मंगळवार, मंगळयान, शुभमंगळ सावधान!

Submitted by sulu on 5 November, 2013 - 11:25

मंगळयानाचे प्रक्षेपण आणि त्याची भविष्यातली प्रगती यांचा मागोवा घेत रहाण्यासाठी हा धागा!

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे विशेष अभिनंदन!

मंगळवार, मंगळयान!
शुभमंगळ सावधान!!

आभिनंदन इसरो!

http://www.isro.org/

-पुढचे २०-२५ दिवस पृथ्वीलाच प्रदक्षिणा घालत स्वत:च्या शक्ती ची तपासणी.
- मग वरच्या भ्रमणरेषेत प्रवेश करत मंगळा कडे प्रयाण ( १ डिसेंबर)
- सुमारे १० महिन्यानी मंगळाच्या कक्षेत. ( २४ सप्टेंबर २०१४)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२४ सप्टेंबर २०१४ रोजी जिवंत असलो तर कळेल की ते पोचले की नाही!

बाकी, अमेरिकन लोकांनी स्वतःला परवडत नसताना हे बरे करून घेतले.

काही का असेनात!

यान पोचणार हे नक्की, आज नाही तर उद्या, तेव्हा पृथ्वी असेल, मंगळ असेल, यान असेल.......

Sad

इस्त्रोचं अभिनंदन. अमेरिका, रशिया, आणि युरोप नंतर आता भारत पण यात सहभागी.

------------------------------------------------
आपल्या देशात खेकड्यांची कमी नहि है!

मंगळयान पृथ्वी च्या प्रदक्षिणा पूर्ण करून पुढल्या महत्त्वाच्या प्रवासाला निघाले. चौथी परीक्षा सोडता सर्व परीक्षा व्यवस्थित पार पडल्या. चौथ्या परीक्षेमधील चाचणीनंतर पुढील प्रवासात थोडा बदल करण्यात आला आहे -

http://www.bbc.co.uk/news/science-environment-25163113

मंगळयानाच्या मार्गातली पहिली मार्गक्रमणा - दुरुस्ती यशस्वी -

http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5020342828530243963&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20131211&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=मंगळ मोहिमेची पहिली मार्गक्रमण दुरूस्ती यशस्वी

मी हा धागा मन्गळयानाचा पाठपुरावा करण्यासाठी काढला होता.
काम सम्पले.

अ‍ॅड्मिन, हा धागा तुम्ही हवा तेव्हा उडवू शकता!

मंगळयानाने पाठवलेले 'ओफिर चास्मा' चे फोटो -

http://www.nbcnews.com/science/space/indias-mars-orbiter-captures-striki...

नुकतेच मच अवेटेड 'सोलार कन्जक्शन' पार पडले. थोडक्यात, पृथ्वी आणि मंगळ या मधे सूर्य आला. यामुळे मंगळयानाकडून पृथ्वी कडे स्पष्ट रेडिओ-संदेश येणे शक्य नव्हते. ऑटो मोड मध्ये मंगळयानाने हा एक महिन्याचा (१७ दिवस) टप्पा सुखरूप पार पाडला.

सोलार कन्जक्शन .. ईंटरेस्टींग !
नवीन माहिती समजली.

एक महिन्याचा (१७ दिवस) >>> हा काळ मंगळाच्या हिशोबाने दिला आहे का?

वाचलेल्या माहिती नुसार prep - execution- post catchup हा महिन्याभराचा काळ आहे.

करोडो मैलावर ग्रहाभोवती यान फिरवताना संशोधनात व्यत्यय येऊ नये म्हणून किती Logistics असतात ते वाचून अंगावर शहारे येतात. या लोकाना नमस्कार!