
केरळ म्हणजे मसाले,
नारळाची झाडे खाड्या आणि होड्या असा माझा समज होता.पण नेट आणि पुस्तकांतून माहिती वाचून कळले की इकडे याशिवाय बऱ्याच गोष्टी आहेत.

शुक्रवार,अकरा जानेवारी २०१० उजाडला.दोन बैगा आणि भरपूर सूचना घेऊन ठाणे स्टेशनात संध्याकाळी पाचला हजर झालो.खास ग्रहणासाठी जाणारे या गाडीला बरेच जण दिसत होते.ग्रहणाचे चश्मे लावून फोटो काढत होते.
गरीबरथ गाडीची वेळ कोकण आणि गोव्यासाठी पोहोचण्यास गैरसोयीची आहे त्यामुळे ते प्रवासी याला येत नाहित.फक्त बसण्याचा डबा पुढे आणि मागे एकेक असतो.

एसी असल्यामुळे त्रास नाही,
परंतु बससारख्या सीटसमुळे सामान राहात नाही अथवा उलट्या दिशेने तोंड असल्यास वैताग येतो.
गाडी सुटली.
माझ्या डब्यात बरेच शबरिमलैचे काळे कपडे घातलेले भाविक होते.

प्रत्येकाकडे एक बैग आणि एक 'विडुमरै' होती.सामान ठेवण्यावरून भांडणे झालीच.सीटखाली मोठी बैग राहात नाही आणि विडुमुरै खाली ठेवायचे नाही.माझ्या बाजुला बसलेल्या माणसाने मला शबरैमलैची सर्व गोष्ट सांगितली.आमची चांगली ओळख झाली.

रात्री चांगली झोप लागली.सकाळी सहा वाजता उजाडले त्यावेळी उडुपि स्टेशन आले.गरमागरम इडली,वडे,चाया(चहा) कापि (कॉफी) विकणारे आले.पुढे मंगळूर,कासारगोडला केरळचा खोबऱ्याच्या तेलातला लाल हिरवा बदामि हलवा मिळतो.

खिडकीतून छान दृष्य दिसत होते.झाडांत लपलेली सुरेख घरे रानपक्षी खूप दिसले.एका ठिकाणी बैकल फॉट स्टेशनजवळ समुद्र हाकेच्या अंतरावर दिसू लागला.

दोन वाजता शोरानूर जंक्शन आले.स्टेशनवर पुढच्या पाचव्या डब्यापाशी सदर्न रेल्वेचा खानपानसेवा स्टॉल आहे. उत्तम सेवा नॉनव्हेज पदार्थ आहेत. गाडी थांबल्यावर प्रवाशांनी (फॉरनरसुध्दा )भराभर रांग लावली. येथे पलक्कड(पालघाट)कोईमत्तुर रेल्वे फाटा आहे.डिझेल इंजन काढून इलेकट्रिक लावले.अडीच वाजता त्रिशुरला उतरलो.

पूर्वेकडे (डावीकडे)बाहेर पडून मशिदरोडवरच्या बस स्टैंडजवळच्या शांती टुरिस्ट होममध्ये खोली घेतली.

शंखुमुगम बीच फोटो

फोटो सुचिंद्रम तलाव फोटो

कोचि बंदरचा सूर्यास्त फोटो

सुचिंद्रम मंदिर गोपूर फोटो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाग २

पद्मनाभस्वामि मंदिर

येथूनच खाजगी बस गुरुवायुरला जातात. हात दाखवल्यावर थांबतात. त्याने
पाऊण तासात गेलो.देऊळ साडेचारला उघडते.भली मोठी रांग होती.तिथे न थांबता परत त्रिशुरच्या वडक्कुनाथन देवळापाशी साडेसहाला आलो.पांढरी धोती (लुंगी) नेसून मोठ्या आवारात गेलो आतमध्ये पाच देवळे आहेत.आज शिवरात्र असल्याने तेलाच्या दिव्यांची रोषणाई होती.गर्दी नाही.केरळचे हे प्रतिकात्मक देऊळ पाहिलाच हवे.नंतर बाजारात फिरून रूमवर आलो.

बुधवार.
सकाळी सातलाच रूम(त्रिशुर)सोडून जवळच्याच बसडेपोत आल्यावर कोटमंगलमच्या बसने सवा तासात 'कालडी'ला आलो.आद्य शंकराचार्याँचे जन्मस्थान,मठ,शारदेचे देऊळ आणि नदी हा फार रम्य परिसर आहे.येथून पाच किमीवरचे अंगमाली मुख्य त्रि०ते एर्नाकुलम रस्त्यावर आहे बस बदलून एर्ना०साउथ(टाऊन/नॉर्थ नाही) स्टेशनला सवा तासात आलो.हॉटेलात रूम घेतली.दोन वाजता एसीबसने कोचिफोर्टला(२२रु) अर्धा तास लागला.याठिकाणी फेरफटका मारून लॉँचने(अडीच रुपयात) परत एर्ना०मरिनाला आलो.छान जागा.मसाला बाजारातून फिरत रूमवर पोहोचलो.

गुरुवार
साडेपाचलाच रूम(एर्ना०)सोडून साऊथ स्टे०ला आलो सहाच्या तिरुवानंतपुरम रेल्वेचे(16341) तिकीट अगोदरच काढलेले होते.हे दोनशे किमी अंतर चार तासात कापून दहा वाजता तिरुव०ला आलो. डावीकडे (उत्तर)थंपानूर आणि उजवीकडे इस्ट फोर्ट,पदमनाभस्वामी मंदिर आहे. थंपानूरमध्ये मोठा बस डेपो आहे.तिकडे हॉटेल ३ दिवसांसाठी घेतले.

दुपारी नेपिअर म्युझिअम आणि झू पाहून 'पटोम'ला आलो.इस्ट फोर्टातल्या मंदिराच्या तलावासमोरच पुथिनमलिका पैलिस आहे. तो पाहिल्यावर बाजूचे भव्य पदमनाभस्वामी मंदिर पाचला उघडले.धोती पाहिजेच.स्त्रियांची जिन्स नको.चप्पल,बैग,कैमरा,पर्स,कपडे ठेवायचे ५०रु (मी रुमवरच ठेवले होते) घेतात.वाजणारे दोनशे दगडीखांबी संगीत मंडप आहे तो बंद केला आहे. पाच रुपयांत गोपुरात वर जाऊन आलो.प्रदक्षिणा मार्गावर कामशिल्पे,योगमुद्रा आहेत.फोटो काढणेस अर्थातच मनाई आहे.तीन भागातून शेषशायी विष्णू -पद्मनाभस्वामी पाहिला.त्रावणकोर राजांनी हे मंदिर बांधले त्यांचा मुख्य राजवाडा आता तामिळनाडमध्ये आहे.येथून बसने एरपोर्ट /वेली कडे जाणाऱ्या बसने ६ किमीवरच्या शंखुमुखम किनाऱ्यावर जाऊन संध्याकाळ घालवली.स्वच्छ किनारा आणि एक मोठे मत्स्यकन्येचं सिमेंटचं शिल्प आहे.

सोन्याची दुकाने कोचि

शुक्रवार १५ जानेवारी २०१०.आज कन्याकुमारी (८०किमी)येथून भारतातून सर्वाधिक चांगले कंकणाकृती सूर्यग्रहण ११ते २ या वेळेत दिसणार होते.सकाळी पाचलाच बाहेर पडलो.डेपोतून नागरकोईल(५०किमी)जाणाऱ्या बसेस पंधरा वीस मिनीटांनी सुटतात त्याने निघालो.वाटेत तकलाई गावापाशी पदनाभपुरम पैलिस आहे परंतू तो चुकणार होता.सातला नागरकोईल आले.भरपूर इडली वडे आणि इथली राजेळी केळी खाल्ली.चालत दहा मिनीटांवर नागराजकोईल (=नागाचे मंदिर )आहे ते पाहिले.तिथल्या स्टैंडवरून बसने पंधरा मिनीटांत सुचिंद्रम स्टॉप येतो. हे मंदिर छान आहे.फॉरनरना प्रवेश आहे जिन्स भोवती एक ओढणी /स्टोल गुंडाळली की स्त्रियांना आत सोडतात पुरुषांना लुंगी लावून उघडे जावे लागते.गोपूर,बाराफुटी मारुती,वाजणारे खांब आणि मोठी शिल्पे हे खास.इकडची बरीच देवळे ११ ते ५ बंद होतात.

दहा वाजले होते.बसने कन्याकुमारीला (१३किमी) वीस मिनीटांत आलो.जेट्टी आणि ककु० मंदिराचा स्टॉपला उतरायचे.आजच पोंगल.प्रचंड गर्दी.मंदीर बंद झाले होते.विवेकानंद स्मारकसाठी बोटीच्या रांगेत उभा राहिलो.अकरा वाजता ग्रहणाचा स्पर्श सुरू झाला.थोडे ढगाळ असल्याने सूर्याकडे सहज बघता येत होते.

srd, tumhI lihitaay chaangle pan foTo paahataa yet naahit. foto link denyapekshaa picasa varun ithe link dya mhanaje sagalyana maabo varun paahataa yetil.


दीड तासाने नंबर येऊन तिकीट मिळाले.बोटीतून अगोदर जाऊन आलेल्यांनी सेफ्टी जाकेटस खाली फेकली. तीच घालावी लागली. एकावेळी दीडशेजण जात होते.त्या खडकावर जाण्याचा एक अनुभव.शेजारचा खडक शंभरेक मिटर्स दूर आहे.त्यावर तिरुवल्लुवरचा उभा पुतळा आहे.३बोटी या दोन खडक आणि जेटिशी फिरत राहतात.हे पाहतानाच सूर्य पूर्ण कंकणाकृती झालेला पाहिला.साडेतीन तास यातच गेले.इथून सरळ बसने रूमवर तिरु०ला आलो तेव्हा सात वाजले.

शनिवार १६ जानेवारी
कालच्या ग्रहणाची माहिती असावी म्हणून दोन पेपर्स घेतले.कोळ्हिकोडला शाळेच्या राज्य कला आणि संस्कृती महोत्सवात झावळ्याने शाकारलेल्या झोपडीत सूर्याचे असंख्य कवडसे जमिनीवर ग्रहणात गोल न पडता चंद्रकोरीव पडलेला फोटो फारच आवडला.(कॉपिराईटमुळे)देत नाही.

सकाळी पाचलाच बसडेपोत आलो पहिली पोनमुडी बस ५.२०ला आणि दुसरी साडेसातला आहे.वाटेत एक मोठे गाव विथुरा येते.रबराची लागवड दिसली.नाश्त्यासाठी थांबलो तिथे दहा रुपयात तीन उत्तपे मिळाले.घाट चांगला आहे.लवंगांची झाडे पाहिली.वरती साडेसातला गेलो.पोनमुडी नावाचे गाव थोडे अगोदर एक किमी आहे. वरती गारवा होता. केरळ सरकारने इथे हिल स्टे बनवले आहे.
कन्याकुमारीला सूर्यग्रहण पाहतांना

विवेकानंद स्मारकाची रांग

पोनमुडीचे एक रेस्ट हाऊस

कोवालम बीच

राहण्याच्या घरांशिवाय काही नाही पण एक हिल स्टे पाहिले.

नंतरच्या बसने एक वाजता परत आलो.चार वाजता पटोम स्टैंडला जाऊन एसी बसने कोवालम बीच(१८किमी) पाहून आलो.किनारे तीन आहेत. लाइटहाऊस बीचला नेतात. स्वच्छ आणि निर्धोक समुद्र.

रविवार १७ जानेवारी.
सकाळी ८.५० च्या गरीबरथ गाडी (12202)चे येण्याचे तिकीट होते.ही गाडी कोशुवेली टर्मिनसहून(८किमी) सुटते.तिरु०पुरम च्या ऑटो स्टैँडवरून ७०रुपयात प्रिपेड ऑटो जातात साडेसातला एक पैसेंजर ट्रेन आहे.गम्मत म्हणून त्याचे तिकीट(२रु) काढले.दोनच स्टे जाण्यास कितीसा वेळ लागणार असा विचार करत कैंटिनमध्ये इडलीवडे खाल्ले.साडेआठ वाजले कोशुवेलीला पोहोचायला.ओसाड स्टेशनात मी आणि एक दोघेचजण उतरलो.स्टेशनमास्टर जणू आमचीच वाट पाहत होता.आमच्या बैगज बघून "गरीब रथ?" डोके हलवल्यावर आम्हाला झाडले.ऑटोने यायचे म्हणाला कारण इथे ओवरब्रिजच नाही.मध्ये पंधराएक रुळांपैकी चारांवर मालगाड्या होत्या.मास्टराने सिग्नल दिल्याशिवाय त्या हलणार नव्हत्या.मला बैगा संभाळत मालगाडींच्या डब्यांखालून जातांना खरोखर गरीब होऊन रथाकडे जातोय हे जाणवलं.
पुढचा प्रवास वेळेत होऊन सोमवारी ११ला घरी आलो.

++++++++++++++++++++
पद्मनाभपुरम पैलिस :पोंगलच्या गर्दीमुळे कन्याकुमारीला विवेकानंद स्मारक बोटीने जाऊन पाहण्यात बराच वेळ गेल्याने हा राजवाडा पाहता आला नव्हता.नंतर आम्ही फेब्रुवारी २०१२ मध्ये याच आराखड्याने कौटुंबिक सहलीत गेलो त्यावेळी स्मारक दीड तासात पाहून आलो.परत येताना दोन वाजता तकलाई येथे उतरलो. येथून पैलिस दोन किमीवर आहे.संपूर्ण लाकडाचे काम आहे.रंगीत चित्रे आहेत. इथली काळी फरशी खास आहे.करवंटीचा कोळसा, अंड्याचा पांढरा बलक, शिंपल्यांची पूड आणि वेलींचा चिकट रस यांपासून रोगण करून बनवली आहे. वाळल्यावर घोटून चमकदार केली आहे .राजवाडा सोमवार सोडून ९ते१ ,२ते ४.३० उघडा असतो.