तुम्हाला कांदा काय दराने परवडेल?

Submitted by चिंतामण पाटील on 3 November, 2013 - 01:29

तुम्हाला कांदा काय दराने परवडेल?
मंडळी सध्या कांदा फारच चर्चेचा विषय झालाय. तुम्हाला काय किलोने कांदा हवाय ते सांगा. मग मी तुम्हाला तो काय दराने मिळायला हवा ते सांगतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे ? झुमरीतलय्या? मग भो़णे ता. धरणगाव, जिल्हा. जळगाव ते झुमरीतलय्या प्रवासखर्च विचारा , देतो पाठवून.
इब्लिस गंमत नाहीये. जरा सिरीयस व्हा.

diwali.png

पाटील साहेब,
रागावू नका हो.
सध्या आमच्याकडे ३० रुपये किलो दारावर येतोय.
बाकी गरज असेल तर आहे त्या भावाने घेतलाच जातो. त्याला इलाज नाही.

३० रु किलो?

बापरे! आमच्याकडे परवा नाक्यावरच्या दुकानात विचारला कांदा तर सत्तर रुपये किलो असं उत्तर आलंन तेही तोर्‍यात!! खा म्हटल तूच Uhoh

भाजीवाल्याकडे छप्पन रुपये होता किलोने.

नाही राग नाही.
शेतकर्‍याचे गणित सांगतो.
एकरी कांद्याचे रोप लागते १६ हजाराचे, त्याच्या लावणीची मजुरी १० हजार रुपये, निंद्णी ३ हजार रुपये, खत ५ हजार रुपये, फवारणी (बुरशीनाशक वगैरे ) ६ हजार रुपये, काढणी खर्च १० हजार रुपये. एकरी उत्पन्न येणार ५० क्विंटल. शेतकर्‍याचं राबणं, पाणी पुरवठा, हे धराल तर तो खर्च जातो ६० हजार जर हा कांदा २० रुपयाच्या खाली शेतकर्‍याकडून व्यापार्‍यांनी घेतला तर...... शेतकर्‍याचे गणित बिघडते. आता निसर्गाच्या संकटात पीक सापडले तर उत्पन्न घटेल. मग त्याचं काय आता तुम्ही ठरवा कांद्याचा भाव. तो पर्यंत मी शेतातून आलो फिरून.

जाता जाता ५६ रु वाल्यांना सांगतो पावसाळ्यात शेतकर्‍याचा कां खराब हवामानामुळे सडला तो एकरी २० ते ३० क्विंटल आलाय. पुन्हा ठरवा भाव.

चिंतामण पाटील,
कांदा वीस काय तीसने घ्यायला पण आमची ना नाही.
पैसा शेतकर्‍याच्या पदरात जायला हवा.
सध्या जिकडे तिकडे जे साठ सत्तर रु भाव आहेत ते साठेबाजीमुळे आहेत हे सर्वज्ञात आहे.
मुख्य दुखणे हेच आहे.
तुम्ही सध्या डायरेक्ट विकू शकत असाल तर माबोखरेदी विभागाशी संपर्क करून बघा.
मराठी पुस्तके, सीडी यांबरोबर मराठी कांदा पण ठेवतील ते.

चिंपाजी

मी आयटीत असेन तर मला काय दराने कांदा मिळतो याने फरक पडणार नाही. ३५,०००/- ते ५०,०००/- उत्पन्न असेल आणि महागड्या शहरात राहत असेन तर उत्पन्नाला हजाराने भागल्यावर जो दर येईल त्यात अ‍ॅडजस्ट करू शकू. पण रोजच्या कांद्यासाठी महिना हजार रुपये लागत असतील तर जड जाईल. कारण घराचे हप्ते, शाळा कॉलेजच्या फिया, महागड्या डाळी, भाज्या इ. इ. पण खर्च आहेतच.
उत्पन्नगट : २५,०००/ ते ३५,००० यांनाही हजाराने भागून परवडुण घेऊ कसंबसं..
पण २५०००/- च्या खाली २५ रु किलो रेट पण पाणी काढतो डोळ्यातुन. बाकिचे रेट वरच्यांना जे आहेत तेच सेम राहतात. .
आणि पंधरा हजाराच्या खाली जर मी असेन तर मला चॉईस नाही. काही गोष्टी राशनमधनं मायनस करणं मला शिकायला लागेल. जाउ द्या,. प्रत्येकाचं आपलं आपलं रडगाणं असतं.

बरोबर, पण ओरड ५० हजारवालेच करताहेत ना. मिडियावर १०० रु कांदा अशी ओरड कोण करतोय १०० रु रोजाने कामाला जाणारे? नाही.

ओरड शेतकर्‍यांच्या नावाने कोण करतोय?
बाजारात जास्त कांदा आल्याने भाव पडला की काही शेतकरी ग्राहकांना स्वस्त कांदा घेऊ नका, पाप लागेल पाप असंही सांगतात.
एन्डीटीव्हीने एक फीचर केले होते त्यात नाशिक बाजारात ४० रुपये किलो विकला जाणारा कांदा दिल्लीच्या ग्राहकाला १०० रु. प्रतिकिलोने विकला जाईपर्यंत त्या कांद्याचा प्रवास दाखवला होता.