जागतात स्वप्नतारे ...

Submitted by माउ on 26 October, 2013 - 13:29

जागतात स्वप्नतारे
रातीला धुंद नभाशी
मिटलेल्या अलगद पापण्या
गहिवरतात तळाशी...

कधी सलते हळवे दुःख
दिलासे मनाचे स्वताशी ...
आठवणीची अत्तरे मग
गंधित मैफिलीपाशी...

आळसावली स्वप्ने
धूसरतात जराशी...
उरतात दोन अश्रु ..
मी पुसलेले मगाशी...

सावरतात वेदना..
सांजेला मेघतळाशी..
मुक्त ओंजळीतुनी
अलवार शब्द राशी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users