बोर्ग आणि महाराष्ट्रियन

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

The Borg: Strength is irrelevant. Resistance is futile. We wish to improve ourselves. We will add your biological and technological distinctiveness to our own. Your culture will adapt to service ours.
-Michael Piller, "The Best of Both Worlds" Part I, episode of Star Trek: the
Next Generation (1990)

I have always been fascinated by the Borg. Though they are the enemies of starship, and of my heroes aboard the Earth spaceships, there is something about them that I find agreeable. It certainly isn't their ruthlessness. Very likely it is their will to assimilate knowledge in other species. And their mechanisms. The will to expand not just physically, but in those dimensions that
are not easily fathomable. The hive like structure was another fascinating aspect. We see it among bees and ants but not in what we term as higher beings. One possible reason is that as entities get more complex, passing on information back and forth, and sharing it with far strung quarters becomes time and
energy consuming. So distributedness is in fact a more sustainable model. (That is what makes a "controlling" God a difficult thing to digest - but that is for another day).

Back to the Borg. I find a curious thing happening in Maharashtra. People are turning away from assimilating other cultures, alien knowledge, alien influences in the name of retaining an authenticity of their own. At least the vocal ones are. They are forgetting that nothing can be authentic. Everything
is ephemeral and hence borrowed. You just have to dig deeper to realize that.

The backers of Marathi often forget that English rules mainly because it assimilated influences from other languages more easily (besides the fact that English speakers boldly went forth rather than drawing artificial boundaries around themselves). A language is only as flowery or terse as your understanding of it. To two lovers a wink on an eye means the universe. It doesn't even need words.

The starship crew generally defeated the Borg by springing a surprise. Something that the Borg did not expect. A uniqueness of humanity that the Borg had not assimilated from anywhere else. Maharashtrians need to do exactly that if they feel their culture is being threatened. Identify what is unique about Marathi or Maharashtrians. Not just items that others have under different names or variations, but truly unique.

On a related note, the civil system needs to be strengthened to see that justice is meted to everyone alike, that there is opportunity available for the fittest and the most industrious of people. Dissolve boundaries, make the world your own. To unite, does it have to be against something or someone?

Show of strength is futile. A show of will will go farther and be more effective.

विषय: 
प्रकार: 

People are turning away from assimilating other cultures, alien knowledge, alien influences in the name of retaining an authenticity of their own.

हे काय, कुठे आणि कधी घडतेय?

पुढच्या परिच्छेदावरुन वाटतंय की मराठी भाषेला पाठिंबा देताना वरील घडतेय. पण असे कुठे आजवर वाचलेले/पाहिलेले नाही की फक्त मराठी पुस्तके/मिडिया/शाळा/बोलणे चालु ठेवा. बाकी सगळे बंद करा म्हणुन.

उलट ब-याच जणांच्या आणि माझ्याही मते, मराठी माणसाला मराठी भाषा आणि इतर महाराष्ट्रियन गोष्टींव्यतिरिक्त इतर गोष्टीतही भरपुर रस घ्यायला आवडते. आणि काही मुठभर मंडळी, इतर गोष्टी पण करा, पण मराठीलाही संभाळा म्हणुन आग्रह करताहेत. 'बाकी सारे बंद, आता फक्त मराठी आणि मराठीच' असा आग्रह करणारी मंडळी कुठे आढळलीत?

माफ करा, पण तुमचा रोख नक्की कशावर आहे ते कळले नाही.. मराठी वर बोलताय आणि लगेच civil systems वर पण. तुम्ही लिहिलेत तसे झाले तर जगात सगळीकडे शांतता आणि बंधुभाव नांदेलच. पण हे करणार कसे? कोण जास्त फिट आणि इंडस्ट्रियस हे ठरवणार कोण?

शेवटाचे वाक्य मात्र खुप आवडले.

साधना

शिवाय या मायबोली ची स्थापनाच मराठी लिहावे, वाचावे, मराठी बोलणार्‍यांनी जगात कुठेहि असले तरी मराठीत लिहीणे व वाचणे शक्य व्हावे या उद्देशाने झाली आहे. म्हणून फक्त इथेच मराठीचा आग्रह. तश्या अनेक साईट्स आहेत इंग्रजीमधून संपर्क साधायला, तिथे तुम्ही इंग्रजीत लिहा.
वरची सगळी गोष्ट तुम्ही मराठीत लिहू शकला असतात. तुम्हाला लिहायचे नसेल मराठीत तर दुसरीकडे कुठे तरी जाऊन लिहा. (महाराष्ट्रात आजकाल, म्हणे मराठीपेक्षा इंग्रजीतूनच बोलतात!) उदा. तुमचा रोख जर राज ठाकरे यांच्या आंदोलनावर असेल, तर त्यालाच किंवा त्याच्या वृत्तपत्र, मासिकात लिहा. इंग्रजीतूनच, म्हणजे मराठी वाचकांना कळेल. कारण त्याचे हे सगळे निवडणूकीत निवडून येण्यासाठी आहे, स्वतः कदाचीत् चार वाक्ये देखील इंग्रजीची कुबडी घेतल्याशिवाय बोलू शकणार नाही! त्यामुळे तो सांगतो त्यापेक्षा तुमच्या मार्गाला माझा संपूर्ण पाठिंबा. पण तुम्ही ते कुठेतरी दुसरीकडे लिहा. इथे आम्हाला आमची मराठी ची सवय राहू दे. इथे पण मराठी लिहीले वाचले नाही तर मी मराठी केंव्हाच विसरून जाईन, मला तरी तसे करायचे नाही!

झक्कीबर्य,

भा.पो. पण असाही विचार करा की उद्याच्या मराठी लोकान्च्या भाषेत ह्या पोस्ट्स आहेत Happy अस्चिगला मराठी येत नसेल म्हणुन तो मराठी नाही असे थोडेच आहे? माय्बोली जगभरातील मराठी लोकांसाठी आहे मराठी भाषेसाठी(च) आहे असे व्यवस्थापन म्हणत नाही.

त्यातुन तुम्ही अगदी नागपुर्कर असुन तत्ववैगेरे असल्या शुल्लक पुणेरी गुणांना महत्वदेताय हे पाहुन जरा कसेसेच झाले बघा Happy

दिवे घेणे

माय्बोली जगभरातील मराठी लोकांसाठी आहे मराठी भाषेसाठी(च) आहे असे व्यवस्थापन म्हणत नाही

>>>>>

म्हनजे इथे मराठी मानसाचे इन्ग्रजी चालेल पन एखाद्या सरदारजीने लिहिलेले मराठी चालनार नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला पेशवा? अश्चिग , मराठी लिहिणार असलात तरच वाचू. अन्यथा तुमच्या पोस्टकडे ते कितिही पांडित्यपूर्न असले तरी मी निषेध म्हणून दुर्लक्ष केले आहे..

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

मूळ मुद्दा, मला समजला तसा, की बोर्ग यांनी इतरांच्यातील चांगले गुण आत्मसात करून घेतले तरी स्वतःचे स्वत्व कायम ठेवले.

मला वाटते, भारतामधे महाराष्ट्रीय, बंगाली, कानडी, केरळी हे ओळखण्याची पहिली खूण म्हणजे भाषा. म्हणून भाषेला महत्व. त्यापलिकडे महाराष्ट्रीयांची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. तर आता असे करा की ही काय वैशिष्ठ्ये आहेत ते इथे जरा विशद करून सांगा. कारण मला महाराष्ट्रात राहूनहि कळली नव्हती, आणि जी काही कळली होती ती सगळी इथे येऊन चाळीस वर्षात विसरून गेलो.

फक्त गणेश चतुर्थी आठवते. त्याला बहुतेक आता Elephant God's Fourth असे म्हणत असतील. पवाडे, लावण्या इ. महाराष्ट्रीय गोष्टी नुसत्याच इंग्रजीत केल्या तर हरकत नाही. पण खरे पहाता दुसर्‍याचे चांगले घेता घेता स्वतःचे स्वत्व नाहीसे होते!

हिंदी सिनेमातील इंग्रजी गाणी म्हणून त्यावर नाचणार्‍या किती मुली सणाला तरी नऊवारी नेसतात? लग्नात देखील सगळ्या वडीलधारी लोकांना नमस्कार करणे म्हणजे शिक्षा, अन्याय वाटतो असे मानणारे लोक, ज्यांनी इथे प्रचंड वादविवाद केला होता, त्यांनी काय स्वत्व जपले?

उदाहरणे म्हणून सांगतो आहे, त्या उदाहरणातच महाराष्ट्रीयत्व आहे असे मला म्हणायचे नाही. म्हणून आधीच स्पष्ट केले की , आधी भाषा सोडून इतर काय महाराष्ट्रीयत्वाच्या खुणा आहेत ते सांगा. म्हणजे जास्त विवेचन करता येईल.

मला कामापुरते इंग्रजी येते. शिवाय माझ्याकडे Webster New Collegiate Dictionary अगदी हाताशी आहे. हिंदी पण येते, पण उर्दू वगैरे समजत नाही.

अस्चिगला मराठी येत नसेल म्हणुन तो मराठी नाही असे थोडेच आहे?
---- अस्चिगला मराठी येत नसेल म्हणुन ते मराठी नाही असे होत नाही हे बरोबर असेल तर त्याच न्यायाने झक्कींना मराठी येत असेल म्हणुन ते मराठी आहेत असेही होत नाही.

माय्बोली जगभरातील मराठी लोकांसाठी आहे मराठी भाषेसाठी(च) आहे असे व्यवस्थापन म्हणत नाही.
---- मराठी लोकांना मराठी भाषा येत नसेल आणि वर त्यांना आपण मराठी म्हणायचे असेल तर जगभरातील मराठी लोकं म्हणजे नक्की कोण?

साधना, ते वाक्य (फक्त मराठीच) जास्त 'व्होकल' लोकांकरताच आहे.

झक्की, राज ठाकरे मला त्याच्या वृत्तपत्रात ईंग्रजी वापरु देईल का? महाराष्ट्रीयत्वाच्या(च) खुणा काय हा प्रश्न मलाही पडला आहे.

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

हा दस हजारी सवाल म्हणावा लागेल. या अनुषंगाने काही प्रश्न, ज्यांची उत्तरे मला अजून मिळाली नाहीयेत.
१. संस्कृतीजन्य ओळखीचे 'भाषा' हे आवश्यक असे व्यवच्छेदक लक्षण आहे का ? उदा. जर आवश्यक लक्षण नसेल तर मराठी भाषा न येताही आपण मराठी असू/ओळखले जाऊ.
२. संस्कृतीजन्य ओळखीचे 'भाषा' हे एकमेव असे व्यवच्छेदक लक्षण आहे का ? उदा. जर एकमेव लक्षण असेल तर मराठी भाषा येत असली की आपण मराठी असू/ओळखले जाऊ. वेगळे काही असण्याची/करण्याची गरज नाही.
३. 'भाषा येणे' हे कसे ठरवायचे ? म्हणजे सध्या प्रचलित (बहुसंख्य जशी वापरतात तशी) ती भाषा आली पाहिजे की भाषेच्या भविष्यातील स्वरूपाचा अंदाज बांधून तशी भाषा बोलता आली पाहिजे की काही विशिष्ट काळापूर्वी वापरात असलेले स्वरूप स्वीकारले पाहिजे ?
४. आपण भाषिक संस्कृतीचा भाग 'असतो' की भाग म्हणून 'ओळखले जातो' ? म्हणजेच, मी अमुक एका भाषिक संस्कृतीचा भाग आहे हे मी मानण्यावर असते की मी असा भाग आहे हे त्या समाजानेसुद्धा स्वीकारले पाहिजे ?
५. संस्कृती बदलणार, भाषा बदलणार. हे नक्की. मग भाषिक संस्कृती नामशेष होणे आणि भाषिक संस्कृतीत खूप बदल होणे यातली सीमारेषा कुठे असते ? ('दस हजारी सवाल' हे मला 'मिलियन डॉलर क्वश्चन'पेक्षा कमी खटकते. दोन्ही अमराठी आहेत.)
६. भाषिक संस्कृती ही लोकांच्या काही गरजांमधून निर्माण होते (उदा. सामायिक आचारविचाराच्या, सामायिक जीवनपद्धतीच्या लोकांची एकत्र राहण्याची गरज). गरजा त्याच राहतात, परिस्थिती बदल जाते (उदा. आचारविचार आणि जीवनपद्धती बदलणे). मग यातून एखाद्या भाषेची गरज लोकांना वाटेनाशी झाली किंवा तिच्या पारंपरिक स्वरूपाची गरज भासेनाशी झाली... व त्यामुळे जर भाषा नामशेष होत असेल तर तिला 'वाचवण्याचा' आग्रह का धरावा ? शेवटी, लोकांसाठी भाषा आहे, लोक भाषेसाठी नाहीत.
७. भाषिक संस्कृती ही एक ठेवा असते, त्यातून विशिष्ट मानवी समूहाबद्दल ज्ञान मिळते. हे सर्वच ज्ञान संग्रहालयात जतन करण्यासारखे आहे का ? जरी असले तरी ते सर्व मिळवणे शक्य आहे का ? तसे जर नसेल, तर भाषिक संस्कृती नामशेष झाल्यावर हे ज्ञानही नामशेष होईल. मग तिला नामशेष का होऊ द्यावे ?
८. भारतात विलक्षण भाषिक संस्कृतीवैविध्य आहे. कुठल्याही भौगोलिकदृष्ट्या महाकाय देशात असे वैविध्य दिसून येते, पण भारतात केवळ भाषांची संख्याच जास्त आहे असे नाही, तर त्यांचा एकमेकांपासूनचा वेगळेपणाही प्रचंड आहे. अशा स्थितीत देशातल्या देशात केवळ 'भारतीय' अशी ओळख असणे शक्य आहे का ? म्हणजे भारतात मी मराठी नाही, गुजराती नाही, केवळ एक भारतीय आहे अशी ओळख खरंच निर्माण होणे... अशी अपेक्षा रास्त ठरेल की अनैसर्गिक व अव्यवहार्य असेल ?

    blackribbon1.jpg

    अहो पण कुणितरी, मराठी, इंग्रजी, उर्दू, पश्तु, हिंदी, जपानी कुठल्यातरी भाषेत का होईना, महराष्ट्रीयांची व्यवच्छेदक लक्षणे लिहा ना. काही आहेत का (शिल्लक)?

    मग यातून एखाद्या भाषेची गरज लोकांना वाटेनाशी झाली किंवा तिच्या पारंपरिक स्वरूपाची गरज भासेनाशी झाली... व त्यामुळे जर भाषा नामशेष होत असेल तर तिला 'वाचवण्याचा' आग्रह का धरावा ?

    बरोबर आहे, म्हणूनच संस्कृत भाषा फारशी दिसत नाही. तशी मराठी भाषा जाईलच.

    भाषिक संस्कृती ही एक ठेवा असते, त्यातून विशिष्ट मानवी समूहाबद्दल ज्ञान मिळते. हे सर्वच ज्ञान संग्रहालयात जतन करण्यासारखे आहे का ? जरी असले तरी ते सर्व मिळवणे शक्य आहे का ? तसे जर नसेल, तर भाषिक संस्कृती नामशेष झाल्यावर हे ज्ञानही नामशेष होईल. मग तिला नामशेष का होऊ द्यावे ?

    आता हेहि तुम्हीच लिहीलेत! म्हणूनच पुष्कळ लोक अजूनहि संस्कृत शिकतात. माझ्या मित्र, जो गेली चाळीस वर्षे संस्कृतचा प्राध्यापक म्हणून ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा, इथे नोकरी करत होता, त्याच्या मते आजकाल युऱोप व इतर आशिया मधे संस्कृत जास्त प्रमाणात शिकले जात आहे, पण भारतात मात्र त्याला कुठे दिसले नाही कुणि मन लावून संस्कृतचा अधिक अभ्यास करताना. मी त्याला माझ्या अनुभवावरून सांगितले की करत असतील, पण 'तुम्ही "फोरेन" हून आलात, म्हणून स्वतःला जास्त शहाणे समजता का?' असे म्हणून तुम्हाला विचारत नसतील. तुम्ही तुमच्या एखाद्या गोर्‍या विद्यार्थ्याला पाठवा, मग त्याला सगळे मान देतील.

    आता मराठीबद्दल बोलायचे तर आंतर राष्ट्रीय विश्वजालावर या मायबोलीने मराठी भाषा जोपासण्याची चांगली सोय केली आहे, म्हणून माझ्यासारख्या ज्यांना मराठी भाषा आवडते, ते म्हणतात, इथे तरी मराठी वाचू द्यात. कारण मायबोली म्हणजे ज्ञान संपदनाची जागा नव्हे, जिथे इंग्रजी शिवाय चालणारच नाही. इथे जरा मराठीत थोडक्यात लिहीलेत, तर तेच ज्ञान मराठीतहि येईल. त्याचे श्रेय तुम्हाला मिळेल. त्यात अगदी असे काही असेल की जे फक्त मूळ भाषेतच चांगले समजेल, तेव्हढे, गरज पडली तर, इथे मूळ भाषेत लिहावे, अश्या मताचा मी आहे.

    अहो पण कुणितरी, मराठी, इंग्रजी, उर्दू, पश्तु, हिंदी, जपानी कुठल्यातरी भाषेत का होईना, महराष्ट्रीयांची व्यवच्छेदक लक्षणे लिहा ना. काही आहेत का (शिल्लक)?
    म्हणजे मूळ मुद्द्याचा चांगला विस्तार होईल. ज्यांना जमते त्यांनी मराठीत लिहा, जपानीत लिहीलेत तरी चालेल. वाचणारे फार थोडे सापडतील. पण तुम्हाला समाधान, की आम्ही आपणहून आपली जुनी भाषा सोडून दुसरी भाषा स्वीकारली, केव्हढा थोर मी! बाकीच्यांना सांगितलेच पाहिजे!