Submitted by UlhasBhide on 5 November, 2013 - 00:14
"आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला" ही तरही कुठेशी बघितली आणि त्यावरून हे सुचलं :
---------------------------------------------------------------------------------------------------------------
मतल्याकडून मक्ता ….
’गागा लगाल गांचा’ अभ्यास खास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला
तोडून शब्दपुष्पे शेरात खोचता मी
लाभे ’बहर’ तरीही गायब सुवास झाला
सानी, उला बळाने 'जमिनी'त मी जखडता
रदिफेस धावण्याचा भलताच त्रास झाला
मतल्याकडून मक्ता ..... वारीतल्या कवाफी
झाली गझल खरी की नुसताच भास झाला
शेरात एक कविता हा नेम पाळताना
माझ्यातला कवी का इतका भकास झाला
.... उल्हास भिडे (५-११-२०१३)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भिडेसाहेब, आता तुम्ही
भिडेसाहेब, आता तुम्ही ’शेर’दिल झालात.
शेरात एक कविता हा नेम
शेरात एक कविता हा नेम पाळताना
माझ्यातला कवी का इतका भकास झाला <<<
व्वा! खरे आहे. (नेम / नियम ?)
हझलीश रचना आवडली.
धन्यवाद बेफीजी. खरं तर नेम
धन्यवाद बेफीजी.
खरं तर नेम हा शब्द मी नंतर योजला.
प्रथम "हे पथ्य पाळताना" असे सुचले होते.
आणि नेम हा शब्द नियम या अर्थानेही वापरला जातो असे वाटते.
उदा. "नेमाने तुज नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा"
बालवयात वाचलेली ओळ आठवली.
नेम आणि नियम यातील अर्थ
नेम आणि नियम यातील अर्थ साम्याबाबत मलाही अचूक माहिती नसल्यासारखे वाटले म्हणून नुसतेच प्रश्नचिन्ह दिले. खुलासा केलात त्याबद्दल आभारी आहे.
नेम= १. ज्याच्यावर मारा
नेम= १. ज्याच्यावर मारा करायचा ती नेमकी जागा; लक्ष्य
२. काही हेतूने ठरावीक काळापुरती एखादी गोष्ट न चुकता करणे
नेम धरणे (क्रि.)
’नेम’ हा शब्द इथे उचित नाही वाटत....त्याऐवजी ’नियम’ हाच शब्द योग्य ठरेल....तसेच मात्रांमध्येही फरक पडणार नाहीये.
<< तोडून शब्दपुष्पे शेरात
<< तोडून शब्दपुष्पे शेरात खोचता मी
लाभे ’बहर’ तरीही गायब सुवास झाला
शेरात एक कविता हा नेम पाळताना
माझ्यातला कवी का इतका भकास झाला >> खास आवडल्या.
गझलेचे नियम, व्याकरण वगैरे
गझलेचे नियम, व्याकरण वगैरे मला काही झेपत नाही.
पण गझल रचताना तुमची धांदल झालि ते बयान केलंय या यात?
मजा आली उकाका पूर्वीही एकदा
मजा आली उकाका
पूर्वीही एकदा तुम्ही गझलेतील संकल्पना /व्याख्या योजून एक गझल केली होती हे आठवले बहुधा देवपूरकरांच्या एका रचनेचे विडंबन की काय असावे असेही स्मरते नंतर त्यात काही शेर वाढवलेही होतेत असेही आठवते आहे
"नेम " बरोबर आहे नियम चा अनेक्दा यूज होणारा असा अपभ्रंश आहे तो ...कणखरजींच्या एका शेरातही होता हा नेम
तू ये तुझी इच्छा कधी झालीच तर
आहे सुरू हा याग नेमाने इथे
~कणखर
उकाका मजा आली धन्स
एक अनोखी गझल म्हणावी लागेल ही
एक अनोखी गझल म्हणावी लागेल ही गझलेवरच भाष्य करणारी !
खयाल व शेरांची मांडणी एकूणच फार आवडली .
उकाका मजा आली धन्स>>+1
(No subject)
नेम हा शब्द योग्य
नेम हा शब्द योग्य आहे.
"नेमेचि येतो मग पावसाळा"
या वचनात पावसाळा नेम धरून येत नाही; तर नियमाने येतो.
मस्त!
मस्त!
सुंदर!
सुंदर!
मजा आली वाचताना. ह्या
मजा आली वाचताना.
ह्या अनुभवातून गेले आहे म्हणून तर अजूनच आवडली..
नेम बद्दल चर्चा वाचली.
'नित्य नेमाने' हा शब्द आठवून गेला.