Submitted by सुप्रिया जाधव. on 29 October, 2013 - 00:06
मला जेव्हा समेवर यायचे असते
लयीला नेमके बिनसायचे असते
वहाण्याची जिथे सुरवात झालेली
प्रवाहाने तिथे थांबायचे असते ?
तुला वाटेल ते ते स्पष्ट केले तू
तिला वाटेल जे वाटायचे असते
प्रकाशाचा पुढे पर्याय असतो पण
धुक्यामध्येच रेंगाळायचे असते
असे होईल हा अंदाज नसतो ना ?
गमवलेले खरे कमवायचे असते
कधीही घे कितीदाही परीक्षा घे
इथे उत्तीर्ण कोणा व्हायचे असते ?
गजर बघ वास्तवाचा वाजतो आहे
पुन्हा स्वप्नातुनी जागायचे असते
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रकाशाचा पुढे पर्याय असतो
प्रकाशाचा पुढे पर्याय असतो पण
धुक्यामध्येच रेंगाळायचे असते
व्वा. गझल फार आवडली.
मनःपुर्वक धन्यवाद समीरजी .
मनःपुर्वक धन्यवाद समीरजी .
कधीही घे कितीदाही परीक्षा
कधीही घे कितीदाही परीक्षा घे
इथे उत्तीर्ण कोणा व्हायचे असते ?<<<
व्वा व्वा
(No subject)
गजर बघ वास्तवाचा वाजतो
गजर बघ वास्तवाचा वाजतो आहे
पुन्हा स्वप्नातुनी जागायचे असते
अनवट खयाल. आवडली गझल.
प्रकाशाचा पुढे पर्याय असतो
प्रकाशाचा पुढे पर्याय असतो पण
धुक्यामध्येच रेंगाळायचे असते
उत्तम शेर!
अनेक शेर आवडले....! मस्त गझल
अनेक शेर आवडले....!
मस्त गझल
>> प्रकाशाचा पुढे पर्याय असतो
>>
प्रकाशाचा पुढे पर्याय असतो पण
धुक्यामध्येच रेंगाळायचे असते
कधीही घे कितीदाही परीक्षा घे
इथे उत्तीर्ण कोणा व्हायचे असते ?
<<
अर्रे वा! मस्त!
खूप छान !
खूप छान !
छान... आवडली
छान...
आवडली
एकापेक्षा एक रडवे शेर आहेत.
एकापेक्षा एक रडवे शेर आहेत. अशा फालतू गझला कशाला लिहिता. जरा कही तरी मन प्रसन्न करणार्या कविता गझला लिहा की काकू!
अरे बाळा त्या वाच रे इतरत्र !
अरे बाळा त्या वाच रे इतरत्र ! तुझ्या डोळ्यावर पट्टी नाही न बांधलीय कुणीही ?
खूप आवडली अख्खी गझल धुक्याचा
खूप आवडली अख्खी गझल धुक्याचा शेर सर्वाधिक आवडला
)
तुला वाटेल ते ते ...हा शेर तुमच्या गझलेत मी आजवर पाहिलेल्या शेरांपेक्षा कुठेतरी वेगळा वाटला छान झालाय
व्हायचे, जगायचे, थांबायचे....सगळेच शेर छान आहेत
असे होईल हा अंदाज नसतो ना ?<<<खूपच म्हणजे खूपच आवडली ही ओळ फार सहज ,बोलकी आणि अंदाजे बयान की काय म्हणतात तो फार आवडला तुम्ही समोर बसून मला ही ओळ /शेराची ओळ म्हणून नाही ...ऐकवत आहात असे वाटले इतका तीला सुप्रिया-टच आहे खूप मस्त ओळ (हिला कोणतीही खालची ओळ नसती तरी मी हिला अख्खा शेरच मानले असते
धन्यवाद
आवडली. प्रकाशाचा पुढे पर्याय
आवडली.
प्रकाशाचा पुढे पर्याय असतो पण
धुक्यामध्येच रेंगाळायचे असते .......... क्या बात है .
वा वा सुप्रियाताई, गझल फार
वा वा सुप्रियाताई, गझल फार आवडली!
धुके आणि गजर हे शेर मस्तच. धुक्याचा तर अप्रतिम आहे!
असे होईल हा अंदाज नसतो ना - हा मिसराही छान.
लिहीत राहा!
<<<तुला वाटेल ते ते ...हा शेर
<<<तुला वाटेल ते ते ...हा शेर तुमच्या गझलेत मी आजवर पाहिलेल्या शेरांपेक्षा कुठेतरी वेगळा वाटला >>>>
अगदी, अगदी ! मला स्वतःलाही जाणवतय हे वेगळेपण वैवकु.
<<<<असे होईल हा अंदाज नसतो ना ?<<<खूपच म्हणजे खूपच आवडली ही ओळ>>>>
खुप आतून आलीय ही ओळ. त्याच काय असावं, जेव्हा जेव्हा अंतरमनाशी आर्त संवाद साधला जात असावा तेव्हा तेव्हा अशा ओळी आपसुक उमटत असाव्यात मनाच्या पडद्यावर . फक्त त्या क्षणी त्या पकडून उतरवायला जमायला हवे. होय न ?
धन्यवाद वैवकु तुमच्या प्रतिक्रीयाही वरचेवर अधिक अभ्यासू बनत चालल्यायत
पुलस्ती आणि प्रत्येक प्रतिसादकर्त्यांचे मनःपुर्वक आभार !
-सुप्रिया.
प्रकाशाचा पुढे पर्याय असतो
प्रकाशाचा पुढे पर्याय असतो पण
धुक्यामध्येच रेंगाळायचे असते
गजर बघ वास्तवाचा वाजतो आहे
पुन्हा स्वप्नातुनी जागायचे असते
वा..व्वा !
गझल उत्तम झाली आहे. शुभेच्छा.
असे होईल हा अंदाज नसतो ना
असे होईल हा अंदाज नसतो ना ?
गमवतो जे खरे कमवायचे असत>>>>> ही द्विपदी विशेष आवडली
चांगली गझल... पु.ले.शु!!!
चांगली गझल... पु.ले.शु!!!
मत्ला, परीक्षा आणि धुके या
मत्ला, परीक्षा आणि धुके या द्वीपदी खूप आवडल्या!!
गझल अतिशय आवडली . कोणता शेर
गझल अतिशय आवडली .
कोणता शेर वेगळा कोट करण्याची गरजच वाटत नाही .उत्तम !
जेव्हा जेव्हा अंतरमनाशी आर्त संवाद साधला जात
असावा तेव्हा तेव्हा अशा ओळी आपसुक उमटत
असाव्यात मनाच्या पडद्यावर . फक्त
त्या क्षणी त्या पकडून उतरवायला जमायला हवे.
होय न ?>>>हा विचार आवडला . सहमत आहे .
मनःपुर्वक धन्यवाद सगळ्यांचे
मनःपुर्वक धन्यवाद सगळ्यांचे .
-सुप्रिया.
अनेक शेर आवडले....
अनेक शेर आवडले....
काही शेर आवडलेत !
काही शेर आवडलेत !
रेंगाळायचे आणि जागायचे हे
रेंगाळायचे आणि जागायचे हे सर्वात विशेष वाटले.
धन्यवाद !
धन्यवाद !
गझल मस्त. पुढील शेर अधिक
गझल मस्त. पुढील शेर अधिक आवडले.
प्रकाशाचा पुढे पर्याय असतो पण
धुक्यामध्येच रेंगाळायचे असते
कधीही घे कितीदाही परीक्षा घे
इथे उत्तीर्ण कोणा व्हायचे असते ?
पाश, >> एकापेक्षा एक रडवे शेर
पाश,
>> एकापेक्षा एक रडवे शेर आहेत. अशा फालतू गझला कशाला लिहिता. जरा कही तरी मन प्रसन्न करणार्या
>> कविता गझला लिहा की काकू!
कवयित्रीला मन प्रसन्न करणार्या कविताच लिहायच्या होत्या. पण लेखणीतून वेदनाच उतरल्या. नेमकी हीच या गझलेची खासियत आहे. कवयित्री गझल जगतेय हे तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. म्हणून की काय तुम्ही असा अस्थानी प्रतिसाद दिलात...?
अर्थात अशा उफराट्या प्रतिसादालाही रसगंगेत विलीन करून घेण्याची सामर्थ्यशाली प्रतिभा कवयित्री बाळगून आहेत. तेव्हा चिंता नसावी!
आ.न.,
-गा.पै.
हे पैलवानजी , जबरी ठोसा धन्स
हे पैलवानजी , जबरी ठोसा
धन्स वैभव.
-सुप्रिया.
खुपच छान....
खुपच छान....
Pages